Showing posts with label इतिहास. Show all posts
Showing posts with label इतिहास. Show all posts

Sunday, 4 March 2018

रशियन क्रांती - इ.स. १९१७

स्थान :- रशिया.

परिणती :-

 1. दुसरा निकोलाय ची सत्ता संपुष्टात.
 2. रशियन साम्राज्य लयाला गेले.
 3. बोल्शेव्हिकांच्या हातात सत्ता गेली.
 4. रशियन यादवी युद्ध सुरू झाले.

युद्धमान पक्ष :-


 1. रशियन साम्राज्य.
 2. रशियन हंगामी सरकार.
 3. बोल्शेव्हिक.
 4. पेत्रोग्राद सोव्हियेत.


 • रशियाप्रमाणेच जगाच्या राजकीय, आर्थिक व वैचारिक क्षेत्रांत फार मोठा प्रभाव पाडणारी ही क्रांती ७ नोव्हेंबर १९१७ रोजी घडून आली. 
 • या क्रांतीमुळे रशियात सु. १४८० सालापासून चालत आलेल्या झारच्या राजेशाहीचा शेवट झाला आणि तेथे बोल्शेव्हिक कम्युनिस्टांची सत्ता स्थापन झाली.
 • इ.स. १९१७ रशियात झालेल्या राजकीय उलथापालथीस रशियन क्रांती म्हटले जाते. यामुळे झारची निरंकुश सत्ता लयाला गेली. 
 • मार्च, इ.स. १९१७ मध्ये झारशाही लयाला गेली व त्या ठिकाणी हंगामी सरकार आले. हे हंगामी सरकार मेन्शॅव्हिक गटाचा नेता (समाजवादी क्रांतिकारी पक्ष तृदोविक गट) केरेन्स्की याच्या नेतृत्वखालचे होते. 
 • बोल्शॅव्हिक नेता व्लादिमीर लेनिन याने केरेन्स्कीचे हंगामी सरकार बरखास्त केले. ऑक्टोबरमधील दुसऱ्या क्रांतीत हंगामी सरकारची सत्ता बोल्शेव्हिक (साम्यवादी) सरकारच्या हाती गेली. बोल्शॅव्हिक नेता व्लादिमीर लेनिन याने केरेन्स्कीचे हंगामी सरकार बरखास्त केले.
 • रशियन राज्यक्रांती ही पहिली साम्यवादी क्रांती होती. 
 • जगभरातील कामगारांच्या परिस्थितीत सुधारणा घडवून आणण्यास ती कारणीभूत ठरली. 
 • आर्थिक नियोजनाच्या मार्गाने विकास साधण्याची संकल्पना ही या क्रांतीने जगाला दिलेली देणगी आहे. 
 • इ.स. १९१७ च्या फेब्रुवारी महिन्यात पेट्रोग्राड येथे कामगारांनी संप पुकारला. ही रशियन राज्यक्रांतीची नांदी ठरली. 
 • त्यानंतर राजधानीतील सैनिकांनीही कामगारांना पाठिंबा दिला. हे या राज्यक्रांतीचे पहिले पर्व होते. 
 • स्वित्झर्लंडमध्ये अज्ञातवासात असलेला बोल्शेव्हिक नेता लेनिन इ.स. १९१७ च्या एप्रिलमध्ये रशियात परतला, तेंव्हा या राज्यक्रांतीचे दुसरे पर्व सुरु झाले.

रशियन राज्यक्रांतीचा काही प्रमुख घटनांचा कालानुक्रम 

 • ‘ब्लडी सन्डे’ – विंटर पॅलेसवरील कामगार-मोर्चावर गोळिबार व शंभर लोकांची हत्या. :- २२ जानेवारी १९०५.
 • पोटेमकिन युध्दनौकेवरील बंडाळी. :- १४ जून १९०५.
 • रेल्वे कर्मचाऱ्यांचा संप :- २० ऑक्टोबर १९०५.
 • सेंट पीटर्झबर्ग येथे कामगार प्रतिनिधींच्या पहिल्या सोव्हिएटची स्थापना. :- २६ ऑक्टोबर १९०५.
 • ऑल रशियन सोशल डेमॉक्रॅटिक लेबर पक्षाचे लंडन येथील अधिवेशन :- एप्रिल १९०७.
 • पेट्रग्राड शहरातील २५,००० कामगारांचा संप. :- २८ फेब्रुवारी १९१७.
 • पेट्रग्राडमधील झारसत्तेचे उच्चाटन. :- १२ मार्च १९१७.
 • सैनिक आणि कामगार यांची हंगामी सरकारविरुध्द निदर्शने :- ३ ते ५ मे १९१७.
 • पेट्रग्राडमध्ये पहिल्या सोव्हिएट काँग्रेसची सुरुवात. :- १६ जून १९१७.
 • हंगामी सरकारविरुध्द खलाशी, कामगार व सैनिक यांचा अयशस्वी उठाव. :- १६ ते १८ जुलै १९१७.
 • बोल्शेव्हिकांव्यतिरिक्त सर्व राजकीय गटांची मॉस्कोमध्ये परिषद. तिच्या प्रतिक्रांतिवादी धोरणाविरुध्द मॉस्को कामगारांचा संप. :- २५ ते २७ ऑगस्ट १९१७.
 • पेट्रग्राडमधील सोव्हिएटे नष्ट करण्यासाठी लष्करी उपाययोजना. :- ६ सप्टेंबर १९१७.
 • मॉस्कोच्या सोव्हिएटमध्ये प्रथमच बोल्हेव्हिकांचे मताधिक्य. :- १९ सप्टेंबर १९१७.
अधिक माहितीसाठी :-


झार दुसरा निकोलस व शाही घराण्यातील इतर व्यक्तींना येकटेरिंबर्ग (स्व्हेर्डलॉव्हूस्क) येथे देहान्त शासन :- १६ जुलै १९१८.

Wednesday, 14 February 2018

समाजसुधारक - रघुनाथ धोंडो कर्वे • जन्म :- इ.स. १४ जानेवारी, १८८२. (मुरूड)
 • मृत्यू :- इ.स. १४ ऑक्टोबर, १९५३. (मुंबई)
 • वडील :- महर्षी धोंडो केशव कर्वे.
 • आई :- राधाबाई धोंडो कर्वे.
 • पत्नी :- मालती रघुनाथ कर्वे.
 • रघुनाथ धोंडो कर्वे हे गणिताचे प्राध्यापक आणि महाराष्ट्रातील अग्रणी समाजसुधारक होते.
 • समाजस्वास्थ्यासाठी संततिनियमन आणि लैंगिक शिक्षण यांसंबंधी बुद्धिवादी विचारप्रवर्तन व प्रत्यक्ष कार्य करणारे भारतातील एक आद्य विचारवंत म्हणुन देखील त्यांची ओळख आहे.

शिक्षण 

 • पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूल मधे ते शिकले. इ.स. १८९९ साली त्यांनी मॅट्रिकची (दहावी) परीक्षा दिली. मॅट्रिक परीक्षेत मुंबई राज्यात सर्वप्रथम आले.
 • इ.स. १९०४ मधे ते फर्ग्युसन कॉलेजमधून बी. ए.झाले.
 • इ.स. १९१९ साली ते गणितातील पी.एच.डी. पदवी घेण्याकरिता ते पॅरिसला गेले, परंतु ती न मिळवता एका पदविकेवर (‘दिप्लोम्‌ दे सुदस्युपेरिअर’ पदवी) समाधान मानून त्यांना परत यावे लागले.
 • त्यामागील घडलेल्या घटना त्यांनी मुलाखतींमध्ये नोंदविल्या. (आशा व पौर्णिमा नावाची साप्ताहिके इ.स. १९४०च्या सुमारास प्रसिद्ध होत असत, त्यांमध्ये ह.वि. देसाई या पत्रकाराने रघुनाथरावांच्या घेतलेल्या दोन मुलाखती प्रसिद्ध करण्यात आल्या.)
 • एल्फिन्स्टन कॉलेज - मुंबई (१९०८-१७), कर्नाटक कॉलेज - धारवाड (१९१७ - १९), डेक्कन कॉलेज - पुणे (१९२१), गुजरात कॉलेज - अहमदाबाद (१९२१ - २२) व विल्सन कॉलेज - मुंबई (१९२२) या महाविद्यालयांत गणिताचे प्राध्यापक होते. त्यांचे क्रांतीकारक विचार व बाणेदार स्वभाव यांमुळे त्यांच्या नोकरीत सतत अस्थिरता राहिली. 
 • इ.स. १९०६ साली रघुनाथराव मुंबईला ट्रेनिंग कॉलेजात शिक्षण घेण्याकरिता आले, तेव्हा तिथे त्यांना भेटलेले प्रो. नेल्सन फ्रेझर या गुरूंविषयी आणि फ्रेंच भाषा शिकायचे निश्चित झाले, तेव्हापासून दीर्घकालपर्यंत ज्यांच्या सानिध्याचा व साहाय्याचा लाभ रघुनाथरावांना मिळाला ते प्रो. पेल्तिए यांच्या संबंधातील त्यांनी जागवलेल्या आठवणी ‘एक विक्षिप्त इंग्रज- प्रो. नेल्सन पेल्तिए‘ या लेखात आहेत.
 • फ्रेंच भाषेचे कर्व्यांना विशेष ज्ञान होते. त्या भाषेतील अनेक नाटके व गोष्टी त्यांनी रूपांतरित केली आहेत.


सामाजिक कारकीर्द

 • रघुनाथ कर्वे यांनी गणिताचे प्राध्यापक म्हणून मुंबईच्या विल्सन महाविद्यालयात नोकरी केली, त्यातच त्यांनी कुटुंब नियोजन, लोकसंखेला आळा, आणि लैंगिक सुखाचे स्त्रियांचे अधिकार याचे महत्त्व ते लोकांना सांगत राहिले. 
 • तेव्हा महाविद्यालयाच्या रूढीवादी प्राचार्यांनी त्यांना पदाचा राजीनामा देण्यास सांगितले. त्यांनी तो दिला परंतु वरील प्रश्नांसाठी आपले आयुष्य समर्पित केले.
 • संततिनियमनाचे केंद्र (राइट एजन्सी) ते १९२१ पासून आपली पत्नी मालतीबाई यांच्या सहकार्याने चालवत होते. 
 • त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांच्या मातोश्रींचा बाळंतपणातच देहान्त झाल्यामुळे गरोदरपणासंदर्भात स्त्रियांना व्यवस्थित शिक्षण आणि माहिती व्हावी असा त्यांचा आग्रह होता.
 • त्यांनी १९२३ मध्ये संततिनियमन, विचार व आचार आणि १९२७ मध्ये गुप्त रोगांपासून बचाव (विचार व आचार) ही पुस्तके लिहिली. 
 • संततिनियमनाचे उद्दिष्ट समोर ठेऊन कर्वे यांनी १५ जुलै इ.स. १९२७ ला ‘समाजस्वास्थ्य’ या मासिकाची सुरुवात केली.
 • कर्वे यांनी स्वतःच्या प्रयत्नातून पहिले कुटुंब नियोजन केंद्र इ.स. १९२१ साली लंडनमधे सुरू केले,त्याच वर्षी ते भारतात सुरू झाले. ‘राईट एजन्सी’ हे भारतातील पहिले कुटुंब कल्याण केंद्र होय.
 • त्याचप्रमाणे वेश्याव्यवसाय (१९४०), आधुनिक आहारशास्त्र (१९३८), आधुनिक कामशास्त्र (आवृ. २, १९३४) अशी इतरही काही शास्त्रीय विषयांचे विवरण करणारी पुस्तके लिहिली.
 • पॅरिसच्या परी (१९४६) व तेरा गोष्टी (१९४०) हे त्यांचे ललित साहित्यही उपलब्ध आहे. त्यांना रंगभूमीचेही अत्यंत आकर्षण होते. गुरुबाजी (१९३७), तार्त्युफ नाटकाचे रूपांतर) व न्यायाचा शोध (१९४६) हे चार अंकी संगीत नाटक त्याचे निदर्शक होय.


