Tuesday 26 September 2017

१८५७ चा उठाव..

१० मे १८५७ - २० जून १८५८

स्थान :- उ.भारतीय मैदानी प्रदेश,बंगाल

परिणती 

  • ईस्ट इंडिया कंपनीचा अंमल संपुष्टात.
  • शिपायांचा उठाव दडपला गेला.
  • ब्रिटीश राणीचा अंमल सुरू.



  • १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध हे १० मे १८५७ रोजी मीरत येथील लष्करछावणीतील बंडापासून सुरू झाले व लवकरच ते उत्तर व मध्य भारतातील अनेक ठिकाणी पसरले.
  • हा लढा १८५७चे स्वातंत्र्यसमर, पहिला भारतीय स्वातंत्र्यलढा, शिपाई बंडाळी अशा इतर नावांनीही ओळखला जातो..

उठावाची राजकीय कारणे 

  1. सन 1600 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली.
  2. व्यापार करणे हा कंपनीचा मुख्य हेतु होता.
  3. परंतु भारतातील अस्थिर राजकीय परिस्थितीचा फायदा घेऊन कंपनीने सत्ताविस्तारास सुरुवात केली.
  4. र्लॉड वेलस्ली, र्लॉड हेस्टिंग्ज र्लॉड डलहौसी या गव्हर्नर जनरलची प्रचंड सत्ताविस्तार करुन सर्व देशभर कंपनीचे वर्चस्व निर्माण केले.
  5. कंपनीच्या या राजकीय हस्तक्षेपामुळे ज्या संस्थानिकांच्या सत्ता नामशेष झाल्या ज्यांचे व्यापार, उद्योग बुडाले ते लोक असंतुष्ट झाले.
  6. इ.स. 1798 मध्ये वेलस्ली गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला.
  7. त्याने तैनाती फौजेच्या पध्दतीचा अवलंब करून साम्राज्य विस्तारावर भर दिला.
  8. तैनाती फौज दुर्बल संस्थानिकांच्या अंतर्गत व बाहय संरक्षणासाठी देण्यात आली.
  9. याच्या मोबदल्यात संस्थानिकास कंपनीस रोख रकमेऐवजी आपल्या राज्याचा काही प्रदेश तोडून द्यावा लागे.या फौजेचा खर्च संस्थानिकास करावा लागे.
  10. इ.स. 1848 मध्ये र्लॉड डलहौसी गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला तो अतिशय महत्वाकांक्षी व साम्राज्यावादी वृत्तीवरचा होता. 
  11. र्लॉड डलहौसी देशी राज्यांना ब्रिटिश साम्राज्यात विलीन करण्यासाछी, खालसा पध्दतीचा अवलंब केला.

उठावाची धार्मिक कारणे

  1. इ.स. 1813 च्या चार्टर अॅक्टनुसार धर्मप्रसारासाठी कंपनीची मदत मिळू लागली.
  2. अनेक धर्म प्रसारक ख्रिश्चन धर्मप्रसारासाठी भारतात येऊ लागले.
  3. कंपनी सरकारने अनेक हिंदू मंदिरांची व मुस्लीम मशिदीची वतने काढून घेतली. यामुळे धर्मगुरु व मौलवंशीची अप्रतिष्ठा झाली. धार्मिक असंतोष वाढीस लागला.

उठावाची प्रमुख कारणे

  • बंगाल प्रांत काबीज केल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीने आपले साम्राज्यवादी धोरण पुढे नेत अनेक प्रदेश भारतीयांकडून जिंकले व रयतेवर जुलूमी शासन लादले.
  • कंपनीच्या सैन्यातील एकाच पदावर असलेल्या ब्रिटिश व भारतीय सैनिकांमध्ये भेद केला जात असे.
  • ब्रिटिश सैनिकाला भारतीय सैनिकापेक्षा अधिक सोयीसुविधा व पगार दिला जात असे.
  • कंपनी सरकारने भारतीयांना नीळ,अफू अशी नगदी पीके घेण्यास सक्ती केली.
  • भारतीयांकडून ही पीके ते स्वस्तात विकत घेत व चीनमधे जाऊन मोठ्या नफ्याने विकत.
  • शेतकरी,कामगारांकडून मोठ्या प्रमाणात करवसुली केली जात असे.
  • १८५७ च्या सुरुवातीला सरकारने नव्या बंदुका आणल्या.
  • त्या बंदुकांची काडतुसे गुळगुळीत होण्यासाठी गायीच्या वा डुक्कराच्या चरबीत बुडवलेली असत. गाय हिंदूना पवित्र तर डुक्कर मुसलमानांना निषिद्ध असते.
  • बंदुकीत भरण्यापूर्वी अशी काडतुसे ओठात धरून उघडावी लागत. त्यासाठी ती काडतुसे तोंडात घालण्याची जबरदस्ती केल्याने भारतीय सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता.
  • या व अशा कारणांमुळे शिपायांनी बंड पुकारण्याचे ठरवले.
  • खरे कारण भारतीयांना देश ईस्ट इंडिया कंपनीपासून मुक्त करायचा होता, हे आहे.


अधिक माहितीसाठी :-
www.reliableacademy.com

No comments:

Post a Comment