अधिक माहितीसाठी :-
www.reliableacademy.com

Tuesday, 13 February 2018

ताश्कंद करार • ताश्कंद करार, ताश्कंद डिक्लरेशन तथा ताश्कंद अ‍ॅग्रिमेंट हा शांतता करार भारत आणि पाकिस्तान यांच्यात ताश्कंद (तत्कालीन सोव्हिएत संघात, वर्तमान उझबेकिस्तानात - रशिया) येथे इ.स. १० जानेवारी, १९६६ रोजी केला गेला. 
 • भारतावरील पाकिस्तानी आक्रमणामुळे ५ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर १९६५ पर्यंत झालेल्या युद्धाची समाप्ती या कराराने झाली. 
 • भारताचे महामंत्री लालबहादूर शास्त्री पाकिस्तानचे राष्ट्रपती अयुबखान यांच्यामध्ये सोव्हिएट महामंत्री कोसिजिन यांच्या मध्यस्थीने ४ जानेवारी १९६६ पासून वाटाघाटी होऊन १० जानेवारीस नऊ कलमी करारावर उभय नेत्यांनी सह्या केल्या.

पार्श्वभुमी :-

 • १९४७ साली भारत- पाकिस्तान फाळणीनंतर या दोन देशांमध्ये चिघळलेल्या सीमावादाने १९६५ मध्ये परत एकदा डोके वर काढले. 
 • ऑगस्ट १९६५ मध्ये पाकिस्तानी लष्कराने ‘ऑपरेशन जिब्राल्टर’ या नावाने मोहीम काढून जम्मू काश्मीरच्या भारतीय प्रदेशात सन्य घुसवले. प्रत्युत्तर म्हणून भारत सरकारनेही पाकिस्तानी लष्करावर हल्ला चढवला. 
 • दोन्ही बाजूंचे हजारो सनिक या युद्धात मारले गेले आणि दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच इतक्या मोठय़ा संख्येने रणगाडे आणि इतर शस्त्रास्त्रांचा वापर झालेले हे युद्ध होते असे म्हटले जाते. सतरा दिवस चाललेले हे युद्ध अनिर्णीत अवस्थेतच थांबले. 
 • या युद्धानंतर भारत आणि सोव्हिएत युनियनचे राजनतिक संबंध अधिक जवळचे झाले, तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तान चीनमध्ये अधिक जवळीक झाली. 
 • ४ ते १० जानेवारी १९६६ मध्ये ताश्कंद येथे झालेली ही बठक संयुक्त राष्ट्रे, अमेरिकी सरकारचे प्रतिनिधी आणि सोव्हिएत रशियन सरकारचे वरिष्ठ प्रतिनिधी यांच्या देखरेखीखाली झाली.
 • व ताश्कंद डिक्लरेशन’ ऊर्फ ‘ताश्कंद अ‍ॅग्रिमेंट’ हा शांतता करार भारत आणि पाकिस्तान यांच्यात ताश्कंद येथे १० जानेवारी १९६६ रोजी झाला.


१९६६ पासून वाटाघाटी होऊन १० जानेवारीस नऊ कलमी करारावर उभय नेत्यांनी सह्या केल्या ते पुढील प्रमाणे आहेत -

१. संयुक्त राष्ट्र - सनदेप्रमाणे परस्परांशी स्नेहपूर्ण शेजारसंबंध निर्माण करण्याची व परस्परविरुद्ध सैन्यबळाचा उपयोग न करता, आपापसांतील तंटे शांततामय मार्गाने सोडविण्याची हमी देण्यात आली. 

२. २५ फेब्रुवारी १९६६ च्या आत आपापली सैन्ये ५ ऑगस्ट १९६५ च्या स्थानावर परत घेण्याचे मान्य करण्यात आले. 

यांशिवाय करारातील इतर कलमे पुढीलप्रमाणे आहेत -

 • एकमेकांच्या  अंतर्गत काराभारात ढवळाढवळ न करणे. 
 • एकमेकांच्या विरुद्धच्या प्रचारास आळा घालणे. 
 • एकमेकांचे राजदूत पुनश्च स्थानापन्न करून १९६१ च्या व्हिएन्ना कराराप्रमाणे त्यांच्या सुरक्षिततेची व्यवस्था करणे. 
 • एकमेकांमधील आर्थिक व व्यापारी संबंध, दळणवळण व सांस्कृतिक देवाणघेवाण यांचे पुनरुज्जीवन करणे व अस्तित्वात असलेल्या कराराची अंमलबजावणी करणे.
 • युद्धकैद्यांची अदलाबदल करणे. 
 • उभयदेशांतील लोकांना मोठ्या संख्येने देशत्याग करावा लागणार नाही, अशी परिस्थिती निर्माण करणे आणि युद्धकाळात उभयदेशांनी एकमेकांची जी मालमत्ता व परिसंपत्ती ताब्यात घेतली असेल, ती परत करण्यासाठी वाटाघाटी करणे. 
 • अत्युच्च व इतर स्तरांवर परस्परांच्या हितसंबंधाच्या प्रश्नावर वेळोवेळी विचारविनिमय करणे.

अधिक माहितीसाठी :-

Friday, 19 January 2018

वंगभंग चळवळ


सुरूवात - १६ ऑक्टोबर १९०५ रोजी.

 • मूळ कल्पना - सर विल्यम वार्ड (१८९६).
 • फाळणीस विरोध - सर हेन्री काटन (१८९६).
 • फाळणी विरोधात स्वदेशी चळवळीस सुरूवात - १७  ऑगस्ट १९०५.
 • वंगभंग चळवळ सुरु करण्यामागील कारण.- बंगालच्या फाळणीच्या विरोधात.

वंगभंग चळवळ

 • बंगालच्या फळणीविरोधी स्वदेशी तसेच वंगभंग आंदोलन या नावाने ओळखळे जात स्वदेशी चळवळीचा मुख्य कार्यक्रम चतुःसूत्री होय.
 • बंगाल प्रांताची फाळणी करण्याच्या ब्रिटिश राजवटीच्या धोरणाविरुद्ध झालेली १९०४-१९०५ ची चळवळ म्हणुन देखील ओळखली जाते.
 • ह्या चळवळीने राष्ट्रीय काँग्रेसमधील जहालांचा गट लोकप्रिय बनण्यास मदत झाली.
 • ब्रिटिश काळातील बंगाल प्रांत, विद्यमान पश्चिम बंगाल राज्य, बांगला देश, बिहार आणि ओरिसा एवढा भौगोलिक दृष्ट्या अवाढव्य होता. 
 • प्रशासनाच्या सोयीसाठी बंगालची फाळणी कशी करावी, यावर सुमारे दहा वर्षे चर्चा चालू होती. अखेर ही फाळणी राजकीय हितासाठी करण्याचे ठरले.
 • डिसेंबर १९०३ च्या अधिकृत पत्रकान्वये पूर्व बंगालचे चितगाँग, मैमनसिंग व टिपेरा हे तीन जिल्हे आसामला जोडण्याची योजना सरकारच्या विचाराधीन होती.
 • फेब्रुवारी १९०४ मध्ये व्हाइसरॉय कर्झनने ब्रिटिश सरकारला लिहिले की, ‘बंगाल्यांच्या आरडा ओरड्याला भिऊन आपण जर कच खाल्ली, तर बंगालला खच्ची करण्याची दुसरी संधी यानंतर मिळणार नाही’.
 • पूर्व बंगाल-आसामच्या नव्या प्रांतात मुसलमानांची प्रभावी बहुसंख्या असेल व ते त्यांना फायदेशीरच होईल, असे कर्झनने आवर्जून सांगितले.
 • फाळणीविरोधी आंदोलनाला शह देण्यासाठी प्रचंड कर्जाच्या ओझ्याखाली बेजार झालेल्या डाक्क्याच्या नबाबांना कर्जमुक्त करण्यासाठी नाममात्र व्याजावर दीर्घमुदतीचे चौदा लाख रूपयांचे कर्ज सरकारी तिजोरीतून देण्यात आले. मुसलमानांमध्ये फाळणीचा जबरदस्त पुरस्कार केला; पण त्याचा प्रभाव पडला नाही.
 • बंगाली मुसलमानही वंगभंग चळवळीत हिरिरीने सहभागी झाले. शेवटी डाक्का नबाबांनी डाक्क्यालाच मुस्लिम लीगचे स्थापना अधिवेशन भरविले. १९०५ च्या ऑगस्टमध्ये फाळणीचा निर्णय घोषित करण्यात आला.
 • १६ ऑक्टोबर रोजी फाळणी अंमलात आली.
 • गो. कृ. गोखले इंग्लंडला गेले. व फाळणी रद्द व्हावी म्हणून सर्वतोपरी प्रयत्न केले; पण त्याचा उपयोग झाला नाही.
 • जून १९०८ मध्ये ब्रिटिश पार्लमेंटमध्ये हिंदुस्थानच्या परिस्थितीवर चर्चा झाली. तेव्हा बंगाल फाळणीमुळेच भारतात असंतोष दीर्घकाळ भडकत राहिला आहे; बंगालची फाळणी करण्याऐवजी बिहार आणि ओरिसा वेगळे केले असते, तर लोकांचा रोष पतकरावा लागला नसता, असे अनेक सभासदांनी स्ष्टपणे बोलून दाखविले.
 • फेब्रुवारी १९०६ मध्ये पार्लमेंटमध्ये बोलताना भारतमंत्री लॉर्ड मोर्ले यांनी लोकांच्या भावनेची कदर न करता फाळणी करण्यात आली आहे, हे मान्य करूनही फाळणीचा निर्णय ही काळ्या दगडवरची रेघ आहे, असे जाहीर केले.
 • १९११ मध्ये आपल्या भारतभेटीच्या वेळी नूतन बादशाहा पंचम जॉर्ज यांनी हिंदुस्थानात आणि लॉर्ड मोर्ले यांनी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये फाळणी रद्द केल्याचे घोषित केले


वंगभंग चळवळी दरम्यान घडलेल्या महत्त्वाच्या घटना -

 • जनरल लॉर्ड कर्झन १८९९ साली भारताचा गवर्नर जनरल झाला. व त्याने १९०५ साली बंगालची फाळणी केली.
 • १९०५ साली राष्ट्रीय सभेचे अधिवेशन बनारस येथे झाले. आणि त्याचे नामदार गोपाळ कृष्ण गोखले अध्यक्ष झाले.
 • १९०६ साली राष्ट्रीय सभेचे अधिवेशन कोलकाता येथे व दादाभाई नौरोजी हे अध्यक्ष होते.
 • लोकमान्य टिळकांना मंडालेचा तुरुंगात ६ वर्षे कारावास झाला.
 • १९०६ साली मुस्लिम लीगची स्थापना झाली.
 • १९०९ साली मोर्ले मिंटो कायदा आला.
 • १९१६ साली लखनौ करार झाला.
 • १९१४ साली पहिले महायुद्ध व १९१९ साली दुसरे युद्ध झाले.
 • अँनी बेझंट व टिळक यांनी होमरूल चळवळ स्थापन केली.
 • १९१९ साली मोन्टेग्यू चेम्स्फार्ड कायदा स्थापना झाला.
 • १९२० साली लोकमान्य टिळकांनी निधन झाले.


अधिक माहितीसाठी :-

Thursday, 18 January 2018

सत्यशोधक समाज - महात्मा फुले

स्थापना - सप्टेंबर २४, इ.स. १८७३.

सत्यशोधक समाजाचे ध्येय - पुरोहितांकडून होणाऱ्या अन्याय, अत्याचारापासून , गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे.

 • घोष वाक्य - ‘सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥’
 • सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ - सार्वजनिक सत्यधर्म'.
 • `निर्मिकाचा धर्म सत्य आहे एक, भांडणे अनेक कशासाठी’ हा विचार फुले यांनी मांडला.
 • सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली.
 • सत्यशोधक समाजातर्फे पुरोहिताशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली.त्यासाठी मराठीत मंगलाष्टके रचली.

सत्यशोधक समाजाचे कार्य 

 • सत्यशोधक समाजाने लोकशिक्षणाबरोबरच शेतकऱ्यांची जमीनदार व सावकार यांच्या मगरमिठीतून सुटका करण्यासाठी अथक प्रयत्न केले. 
 • दीनबंधू , दीनमित्र वगैरे वृत्तपत्र-मासिकांतून शेतकऱ्यांची गाऱ्हाणी त्यांनी हिरिरीने मांडली. 
 • शेतकऱ्याचा आसूड मधून म. फुल्यांनी शासनाच्या नजरेस कृषिवर्गाची दुःस्थिती आणली. त्यामुळेच ‘ डेक्कन अ‍ॅगिकल्चर रिलिफ अ‍ॅक्ट ’ संमत झाला.
 • दीनबंधू वृत्तपत्राने गिरणीकामगारांची स्थिती सुधारण्याचा पहिला प्रयत्न केला.
 • नारायण मेघाजी लोखंडे यांनी ‘ मिलहँड असोसिएशन ’ स्थापून, फॅक्टरी आयोगापुढे कामगारांची बाजू मांडली. तसेच लहान शेतकऱ्यांना जंगल खात्याच्या अधिकाऱ्यांकडून होणारा उपद्रव दूर केला. 
 • जातिभेदखंडन करणारे तुकाराम तात्या पडवळ यांचे जातिभेद विवेकसार, परमहंस सभेचे दादोबा पांडुरंगलिखित धर्मदर्शक आणि म. फुल्यांचे सार्वजनिक सत्यधर्म ह्या गंथांचा सत्यशोधक चळवळीने मार्गदर्शनपर उपयोग केला. 
 • तसेच अनिष्ट अंधश्रद्धामूलक परंपरा, चालीरीती, रूढी यांचे समूळ उच्चटन करण्याचा प्रचार केला. 
 • १८७९ मध्ये पुण्यातील एका थिएटरमध्ये त्यांनी स्त्रियांच्या निबंधवाचनाचा समारंभ घडवून आणला. 
 • शेतकऱ्यांच्या दुःस्थितीबद्दल व पिळवणुकीबद्दल त्यांनी बारामती तालुक्यात चिंचोली गावात शेतकऱ्यांची सभा भरवून (१८८०) शेतसारा, कर्ज, जंगलत्रास, सक्तीचे शिक्षण वगैरेंविषयी ठराव संमत केले. 
 • एवढेच नव्हे, तर भालेकर यांनी विदर्भ व मध्य प्रदेशात कंत्राटी कामानिमित्त काही महिने गेले असता, तेथे सत्यशोधक समाजाचे प्रचारकार्य केले.
 • सत्यशोधक समाजाने लोकशिक्षणाबरोबरच शेतकऱ्यांची जमीनदार व सावकार यांच्या मगरमिठीतून सुटका करण्यासाठी अथक प्रयत्न केले.

सत्यशोधक समाजाची अधिवेशने/संमेलने 

 • १८७३ मध्ये सत्यशोधक समाजाची म. फुले यांनी स्थापना केली; मात्र समाज अधिवेशनांची सुरूवात १९११ पासून झाली. 
 • १९११ पासून २००७ पर्यंत सत्यशोधक समाजाची एकूण ३५ अधिवेशने संपन्न झाली. 
 • पहिले अधिवेशन १७ एप्रिल १९११ रोजी पुणे येथे स्वामी रामय्या व्यंकय्या अय्यावरू यांच्या अध्यक्षतेने पार पडले.
 • तर, पस्तीसावे अधिवेशन २२ डिसेंबर २००७ रोजी गेवराई (जिल्हा बीड, मराठवाडा) येथे डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.

अधिक माहिती करीता :-

Tuesday, 9 January 2018

भारताचा पहिला गव्हर्नर जनरल - वॉरन हेस्टिंग्स


जन्म -  इ.स. ६ डिसेंबर १७३२ (चर्चिल - इंग्लंड)


मृत्यु - इ.स.  २२ ऑगस्ट १८१८ (डेल्सफोर्ड - इंग्लंड)

 • वॉरन हेस्टिंग्स हा हा इंग्लिश राजकारणी आणि भारताचा पहिला गव्हर्नर जनरल होता.
 • कारकीर्द सुरु - २० ऑक्टोबर १७७३ (originally joined on २८ एप्रिल १७७२).
 • कार्यकाल समाप्त - १ फेब्रुवारी १७८५.

बालपण -

 • हेस्टिंग्सचा जन्म व बालपण हलाखीच्या परिस्थितीतील होते.
 • वेस्टमिन्स्टर स्कूलमध्ये शिकायला असताना हा युनायटेड किंग्डमचा भविष्यातील पंतप्रधान लॉर्ड शेल्बर्न आणि विल्यम हेन्री कॅव्हेंडिश-बेंटिंक तसेच कवी विल्यम काउपर यांचा समकालीन होता.

भारतातील कार्यकाल 

 • हेस्टिंग्स १७५०मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीमध्ये कारकून म्हणून नोकरीला लागला व त्यासाठी कोलकात्यास आला.
 • त्याच्या कष्टाचे चीज म्हणून त्याला कासीमबझार येथे बढतीसह पाठविण्यात आले. म्हणुन त्याची कासिमबाझार येथे नियुक्ती करण्यात आली (१७५३). 
 • तेथील वास्तव्यात त्याने फार्सी, बंगाली आणि ऊर्दू या भाषा व एतद्देशीय रीतिरिवाजांचे ज्ञान प्राप्त करून घेतले. 
 • कंपनीने त्याची एका व्यापारपेढीवर व्यवस्थापक म्हणून नियुक्ती केली. 
 • त्याने कलकत्ता घेण्यासाठी लॉर्ड रॉबर्ट क्लाइव्हबरोबर युद्धात भाग घेतला (१७५६). 
 • त्यानंतर त्याची बंगालच्या वखारीत (फॅक्टरी) रेसिडेन्ट म्हणून निवड झाली (१७५७). तेथील कार्यक्षम कामगिरीमुळे कलकत्त्याच्या मंडळात तो प्रविष्ट झाला (१७६१); तथापि तेथील भ्रष्टाचार व गैरकारभार यांमुळे त्याने आपल्या मंडळाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन तो इंग्लंडला परतला (१७६४). 
 • पुन्हा त्याची ईस्ट इंडिया कंपनीने १७६९ मध्ये मद्रास येथील काउन्सिलवर नेमणूक केली. त्याच्या कर्तृत्वाचा विचार करून त्यास बंगालचा गव्हर्नर नेमले (१७७१) आणि पुढे गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया या उच्च पदावर त्याची नियुक्ती झाली (१७७४). 
 • तत्पूर्वी १७७३ मध्ये ब्रिटिश संसदेने रेग्युलेटिंग अ‍ॅक्ट संमत करून बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल हा हुद्दा देऊन त्याचा अधिकार मुंबई-मद्रास येथील गव्हर्नरांवर निश्चित केला आणि त्याच्या मदतीस चार ब्रिटिश सदस्यांचे मंडळ दिले. त्यामुळे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या शासनव्यवस्थेला वैधानिक स्वरूप प्राप्त झाले.
 • तेथे त्याने विल्यम वॉट्सच्या देखरेखीखाली पूर्व भारतातील राजकारणाचे धडे घेतले. 
 • याच सुमारास बंगालचा नवाब अलिवर्दी खान मृत्यूशय्येवर होता व त्याचा नातू सिराज उददौला सत्तेवर येणे अपेक्षित होते. 
 • सिराज उददौला युरोपीय लोकांच्या विरुद्ध होता व त्यांच्या राजकीय लुडबुडीस त्याचा सक्त विरोध होता. 
 • सत्तेवर आल्याआल्या बंगालच्या सैन्याने युरोपीय ठाण्यांवर हल्ले चढविले. त्यात कासीमबझारच्या इंग्लिश ठाण्यासही वेढा घातला गेला.
 • आपल्यापेक्षा अनेकपटींनी मोठ्या असलेल्या शत्रूसैन्याविरुद्ध ब्रिटिशांनी शरणागती पत्करली.
 • बंगाली, फार्सी, उर्दू या भाषांव्यतिरिक्त हेस्टिंग्जला अरबी भाषेचेही जुजबी ज्ञान होते.
 • त्याने कलकत्त्यात मद्रसा स्थापन केली (१७८१). त्याने संस्कृत भाषेच्या उत्तेजनार्थ नथॅन्यल हॅलहेडकडून हिंदू विधीचे भाषांतर करून घेतले. 
 • त्याचा मित्र सर चार्ल्स विल्किन्स हा संस्कृत व फार्सी भाषांचा जाणकार होता. विल्किन्सने भगवद्गीते चा इंग्रजी अनुवाद केला. थोर प्राच्यविद्यातज्ज्ञ सर विल्यम जोन्स याने मनुस्मृती चे भाषांतर केले (१७८३). 
 • जोन्स, विल्किन्स व हॅलहेड यांच्या सहकार्याने हेस्टिंग्जने आपल्या कारकिर्दीच्या शेवटच्या काळात एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. त्याने संस्कृत पंडितांकरवी संस्कृत साहित्य, उपनिषदे, भगवद्गीता यांतील ज्ञान सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न केले.

वॉरन हेस्टिंग्सच्या कार्यकाळातील प्रमुख घटना


 • रेग्युलेटिंग अ‍ॅक्ट, १७७३.
 • Supreme Council Of Bengal.
 • बंगाल एशियाटिक सोसायटी.
 • शाह आलम दुसरा या मुघल सम्राटाचे पेन्शन बंद केले.
 • Stopped Diarchy in Bengal.
 • जॉनथन डंकन द्वारा नवीन संस्कृत शाळा.
 • टांकसाळ मुर्शिदाबाद वरून कोलकाताला हलवली.
 • बंगाल गॅझेट - पहिले भारतीय वृतपत्र प्रसिद्ध.
 • पहिले आंग्ल - मराठा युद्ध (१७७५–८२).
 • दूसरे आंग्ल - म्हैसूर युद्ध (१७८०–८४ ).
 • पहिले रोहिला युद्ध १७७३–१७७४.
 • दुसरा रोहिला - उठाव १७७९.
 • Experimentation on land settlements. (१७७२-five years settlement, changed to १ year in १७७६).
 • भगवतगीता चे इंग्रजीत भाषांतर.

अधिक माहितीसाठी -

Saturday, 6 January 2018

समाजसुधारक बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर


मराठी वृत्तपत्र चे जनक - बाळशास्त्री जांभेकर 


जन्म - ६ जानेवारी, १८१२.

मृत्यू - १८ मे, १८४६.


जन्म ठिकाण :- राजापूर तालुक्यातील पोंभुर्ले गाव.
वडील :- गंगाधरशास्त्री जांभेकर.

जीवन


 • जांभेकरांनी बालपणी वडिलांकडे घरीच मराठी व संस्कृत भाषांचा अभ्यास आरंभला. इ.स. १८२५ साली त्यांचे मुंबईमध्ये आगमन झाले. 
 • मुंबईस येऊन ते सदाशिव काशीनाथ ऊर्फ ‘बापू छत्रे’ आणि बापूशास्त्री शुक्ल यांजकडे अनुक्रमे इंग्रजी व संस्कृत शिकू लागले. या दोन विषयांबरोबरच गणित आणि शास्त्र या विषयांत त्यांनी प्रावीण्य मिळविले. 
 • ‘बाँबे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’च्या विद्यालयात अभ्यास करून त्यांनी विशीच्या आत प्राध्यापक म्हणून नियुक्ती ज्ञान मिळवले. 
 • इ.स. १८३४ साली एल्फिन्स्टन कॉलेजात पहिले एतद्देशीय व्याख्याते म्हणून जांभेकरांची नियुक्ती झाली.


भाषांचे ज्ञान - 

मराठी, संस्कृत, बंगाली, गुजराती, कानडी, तेलुगू, फारसी, फ्रेंच, लॅटिन व ग्रीक.
(फ्रेंच भाषेतील नैपुण्याबद्दल फ्रान्सच्या राजाकडून त्यांचा मानसन्मान झाला होता.)

विषयांचे ज्ञान -

रसायनशास्त्र , भूगर्भशास्त्र, प्राणिशास्त्र, वनस्पतीशास्त्र, न्यायशास्त्र, इतिहास, मानसशास्त्र.

समाजकार्य


 • सार्वजनिक गंथालयांचे महत्त्व ओळखून 'बाँबे नेटिव्ह जनरल लायब्ररी' या ग्रंथालयाची जांभेकरांनी स्थापना केली. 
 • 'एशियाटिक सोसायटी'च्या त्रैमासिकात शोधनिबंध लिहिणारे ते पहिले भारतीय होते.
 • ज्ञानेश्वरीची पहिली मुद्रित आवृत्ती त्यांनी इ.स. १८४५ साली काढली.
 • विविध समस्यांवर सकस चर्चा घडवण्यासाठी बाळशास्त्रींनी ‘नेटिव्ह इंप्रुव्हमेंट सोसायटी’ची स्थापना केली. 
 • यातूनच पुढे ‘स्ट्युडंट्स लिटररी ॲन्ड सायंटिफिक सोसायटी’ या संस्थेला प्रेरणा मिळाली व दादाभाई नौरोजी, भाऊ दाजी लाड  यांसारखे दिग्गज कार्यरत झाले.
 • बाळशास्त्रींनी साधारणपणे इ.स. १८३० ते इ.स. १८४६ या काळात आपले योगदान महाराष्ट्राला व भारताला दिले.
 • ख्रिस्त्याच्या घरात राहिल्यामुळे वाळीत टाकल्या गेलेल्या एका हिंदू मुलास त्यांनी तत्कालीन सनातन्यांच्या विरोधास न जुमानता शुद्ध करून पुन्हा हिंदू धर्मात घेण्याची व्यवस्था केली.


पत्रकारिता 

मराठीतील पहिले वृत्तपत्र दर्पण -

 1. सहयोगी गोविंद कुंटे आणि भाऊ महाजनांच्या मदतीने त्यांनी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र काढले.
 2. जानेवारी ६, इ.स. १८३२ रोजी दर्पणाचा पहिला अंक प्रकाशित झाला. 
 3. जनसामान्यांसाठी वृत्तपत्राची भाषा मराठी ठेवण्यात आली असली तरी ब्रिटिश शासनापर्यंत आपला आवाज जावा या हेतूने, वृत्तपत्राचा एक स्तंभ इंग्लिश भाषेत असायचा. 
 4. वृत्तपत्राची किंमत १ रुपया होती. इंग्रजी आणि मराठी अशा जोड भाषेत प्रकाशित होणारे हे वृत्तपत्र! या अंकात दोन स्तंभ असत. उभ्या मजकुरात एक स्तंभ (कॉलम) मराठीत आणि एक स्तंभ इंग्रजीत असे. 
 5. मराठी मजकूर अर्थातच सर्वसामान्य जनतेसाठी होता आणि इंग्रजी मजकूर वृत्तपत्रात काय लिहिले आहे, हे राज्यकर्त्यांनाही कळावे यासाठी इंग्रजी मजकूर होता. 
 6. वृत्तपत्राची संकल्पना त्या काळी लोकांना नवीन होती. त्यामुळे दर्पणचे वर्गणीदार सुरुवातीच्या काळात खूप कमी होते. पण हळूहळू लोकांमध्ये ही संकल्पना जशी रुजली, तसे त्यातील विचारही रुजले आणि प्रतिसाद वाढत गेला. 
 7. दर्पणवर प्रथमपासूनच बाळशास्त्री जांभेकरांच्या विचारांचा आणि व्यक्तिमत्त्वाचा ठसा होता. दर्पण अशा रीतीने साडे आठ वर्षे चालले आणि जुलै, इ.स. १८४० ला त्याचा शेवटचा अंक प्रकाशित झाला.

मराठीतले पहिले मासिक 'दिग्दर्शन' 

 1. मराठीतले पहिले मासिक 'दिग्दर्शन' त्यांनी इ.स. १८४० साली सुरू केले. 
 2. 'दिग्दर्शन' मधून ते भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, व्याकरण, गणित तसेच भूगोल  व इतिहासावर लेख प्रकाशित करत. 
 3. भाऊ दाजी लाड, दादाभाई नौरोजी हे त्यांचे विद्यार्थी त्यांना या कामी मदत करत.
 4. या मासिकाचे संपादक म्हणून त्यांनी ५ वर्षे काम पाहिले. या मासिकातून त्यांनी भूगोल, इतिहास, रसायन शास्त्र, पदार्थ विज्ञान, निसर्ग विज्ञान आदी विषयांवर्चे लेखन नकाशे व आकृत्यांच्या साहाय्याने प्रसिद्ध केले. 
 5. या अभिनव माध्यमातून त्यांनी लोकांची आकलनक्षमता वाढवण्याचा प्रयत्‍न केला.

सन्मान

 • ‘बाँबे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’चे ‘नेटिव्ह सेक्रेटरी’, अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक, एल्‌फिन्स्टन इन्स्टिट्यूटमध्ये पहिले असिस्टंट प्रोफसर, शाळा तपासनीस, अध्यापनशाळेचे (नॉर्मल स्कूल) संचालक अशा अनेक मानाच्या जागांवर त्यांनी काम केले. 
 • त्यांना ‘जस्टिस ऑफ द पीस’ ही करण्यात आले होते (१८४०).
 • ६ जानेवारी, इ.स. १८३२ रोजी दर्पण वृत्तपत्राच्या पहिला अंक प्रकाशित झाला, तसेच योगायोगाने ६ जानेवारी हा जांभेकरांचा जन्मदिवसही असल्यामुळे हा दिवस दर वर्षी महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा होतो.

अधिक माहितीसाठी :-

Wednesday, 3 January 2018

शिक्षणप्रसारक, समाजसुधारक - सावित्रीबाई फुले

सावित्रीबाई जोतीराव फुले


जन्म :- जानेवारी ३, इ.स. १८३१ , नायगाव, सातारा, महाराष्ट्र.

मृत्यू :- मार्च १०, इ.स. १८९७, पुणे, सातारा, महाराष्ट्र.


 • वडील :- खंडोजी नेवसे.
 • आई :- लक्ष्मीबाई नेवसे.
 • पती :- महात्मा फुले.
 • टोपणनाव :- सावित्री, क्रांतिज्योती.


 • सावित्रीबाई फुले ) या मराठी शिक्षणप्रसारक, समाजसुधारक महिला होत्या. 
 • महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतिराव फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली.
 • सावित्रीबाई या मराठीतील पहिल्या कवयित्री आहेत.

जीवन 

 • सावित्रीबाईंच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर गावचे पाटील असणार्‍या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते. 
 • इ.स. १८४० साली जोतिराव फुल्यांशी सावित्रीबाईंचा विवाह झाला. लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंचे वय नऊ, तर जोतिरावांचे वय तेरा वर्षांचे होते. 
 • सावित्रीचे सासरे गोविंदराव फुले हे मुळचे फुरसुंगीचे क्षीरसागर, परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली म्हणून ते पुण्याला येऊन राहिले व फुलांच्या व्यवसायावरून त्यांना फुले हे आडनाव मिळाले.
 • सावित्रीबाईंचे पती जोतिराव यांना लहानपणापासूनच मातृप्रेम लाभले नाही. त्यांची मावस बहीण सगुणाऊ यांनीच त्यांचा सांभाळ केला होता. 
 • सगुणाऊ एका इंग्रज अधिकार्‍याच्या मुलाच्या दाई म्हणून काम करायच्या. त्यांना इंग्रजी कळायचे व बोलताही यायचे. 
 • त्यांनी आपल्या या ज्ञानाचा उपयोग जोतिरावांना प्रेरित करण्यासाठी केला. जोतिरावही शिक्षणाकडे आकर्षित झाले. 
 • सावित्रीबाईंना ख्रिश्चन मिशनर्‍यांनी लग्नापूर्वी दिलेले एक पुस्तक त्या सासरी घेऊन आल्या होत्या. त्यावरून जोतिरावांनाही एक नवा मार्ग सापडला त्यांनी स्वतः शिकून सावित्रीबाईंना शिकवले. 
 • सगुणाऊ तर सोबत होतीच. दोघींनी रीतसर शिक्षण घेतले.

शैक्षणिक कार्य व सामाजिक कार्य


 • १ मे, इ.स. १८४७ रोजी सावित्रीबाईंनी सगुणाऊला मागासांच्या वस्तीत एक शाळा काढून दिली. ही त्यांची पहिली शाळा. 
 • सगुणाऊ तेथे आनंदाने व उत्साहाने शिकवू लागल्या. पुढे ही पहिली शाळा मध्येच बंद पडली.
 • १ जानेवारी, इ.स. १८४८ रोजी भिडेवाड्यात जोतिराव आणि सवित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली. 
 • सा-या कर्मठ समाजाच्या विरोधाला न जुमानता विवाहानंतर शिक्षण घेतले आणि शिक्षक, मुख्याध्यापक बनून शिक्षण दिले.
 • १८४७-१८४८ साली केवळ चार वर्षांत 18 शाळा उघडल्या आणि चालवल्या.
 • बाला-जरठ विवाहप्रथेमुळे अनेक मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या. ब्राह्मण  समाजात विधवा पुनर्विवाह अजिबात मान्य नव्हता. पतीच्या निधनानंतर अशा विधवांना सती जावे लागे किंवा मग त्यांचे केशवपन करून कुरूप बनविले जाई. 
 • जोतिरावांनी या समस्येवर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले. 
 • केशवपन बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करणे व त्यांचा संप घडवून आणणे, पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणे अशी अनेक कामे सावित्रीबाईंनी कल्पकतेने पार पाडली.
 • महात्मा फुले यांच्या निधनानंतर (इ.स. १८९०) सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा वाहिली.
 • आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केला. ‘काव्यफुले’ व ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले.

 • इ.स. १८९६-९७ सालांदरम्यान पुणे परिसरात प्लेगच्या  साथीने धुमाकूळ घातला.  हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेऊ लागला. हा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यावर ब्रिटिश शासनाने जबरदस्तीने संभाव्य रुग्णांना वेगळे काढून स्थानांतरित करण्याचा खबरदारीचा उपाय योजला. यातून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीबाईंनी प्लेगपीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. त्या रोग्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आधार देऊ लागल्या. प्लेगच्या रोग्यांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला. त्यातून १० मार्च, इ.स. १८९७ रोजी त्यांचे निधन झाले.
 • सावित्रीबाईनी जोतिबांच्या सर्व कार्यात हिरीरीने भाग घेतला स्त्रियांनी शिकावे हे त्यांचे ब्रीद वाक्य होते. 1. पुणे येथील हे शिक्षण कार्य पाहून १८५२मध्ये ईस्ट इंडिया कंपनी सरकारने फुले पतिपत्‍नींचा मेजर कॅन्डी यांच्या हस्ते जाहीर सत्कार केला आणि शाळांना सरकारी अनुदानही देऊ केले.
 2. सावित्रीबाईंच्या सामजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून १९९५ पासून ३ जानेवारी हा सावित्रीबाईचा जन्मदिन हा “बालिकादिन ” म्हणून साजरा केला जातो.

Tuesday, 19 December 2017

१९ डिसेंबर गोवा मुक्ति दिन

गोवा मुक्तिसंग्राम


१९ डिसेंबर १९६१ रोजी भारतीय सेनेने गोवा राज्याला पोर्तुगीजांच्या तावडीतून सोडवण्यासाठीचे आंदोलन केले गेले त्यास गोवा मुक्तिसंग्राम असे संबोधतात.


 • दादरा व नगर हवेली हा पोर्तुगीज हिंदुस्थानातील प्रदेश त्यापूर्वीच मुक्त करण्यात आला होता. गोव्याच्या मुक्तीबरोबर पोर्तुगीजांचे हिंदुस्थानातील सुमारे ४५० वर्षांचे राज्य समाप्त झाले.


 • १९६१च्या युद्धानंतर भारतभूमीवरील उरलेसुरले पोर्तुगीज अधिपत्य समाप्त झाले, तसेच गोवा, दमण व दीव हा प्रदेश संपूर्णपणे मुक्त झाला. 


 • पुढच्याच वर्षी गोवा भारतीय संघराज्यात सामील झाले. सुरुवातीला लष्करी प्रशासकाकडे कारभार होता. 
 • नंतर निवडणुका होऊन २0 डिसेंबर १९६३ रोजी लोकनियुक्त मंत्रिमंडळ अस्तित्वात आले. 
 • २२ जानेवारी १९६५ रोजी गोवा विधिमंडळाने हे राज्य महाराष्ट्रात विलीन करावे, असा ठराव केला होता; परंतु १६ जानेवारी १९६७ रोजी यासंदर्भात घेतलेल्या सार्वमतानुसार गोवा केंद्रशासित राज्य असावे, असे ठरले. 
 • गोव्यात निवडणूक होऊन दयानंद बांदोडकर यांच्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची सत्ता आली. 

    बांदोडकर यांच्या मृत्यूनंतर १९७३ मध्ये शशिकला काकोडकर त्याच पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री झाल्या.

 • या अर्थाने, १९६१चे युद्ध हा गोवा मुक्ती आंदोलनाचा (किंवा खरे तर गोवा मुक्ती प्रक्रियेचा) शेवटचा व अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा होता.
 • हे मुक्तियुद्ध म्हणजे गोवा मुक्ती आंदोलनाचा फक्त एक लहानसा (परंतु निर्णायक) भाग होता. 
 • या युद्धाव्यतिरिक्त गोवा मुक्ती आंदोलनाचा खूप मोठा इतिहास आहे, ज्यामध्ये स्थानिक गोवेकर स्वातंत्र्यसैनिकांचा खूप मोठा वाटा आहे.
 • गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी डॉ. टी. बी. कुन्हा यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांना गोव्याच्या ‘राष्ट्रवादी चळवळीचे जनक’ म्हटले जाते. 
 • डॉ. कुन्हा पॅरिसहून शिक्षण घेऊन परतल्यानंतर त्यांनी गोव्याच्या स्वातंत्र्यलढय़ात सहभाग घेतला. 
 • सन १९२८ मध्ये गोवा कॉँग्रेस समितीची स्थापना केली. त्यांना पोर्तुगीजांनी अनेकदा अटक करून कारागृहात डांबले. डॉ. कुन्हा यांनी काही काळ ‘फ्री गोवा’ हे वृत्तपत्रही चालवले. 
 • ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ. राम मनोहर लोहिया यांनी गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी प्रदीर्घ काळ लढा दिला. १८ जून १९४६ रोजी गोव्यातील मडगाव येथे त्यांनी मोठी सार्वजनिक सभा घेऊन जनक्रांतीची ज्योत पेटविली.

गोवा मुक्तीसाठी खरी सुरुवात :-


 • गोवा मुक्तीसाठी १९५0 पासून संघर्ष जोर धरू लागला. 
 • १९५४ मध्ये आंदोलकांनी गोव्याच्या स्वातंत्र्यसैनिकांच्या साथीने दादरा-नगरहवेली मुक्त केले. 
 • १५ ऑगस्ट ११५५ रोजी गोव्याला मुक्त करण्यासाठी तीन हजार सत्याग्रहींनी आंदोलन सुरू केले. 
 • या निशस्त्र सत्याग्रहींवर पोर्तुगालच्या सैन्याने अमानुष गोळीबार केला. त्यात तीन सत्याग्रही मृत्युमुखी पडले. 
 • या घटनेने संपूर्ण देशभरातील वातावरण तापले. देशातील वाढत्या दबावामुळे भारताने पोर्तुगालशी राजकीय संबंध पूर्णत: तोडले; मात्र या कालावधीत पाकिस्तान पोर्तुगीजांच्या मदतीला धावला. 
 • त्यामुळे भारताच्या बहिष्काराचा पोर्तुगालवर फारसा परिणाम होऊ शकला नाही. 
 • १९५६-५७ मध्ये जनमत चाचणी घेण्याचा पर्याय पुढे आला; मात्र तो पोर्तुगालने धुडकावून लावला. पुढील पाच वर्षे आंदोलने होत राहिली; परंतु पोर्तुगीजांनी गोव्यावरील ताबा सोडला नाही. 
 • भारत कधी ना कधी गोव्याच्या मुक्तीसाठी लष्करी कारवाई करीलच, ही बाब पोर्तुगालचे तत्कालीन पंतप्रधान अँँटोनियो द ओलिवेरा यांच्या लक्षात आली होती. 
 • त्यामुळे त्यांनी सावध होत ब्राझील, इंग्लंड, अमेरिका व मॅक्सिको या देशांना मध्यस्थी करण्याची विनंती केली. 
 • त्यातून काही निष्पन्न होत नसल्याचे पाहून पोतरुगाल संयुक्त राष्ट्रसंघाकडे गेला. तेथेही त्यांची डाळ शिजली नाही. 
 • आझाद गोमंतक दल, गोवा लीग, गोवा मुक्ती फौज, विमोचन समिती अशा अनेक संघटनांनी गोव्याचे स्वातंत्र्य जवळ आणले. अखेर १८ डिसेंबर १९६१ रोजी भारताने लष्करी कारवाई केली.
 • १९ डिसेंबर १९६१ रोजी भारतीय सेनेने गोवा राज्याला पोर्तुगीजांच्या तावडीतून सोडविले.

अधिक माहितीसाठी :-

Monday, 18 December 2017

अ‍ॅन्झूस करार • अॅरन्झूस करार म्हणजे १ सप्टेंबर १९५१ ला .ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व अमेरिकेची संयुक्त संस्थाने ह्या पॅसिफिक महासागराशी संबंधित तीन देशांनी आपल्या रक्षणासाठी केलेला लष्करी करार म्हणजेच अ‍ॅन्झूस करार होय.
यांस 'पॅसिफिकमधील त्रिपक्षीय संरक्षण तह' असेही म्हणण्यात येते.
 • ह्या देशांच्या इंग्रजी नावांच्या आद्याक्षरांवरून हे नाव अ‍ॅन्झूस (ANZUS) प्रचलित झाले.
 • दुसऱ्या महायुद्धानंतर जपानशी झालेल्या तहावर ह्या तीन राष्ट्रांनी स्वाक्षऱ्या केल्या; त्याच सुमारास हा लष्करी करार केलेला आहे.
 • जपानच्या पुनरुत्थानामुळे ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड ह्या राष्ट्रांना भीती वाटू लागली.
 • त्याचप्रमाणे १९४७ नंतर भारतासारखे आशिया खंडातील मोठे देशही स्वतंत्र झाले. चीनमध्ये कम्युनिस्ट राजवट प्रस्थापित झाली.
 • पूर्वेकडील ब्रिटिश साम्राज्याचा लोप होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत होती व त्यामुळे ब्रिटन ह्या राष्ट्रांचे संरक्षण करण्यास असमर्थ आहे, हेही दिसत होतेच.
 • अशा राजकीय परिस्थितीच्या जाणिवेने ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड ह्या दोन गोऱ्या राष्ट्रांनी आपले अस्तित्व व ह्या प्रदेशांतील महत्त्व अबाधित राहावे, ह्यासाठी हा लष्करी करार केला.
 • ब्रिटिश राष्ट्रकुलातील राष्ट्रांनी स्वतंत्रपणे अमेरिकेशी लष्करी करार केल्याचे हे पहिले उदाहरण आहे.
 • ब्रिटनला प्रतिनिधित्व दिल्यास पूर्वेकडील ब्रिटिश साम्राज्यातील देश स्वायत्त झाल्यावर त्यांस प्रतिनिधित्व द्यावे लागले असते.
 • त्याचप्रमाणे ह्याच प्रदेशात हितसंबंध असलेल्या फ्रान्ससारख्या देशांना वगळणेही कठीण झाले असते.
 • ब्रिटनला ह्या करारातून वगळण्यात आले, एवढेच नव्हे, तर ह्या करारात आणखी कोणासही समाविष्ट करू नये, असेही ह्या तीन राष्ट्रांनी ठरविले होते.
 • पॅसिफिक महासागरात वसलेल्या ह्या देशांना आशियाई देशापासून संरक्षण मिळावे, हा ह्या करारामागील हेतू स्पष्ट दिसतो.
 • सीटोच्या लष्करी करारामुळे आग्नेय आशियातील कम्युनिस्ट-प्रसारात प्रतिबंध घातला गेला व त्या करारात हे तीनही देश सहभागी आहेत.


अधिक माहीतीसाठी :-

Thursday, 30 November 2017

शाहू, फुले, आंबेडकर पुरस्कार...

सामाजिक न्यायासाठी अखंडपणे लढणाऱ्या महात्मा जोतीराव फुले, छ. राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब अांबेडकर या तीन महापुरुषांचे नाव या पुरस्काराला दिलेले आहे.


तसेच शाहू, फुले, आंबेडकर पुरस्कार हा महाराष्ट्र राज्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांच्या सामाजिक न्यायाच्या क्षेत्रातील योगदानामूळे महाराष्ट्राचे नांव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर एक प्रगत सामाजिक सुधारणावादी राज्य म्हणून घेतले जाते.

अशा सामाजिक न्याय क्षेत्रातील काम करणाऱ्या संस्थांना दिला जातो.

हा पुरस्कार "सन २००५-२००६ पासून सुरू करण्यात आला असून त्याचे वितरण सामाजिक न्यायदिनी केले जाते.


योजनेच्या प्रमुख अटी :-

समाज कल्याण क्षेत्रात मौलिक कार्य करणारी नोंदणीकृत संस्था असावी.

सामाजिक सेवेचा कालावधी १५ वर्षे असणे आवश्यक आहे.

संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांचा पोलीस अधिक्षक/पोलीस आयुक्त यांचेकडील चारित्र्य पडताळणी अहवाल असावा.


लाभाचे स्वरुप :-

एकूण ६ विभागातील प्रत्येकी एक प्रमाणे ६ संस्थांना प्रत्येकी रु. १५ लाख प्रमाणे पारितोषिकाची रक्कम देण्यात येते.

स्मृतीचिन्ह, चांदीचा स्क्रोल, सन्मानपत्र.


अधिक माहितीसाठी :-
www.reliableacademy.com

Saturday, 18 November 2017

•• प्लासीची लढाई..---

•• प्लासीची लढाई..:-


-- प्लासीची लढाई म्हणजे सात वर्षांचे युद्ध ह्या युद्धाचा भाग..


• दिनांक..-
जून २३, १७५७..

• स्थान..-
प्लासी, पश्चिम बंगाल..

• परिणती..-
ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीचा निर्णायक विजय..

• प्रादेशिक बदल..-
ब्रिटिश वेस्ट इंडिया कंपनीच्या कब्जात बंगाल..

• युद्धमान पक्ष..-

ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनी <> बंगालचा नवाब सिराज उद दौलाह,
फ्रेंच इस्ट इंडिया कंपनी..


-- प्लासीची लढाई जून २३, इ.स. १७५७ रोजी झालेली ब्रिटिश ईस्ट ईंडिया कंपनी व बंगालच्या नवाबच्या सैन्यांमधील लढाई होती..

-- ह्या लढाईत फ्रेंचांनी बंगालच्या नवाबाला मदत केली होती..

-- ही लढाई इंग्रजांनी जिंकलेली पहिली प्रमुख लढाई होती व बंगालचा मोठा प्रांत ब्रिटीश अखत्यारीत आला व इंग्रजांचे भारतावर अधिकृत रित्या राज्य चालू झाले जे पुढील १९० ( १५ ऑगस्ट १९४७ पर्यंत) वर्षे
टिकले..

-- ह्या राज्याची सुरुवात ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनी या नावाने होती..

-- ही लढाई कोलकाता पासून साधारणपणे १५० किमी वर भागीरथी नदीच्या काठी पलाशी गावाच्या नजीक झाली..

-- ही लढाई खरेतर युरोपातील इंग्रज व फ्रेंच चढाओढीमुळे झाली होती..

-- १७५६ ते १७६३ मध्ये इंग्रज फ्रेंचात युद्ध झाले त्यामध्ये शत्रुत्वापोटी फ्रेंच इस्ट इंडिया कंपनीने ब्रिटीशांविरुद्ध लढण्यास फौज पाठवली होती..

-- फ्रेंचांनी सिरज उद दौला ची इंग्रजांविरुद्ध लढण्यास मदत मागितली..

-- सिरज उद दौलाची फौज इंग्रजांपेक्षा मोठी होती..
त्यामुळे पराभवाच्या भितीने इंग्रजांनी सिरज उद दौलाचे विरोधकांना आपल्या बाजूने वळवले..

-- मीर जाफर जो सिरज उद दौलाचा माजी सेनापती होता त्याने लढाईच्या भूमीजवळ राहून लढाईत भाग न घेता इंग्रजांच्या विजयात हात भार लावला..

-- सिरज उद दौलाचा पराभव झाला व सरतेशेवटी इंग्रजांच्या हाती पडल्यावर ठार मारण्यात आले..

-- मीर जाफरला इंग्रजांनी आपल्या हातचे बाहुले बनवून नवाब बनवले..
या विजयाने संपूर्ण बंगाल प्रांत इंग्रजांच्या हाती आला..

-- या लढाईने ब्रिटीशांच्या अशिया खंडातील साम्राज्याचा पाया घातला..

-- बंगाल काबीज करताच राजकोषातून ब्रिटीशांना मोठ्या प्रमाणावर संपत्ती हाती पडली..

-- तसेच बंगालच्या सुपीक प्रांतावर अनेक प्रकारचे कर लादून मोठ्या प्रमाणात संपत्ती कमवण्यास सुरुवात केली याचा फायदा त्यांना आपली लष्करी ताकद वाढवण्यात झाला..• प्लासीची लढाई..---

Wednesday, 15 November 2017

•..जागतिक युध्द - व्हियेतनाम युद्ध..---

••..जागतिक युध्द - व्हियेतनाम युद्ध..:-


>> व्हियेतनाम युद्ध हे
शीत युद्ध ह्या युद्धाचा भाग आहे..


>> युद्धाचा कालावधी साधारणत..-
नोव्हेंबर १ इ.स. १९५५ ते एप्रिल ३० इ.स. १९७५ पर्यंत..
(१९ वर्षे, ५ महिने, ४ आठवडे व १ दिवस)..


>> स्थान..-
दक्षिण व्हियेतनाम, उत्तर व्हियेतनाम, कंबोडिया, लाओस..


>> परिणती..-
उत्तर व्हियेतनामचा विजय
अमेरिकी सैन्याची आग्नेय आशियातून माघार
व्हियेतनाम गणराज्य खालसा
व्हियेतनाम, कंबोडिया, लाओस मध्ये साम्यवादी सरकारे..


>> प्रादेशिक बदल..-
दक्षिण व्हियेतनाम व उत्तर व्हियेतनाम यांचे समाजसतावादी व्हियेतनाम गणराज्यात एकत्रीकरण..


>> व्हियेतनाम युद्ध हे शीत युद्धकालातील व्हियेतनाम, लाओस आणि कंबोडियामध्ये लढले गेलेले युद्ध होते..


-- हे युद्ध उत्तर व्हियेतनाम व त्याचे कम्युनिस्ट सहकारी विरुद्ध दक्षिण व्हियेतनाम, अमेरिका व त्यांचे कम्युनिस्ट-विरोधी सहकारी असे लढले गेले..

-- आग्नेय आशियामधील वाढत्या कम्युनिस्ट शक्तीला रोखणे हा अमेरिकेचा ह्या युद्धात पडण्याचा हेतू होता..

-- व्हियेत काँग ह्या दक्षिण व्हियेतनाममधील परंतु उत्तर व्हियेतनामच्या बाजूने लढणाऱ्या पक्षाने कम्युनिस्टविरोधी सेनेविरुद्ध शिवरायांच्या गनिमी काव्याचा वापर केला..

-- जवळजवळ २० वर्षे चाललेल्या ह्या युद्धात अखेरीस अमेरिकेला माघार घ्यावी लागली व ५८,२२० सैनिक गमावल्यानंतर १५ ऑगस्ट १९७३ रोजी अमेरिकेने आपले सर्व सैन्य ह्या युद्धामधून काढून घेतले..

-- एप्रिल १९७५ मध्ये दक्षिण व्हियेतनामची राजधानी सैगॉनवर उत्तर व्हियेतनामने कब्जा मिळवला व ह्या युद्धाचा अंत झाला..

-- युद्धाची परिणती म्हणून दक्षिण व उत्तर व्हियेतनामचे एकत्रीकरण झाले व व्हियेतनामचे साम्यवादी गणराज्य ह्या देशाची निर्मिती झाली..

-- तसेच आग्नेय आशियामधील कंबोडियामध्ये पोल पोटच्या नेतृत्वाखाली ख्मेर रूज ह्या कम्युनिस्ट पक्षाने सरकार स्थापन केले..

-- लाओसमध्ये देखील कम्युनिस्ट राजवट सत्तेवर
आली..जागतिक युध्द - व्हियेतनाम युद्ध..--

Tuesday, 14 November 2017

•• ..भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू..:--

•• ..भारताचे पहिले पंतप्रधान पंडित
जवाहरलाल नेहरू..:---- जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान व भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेले काँग्रेसचे लोकप्रिय नेते होते..
ते पंडित नेहरू या नावानेही ओळखले जातात..

-- -- पंडित जवाहरलाल नेहरू उर्फ चाचा नेहरू..

-- दिल्लीतील तीन मूर्ती भवन या सरकारी निवास
स्थानात ते रहात होते..
तीन मूर्ती भवन प्रशस्त होते..

-- भवन परिसरात भव्य बगीचा होता..
त्यात विविध फुलझाडी होती..
चाचा नेहरू यांना फुले फार आवडत होती..


>> जन्म..-
नोव्हेंबर १४, इ.स. १८८९..
अलाहाबाद, उत्तर प्रदेश, भारत..


>> मृत्यू..-
मे २७, इ.स. १९६४..
नवी दिल्ली, भारत..


>> पिता..-
मोतीलाल नेहरू ..

>> पत्नी..-
कमला नेहरू..
-- फेब्रुवारी ७ इ.स. १९१६ रोजी वयाच्या २६ व्या वर्षी त्यांचा विवाह कमला कौल यांच्याशी झाला..
-- श्रीमती कमला नेहरू यांचे फेब्रुवारी २८, इ.स. १९३६ रोजी निधन झाले..


>> अपत्ये..-
इंदिरा गांधी..


>> कार्यकाळ..-

01.-
भारताचे १ ले पंतप्रधान म्हणून..-

-- कार्यकाळ..-
ऑगस्ट १५, इ.स. १९४७ – मे २७, इ.स. १९६४..


02.-
१ ले भारतीय परराष्ट्रमंत्री म्हणून..-
-- कार्यकाळ..-
ऑगस्ट १५, इ.स. १९४७ – मे २७, इ.स. १९६४..


03.-
भारतीय अर्थमंत्री म्हणून..-
-- कार्यकाळ..-
ऑक्टोबर ८, इ.स. १९५८ – नोव्हेंबर १७, इ.स. १९५९..


>> पंडीत जवाहरलाल नेहरू यांचे राजकीय आयुष्य..-

-- जवाहरलाल नेहरू यांचे सुरुवातीचे शिक्षण घरीच खाजगी शिकवण्यांद्वारे झाले..

-- वयाच्या १५ व्या वर्षी ते इंग्लंडला आणि त्यानंतर दोन वर्षे ते हॅरो येथे शिक्षणाकरिता गेले. कॅम्ब्रिज विद्यापीठातून त्यांनी सामान्य विज्ञान (नॅचरल सायन्स) या विषयात पदवी घेतली..

-- ते १९१२ साली भारतात परतले आणि सरळ राजकारणात उतरले..

-- विज्ञार्थी दशेत असताना सुद्धा त्यांना पारतंत्र्यातील विविध देशांच्या स्वातंत्र्यसंग्रामात रुची होती..

-- आयर्लंड मधील सिन फेन मुव्हमेंट मध्ये त्यांनी विशेष रस घेतला..
त्यामुळे भारतात परतल्यावर ते आपसूखच स्वातंत्र्य चळवळीत खेचले गेले..

-- १९१२ मध्ये झालेल्या बंकीपूर काँग्रेस अधिवेशनाला ते उपस्थित होते..

-- १९१९ मध्ये ते होमरूल चळवळीचे अलाहाबादचे अध्यक्ष बनले..
१९१६ मध्ये ते प्रथमच महात्मा गांधींना भेटले आणि त्यांच्यापासून विलक्षण प्रेरित झाले..

-- १९२० साली त्यांनी उत्तर प्रदेशच्या प्रतापगढ जिल्ह्यात पहिला किसान मोर्चा काढला..

-- १९२०-२२ दरम्यान असहकार आंदोलनामुळे त्यांना दोनदा कारावास भोगावा लागला..

-- सप्टेंबर १९२३ मध्ये पंडित नेहरू अखिल भारतीय काँग्रेस परिषदेचे सचिव बनले..

-- १९२६ मध्ये त्यांनी इटली, स्वित्झर्लंड, इंग्लंड, बेल्जियम, जर्मनी आणि रशिया आदी देशांचा दौरा केला..

-- १९२८ मध्ये सायमन कमिशन विरोधात निदर्शने करताना त्यांना लाठी हल्ल्याला सामोरे जावे लागले..
त्याच वर्षी झालेल्या सर्वपक्षीय काँग्रेस सभेला ते उपस्थित होते..

-- १९२८ मध्येच त्यांनी स्वतंत्र भारत चळवळ सुरू केली..
१९२९ साली पंडित नेहरू भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष झाले..

-- तेथे संपूर्ण स्वातंत्र्य हेच ध्येय निश्चित केले गेले..

-- १९३० ते १९३५ दरम्यान मिठाचा सत्याग्रह आणि अशाच अन्य सत्याग्रहांमुळे नेहरूंना अनेकदा कारावास भोगावा लागला..

-- १९३० ते १९३५ दरम्यान मीठाचा आणि अन्य सत्याग्रहांमुळे त्यांना अनेकदा कारावास भोगावा लागला..

-- १९४२ मध्ये मुंबईत कॉंग्रेसच्या बैठकीत त्यांनी जोरदार भाषण केले..
त्याचवेळी गांधीजींना करा वा मरा चा नारा दिला..
दुसर्‍याच दिवशी नेहरूंसह सर्व प्रमुख नेत्यांना अटक करण्यात आली..
त्यावेळी नेहरूंसह काही नेत्यांना अहमदनगरच्या किल्ल्यात ठेवण्यात आले होते..
तेथेच नेहरूंनी “डिस्कव्हरी ऑफ इंडिया” हा ग्रंथ लिहिला..

-- ७ ऑगस्ट १९४२ रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मुंबई अधिवेशनात त्यांनी भारत छोडो ही क्रांतीकारी घोषणा केली..


-- १४ फेब्रुवारी, १९३५ रोजी त्यांनी अल्मोडा जेलमध्ये आपले आत्मचरित्र पूर्ण केले..

-- सुटकेनंतर ते स्वित्झर्लंड, इंग्लड, स्पेन आणि चीन येथे जाऊन आले..

-- ७ ऑगस्ट १९४२ रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मुंबई अधिवेशनात त्यांनी भारत छोडो ही क्रांतीकारी घोषणा केली..

-- पुढच्याच दिवशी त्यांना पुन्हा अटक करण्यात आली आणि त्यांना अहमदनगर किल्ल्यात नेण्यात आले..

-- ही त्यांची कैद ही सर्वांत दीर्घकाळी पण शेवटची ठरली..

-- एकंदर पं. नेहरूंनी ९ वेळा कारावास भोगला..

-- १९४५ मध्ये त्यांची सुटका करण्यात आली..
१९४६ मध्ये ते दक्षिण पूर्व आशियाला जाऊन आले..

-- त्यानंतर ६ जुलै, १९४६ रोजी त्यांना काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले..
१९५४ पर्यंत त्यांनी पदभार सांभाळला..


>> नेहरूंनी “डिस्कव्हरी ऑफ इंडिया” ग्रंथातून भारताचा गौरवशाली इतिहास तर शब्दांकित केला आहे..

-- केवळ भारतातच नव्हे तर जगभरात विविध कारणांनी गौरवल्या गेलेल्या गंगा नदीचं नेहरूंनी या ग्रंथात केलेलं वर्णन केले आहे..

-- नेहरूंची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत..
तुरुंगातून त्यांनी लिहिलेली ‘इंदिरेस पत्रे’ – लेटर्स टू इंदिरा हे त्यांचं आणखी एक स्मरणात राहिलेलं पुस्तक..


>>> १४ नोव्हेंबर म्हणजेच बालदिन या मागील ईतिहास..-

-- एकदा पंडितजी तमिळनाडूच्या दौर्‍यावर गेले होते..
चाचा नेहरूंना पाहण्यासाठी तेथील नागरिकांनी एकच गर्दी केली होती..

-- काही नागरिकतर सायकलीवर उभे राहून त्यांना बघत होते.. जागा भेटेल तेथून प्रत्येक जण पंडिजींना बघत होता..

-- पढे गेल्यानंतर हवेत उडणार्‍या रंगीबिरंगी फुग्यांनी पंडिजींचे लक्ष वेधले..
त्यांना गाडी थांबवायला सांगितली..
ते गाडीतून उतरले व फुगे खरेदी करण्यासाठी फुग्यावाल्याकडे गेले..
त्यांना फुगे खरेदी करताना पाहून सगळे आश्चर्यचकीत झाले..

-- नेहरूजींनी खरेदी केलेले फुगे उपस्थित सगळ्यांना वाटून दिले..
चाचा नेहरूंचे मुलांवर खूप प्रेम होते..
'मुले म्हणजे देवा घरची फुले' असं ते नेहमी म्हणत असत.
मुलेही त्यांना प्रेमाने चाचा नेहरू म्हणत होते..•• ..भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू..---

Monday, 13 November 2017

•• ..अलिप्त राष्ट्रगट चळवळ..---

•• ..अलिप्त राष्ट्रगट चळवळ..:--- अलिप्तता हा शब्दप्रयोग सर्वप्रथम पंडित नेहरूंनी १९५४ मध्ये कोलंबोतील एका भाषणात केला..

-- आंतरराष्ट्रीय क्षेत्रात लष्करी स्वरुपाच्या व गटातटाच्या राजकारणापासून अलिप्त राहणे म्हणजे अलिप्ततावाद होय..

-- ’होकारात्मक तटस्थता’ असा अलिप्ततेचा अर्थ लावता येईल..

-- भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू भारताच्या अलिप्ततावादाची धोरणाचे स्पष्टीकरण करताना म्हणतात की, “कोणत्याही राष्ट्राचे अंकित म्हणून न राहता, आम्ही एक स्वतंत्र राष्ट्र या नात्याने आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये भाग घेऊ; आम्ही सत्तागटाच्या राजकारणापासून अलिप्त राहू इच्छितो..

-- अमेरिका, रशिया या महासत्तांच्या गटामध्ये सामील न होता जागतिक व्यासपीठावर भारतास सन्मानाचे स्थान मिळविता येईल..”

-- ’अलिप्ततावादाचे उद्गाते’ असे नेहरूंना संबोधले जाते..

-- नेहरूंनी आपल्या आचरणातून अलिप्ततावादाला आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्त्वाचे स्थान प्राप्त करून दिले..

-- विधायक क्रियाशील व निश्चित स्वरूपाचा नीतीप्रवाह म्हणून अलिप्ततावादी धोरणास महत्त्व आहे..


>>> अलिप्त राष्ट्रगट चळवळीच्या उदयाची कारणे..-

-- नवस्वतंत्र राष्ट्रांमधील राष्ट्रवाद, वसाहतवादाला विरोध, विकासाचा आणि आर्थिक मदतीचा प्रश्न, सांस्कृतिक आणि वांशिक बंध : पाश्चात्य संस्कृतीहून या राष्ट्रांच्या संस्कृत्या अलग, विकासप्रक्रियेसाठी शांतीची आवश्यकता..


>>> अलिप्ततावादी चळवळीची मुख्य वैशिष्ट्ये..-

-- समाजवादाचा अंगीकार, आर्थिक विकासाबाबत क्रांतीकारक दृष्टिकोन, राजकीय दृष्टिकोन, संरक्षणसिद्धता, असामान्य नेतृत्व..


>>> अलिप्त राष्ट्रगट चळवळीचा प्रमुख उद्देश..-

-- धोरण ठरविण्याबाबत स्वातंत्र्याची इच्छा, सार्वत्रिक युद्धात न गुंतण्याची इच्छा, जागतिक शांततारक्षण, आर्थिक विकास, नैतिक युक्तिवाद, संयुक्त राष्ट्रांच्या कार्यात सहकार्य, आणि परस्परांना आर्थिक आणि तांत्रिक मदत..


>>> अलिप्त राष्ट्रगट चळवळीमागील दोष..-

-- अर्थाबाबत संदिग्धता आणि स्पष्ट विश्लेषणाचा अभाव..

-- काही अभ्यासकांच्या मते हे धोरण राष्ट्रहित जोपासणारेच असून वेळ आल्यास संधिसाधूपणास राजरोस मान्यता देणारे आहे..

-- अलिप्त राष्ट्रगट चळवळीच्या इतिहासात याची उदाहरणे सापडतात हे खरेच आहे..


>>> १९५५साली इंडोनोशियातील बांडुंग इथे भरलेली आफ्रो-आशियाई राष्ट्रांची परिषद हा या चळवळीचा प्रारंभबिंदू मानला जातो..

त्यानंतरच्या काही प्रमुख  अलिप्त राष्ट्रगट चळवळी..-->>


>> १९६१ - बेलग्रेड परिषद..-

-- २६ सदस्य आणि ३ निरीक्षक राष्ट्रांचा सहभाग..
सत्तावीस मुद्द्यांचा जाहीरनामा – वसाहतवाद व वंशवादाला विरोध, परतंत्र देशांना स्वातंत्र्य देण्याची मागणी (अल्जीरिया, ट्युनिशिया, अंगोला, कांगो)..

-- १९६१ ते १९६४ या काळातील काही घटना -
पंडित नेहरूंचे निधन, क्युबामधील अण्वस्त्रांचा प्रश्न, चीनचे भारतावरील आक्रमण..


>> १९६४ - कैरो परिषद -

-- ४७ सदस्य आणि ११ निरीक्षक राष्ट्रांचा सहभाग..

-- ’शांतता आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याची योजना’ या नावाचा जाहीरनामा – नि:शस्त्रीकरणाचे आवाहन,
अण्वस्त्रनिर्मिती रोखण्याचे आवाहन,
भूमिगत अणुस्फोटांवरही बंदीची मागणी..


>> १९७० - लुसाका परिषद -

-- ५४ सदस्य, ९ निरीक्षक..

-- ’अलिप्ततावाद आणि आर्थिक प्रगती’ नावाचा जाहीरनामा..

-- वसाहतीवादी पोर्तुगाल आणि वंशभेदी दक्षिण आफ्रिका या देशांबरोबरचे आर्थिक आणि राजनैतिक संबंध तोडण्याचा ठराव..

-- इज्राइलने अरब राष्ट्रांच्या भूमीवरून बिनशर्त माघार घ्यावी असा ठराव..

>> १९७३ - अल्जिअर्स परिषद -

-- ७६ सदस्य, ९ निरीक्षक..

-- जगातील निम्म्याहून अधीक सार्वभौम राष्ट्रे सदस्य..

-- अनेक आर्थिक आणि राजकीय सहकार्याचे ठराव मंजूर..

-- आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेतून विकसनशील देशांच्या हिताला हानी होऊ नये अशी मागणी..
इज्राइलने माघार घ्यावी या मागणीचा पुनरुच्चार..

>> १९७६ - कोलंबो परिषद -

-- ८६ सदस्य..

-- सामूहिक स्वावलंबनावर विचार,
सौदेबाजीतून विकसनशील राष्ट्रांचे
आर्थिक अधिकार सुरक्षित ठेवण्याचा निर्णय,
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील कायम सदस्यांचा नकाराधिकार रद्द करण्याची मागणी,
नव्या आणि न्याय्य आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेच्या स्थापनेची मागणी..


>> १९७९ - हवाना परिषद -

-- ९४ सदस्य..

-- मतभेद स्पष्टत: दाखविणारी परिषद..

-- क्युबा व व्हिएटनाम यांचा समाजवादी गटाशी जवळिकीचा तर सिंगापूर व झायरे यांचा पाश्चात्य गटाशी जवळिकीचा इरादा..

-- समाजवाद हा अलिप्ततेचा ’स्वाभाविक सहकारी’ आहे ह्या फिडेल कॅस्ट्रोंच्या युक्तिवादास भारत आणि इतर राष्ट्रांचा आक्षेप..

-- कॅम्पडेविड समझोत्यामुळे इजिप्तच्या हकालपट्टीची इतर अरब देशांची मागणी..

-- हिंदी महासागर ’शांतता क्षेत्र म्हणून जाहीर करण्याची
मागणी..


>> १९८३ - नवी दिल्ली परिषद -

--.९९ सदस्य, २० निरीक्षक, १९ पाहुणे..

-- अण्वस्त्रनिर्मिती व शस्त्रास्त्रस्पर्धा थांबविण्याचे आवाहन..

-- अणुचाचण्यांवर बंदीची मागणी,
आंतरराष्ट्रीय नियंत्रणाखाली अण्वस्त्रे नष्ट करण्याची मागणी,
हिंदी महासागरावरील लष्करी हालचाली थांबविण्याची आणि दिएगो गार्सिया बेट मॉरिशसला परत करण्याची मागणी,
पॅलेस्टिनींना पाठिंबा देण्याचे आवाहन,
अविकसित राष्ट्रांच्या विकासासाठी प्रस्थापित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेच्या पुनर्रचनेची मागणी..


>> १९८६ - हरारे परिषद -

-- १०१ सदस्य राष्ट्रे, रौप्य महोत्सव..

-- जगाच्या दोन तृतीयांश लोकसंख्येचे प्रतिनिधी..

-- वंशवादी दक्षिण आफ्रिकेविरूद्ध कडक निर्बंध,
नामिबियाच्या स्वातंत्र्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या खास अधिवेशनाची मागणी,
 ’आफ्रिका निधी’ची स्थापना,
इराण-इराकने युद्ध थांबविण्याची मागणी..


>> १९८९ - बेलग्रेड परिषद -

-- १०३ सदस्य राष्ट्रे..

-- राजीव गांधींची निसर्गाच्या रक्षणासाठी चळवळ उभी करण्याची मागणी..

-- विकसित राष्ट्रांशी संवाद सुकर व्हावा यासाठी ’पंधराच्या गटाची’ स्थापना..


>> १९९२ - जाकार्ता परिषद..

>> १९९५ - कोलंबिया परिषद..

>> १९९८ - डर्बन परिषद..

>> २००३ - क्वाला लुंपूर परिषद..

>> २००६ - हवाना परिषद..

>> २००९ - शर्म-अल-शेख परिषद -
११८ सदस्य, १७ निरीक्षक..•• ..अलिप्त राष्ट्रगट चळवळ..----

Wednesday, 1 November 2017

कलिंगचे युद्ध..:-

कलिंगचे युद्ध..--

✍ ..कलिंगचे युद्ध..:-👉 दिनांक :-
साधारणपणे इ.स.पू. २६५-२६१..

👉 स्थान :-
प्राचीन कलिंग, सद्य भुवनेश्वर (ओडिशा राज्य, भारत)..

👉 परिणती :-
मौर्यांचा विजय आणि कलिंगांचा पराभव..

👉 प्रादेशिक बदल :-
कलिंगचा मगधच्या साम्राज्यात समावेश..

👉 युद्धमान पक्ष :-
मौर्य साम्राज्य (सम्राट अशोक)
कलिंग (कलिंगराज)


-- कलिंगचे युद्ध सम्राट अशोकांनी इ.स.पू. २६१ मध्ये केलेले एक प्रमुख युद्ध होते..

-- कलिंगचे युद्ध हे भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय आहे..

-- सुरूवातीला अशोक हे युद्धखोर झाले होते..
सर्वत्र त्यांची ओळख चंड अशोक म्हणून होऊ लागली होती..

-- अखंड भारताचा बहुतांशी भाग मौर्य अधिपत्याखाली आला तरी अजूनही कलिंग हे स्वतंत्र राज्यच होते..

-- प्राचीन कलिंग ह्या देशात हे आजच्या आधुनिक भारतातील ओडिशा तसेच छत्तीसगड व झारखंड मधील काही भाग येतात..


👉 युद्धाची कारणे :-

-- कलिंग युद्धाची कारणे अजून स्पष्ट होत नाहीत..
सामाजिक तसेच आर्थिक कारणे ही मुख्य मानली जातात..

-- त्यातील एक प्रमुख कारण म्हणजे कलिंग हे प्रबळ राज्य होते..

-- मौर्यांच्या पूर्वीच्या मोहिमांना फारसे यश लाभले नव्हते..
तसेच बाह्य जगाशी व्यावसायवृद्धीसाठी अशोकाला समुद्र किनाऱ्यावर सत्ता हवी होती, जी कलिंगाकडे होती..

-- तिसरे कारण अजूनही स्पष्ट नाही ते म्हणजे कलिंग हे खनिज समृद्ध देश होता..
त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अशोकाने युद्ध केले असावे..

-- कारणे असली तरी युद्ध होण्यासाठी सबळ कारणाची गरज होती..

-- युद्ध साधारणपणे इस पूर्व २६१ सुमारास सुरु झाले..
सुशीम चा एक भावाने कलिंगामध्ये मदत घेतली होती..

-- अशोक ने हे कारण मानले व कलिंगला शरण येण्यास सांगितले..


👉 कलिंग युद्धाचे परिणाम :-

-- या युद्दाच्या शिलालेखावरील नोंदींनुसार साधारणपणे १ लाखाहून अधिक सैनिक व नागरिक मारले गेले होते..
मोठ्या प्रमाणावर नागरिकांना हद्दपार करण्यात आले..

-- कलिंगच्या युद्धाचे अशोकाच्या विचार आणि जीवनक्रमावर दूरगामी परिणाम झाले..

-- युद्धामध्ये मिळालेल्या विजयाचा आनंद न होता निरर्थक संघर्षाने तो दु:खी झाला..

-- केलेल्या कृत्याचा त्याला पश्चात्ताप झाला..
पश्चात्तापदग्ध अशोकाने परत कधीही युद्ध न करण्याचा निश्चय केला..

-- या युद्धानंतर कोणत्याही प्रकारचे दु:ख त्याला सहन होईनासे झाले..

-- मनुष्य आणि इतर प्राणी किंवा वनस्पतींचीही केलेली हिंसा त्याला आवडत नसे..

-- अहिंसेच्या सिद्धांताने तो विलक्षण प्रभावित झाला..
या युद्धानंतर लवकरच अशोकाने बौद्ध धर्माची दिक्षा घेतली आणि देशविदेशात त्याचा प्रसार करण्यासाठी आपली सर्व शक्ती आणि साम्राज्याची साधनसंपत्ती पणाला लावली..

-- या लढाईनंतर अशोकाने दिग्विजयाच्या धोरणाचा त्याग करुन धर्मविजयाच्या धोरणाचा अवलंब केला..

-- त्याच्या परराष्ट्रीय धोरणातही अमूलाग्र बदल झाला..

-- सैन्यबळावर विसंबून राहण्याऐवजी त्याने शांतता, मैत्री या सिद्धांतावर अधिक भर दिला; म्हणूनच कलिंगचे युद्ध ही मानवी संस्कृतीमधील एक महत्त्वाची घटना मानली जाते..

Tuesday, 26 September 2017

१८५७ चा उठाव..

१० मे १८५७ - २० जून १८५८

स्थान :- उ.भारतीय मैदानी प्रदेश,बंगाल

परिणती 

 • ईस्ट इंडिया कंपनीचा अंमल संपुष्टात.
 • शिपायांचा उठाव दडपला गेला.
 • ब्रिटीश राणीचा अंमल सुरू. • १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध हे १० मे १८५७ रोजी मीरत येथील लष्करछावणीतील बंडापासून सुरू झाले व लवकरच ते उत्तर व मध्य भारतातील अनेक ठिकाणी पसरले.
 • हा लढा १८५७चे स्वातंत्र्यसमर, पहिला भारतीय स्वातंत्र्यलढा, शिपाई बंडाळी अशा इतर नावांनीही ओळखला जातो..

उठावाची राजकीय कारणे 

 1. सन 1600 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली.
 2. व्यापार करणे हा कंपनीचा मुख्य हेतु होता.
 3. परंतु भारतातील अस्थिर राजकीय परिस्थितीचा फायदा घेऊन कंपनीने सत्ताविस्तारास सुरुवात केली.
 4. र्लॉड वेलस्ली, र्लॉड हेस्टिंग्ज र्लॉड डलहौसी या गव्हर्नर जनरलची प्रचंड सत्ताविस्तार करुन सर्व देशभर कंपनीचे वर्चस्व निर्माण केले.
 5. कंपनीच्या या राजकीय हस्तक्षेपामुळे ज्या संस्थानिकांच्या सत्ता नामशेष झाल्या ज्यांचे व्यापार, उद्योग बुडाले ते लोक असंतुष्ट झाले.
 6. इ.स. 1798 मध्ये वेलस्ली गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला.
 7. त्याने तैनाती फौजेच्या पध्दतीचा अवलंब करून साम्राज्य विस्तारावर भर दिला.
 8. तैनाती फौज दुर्बल संस्थानिकांच्या अंतर्गत व बाहय संरक्षणासाठी देण्यात आली.
 9. याच्या मोबदल्यात संस्थानिकास कंपनीस रोख रकमेऐवजी आपल्या राज्याचा काही प्रदेश तोडून द्यावा लागे.या फौजेचा खर्च संस्थानिकास करावा लागे.
 10. इ.स. 1848 मध्ये र्लॉड डलहौसी गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला तो अतिशय महत्वाकांक्षी व साम्राज्यावादी वृत्तीवरचा होता. 
 11. र्लॉड डलहौसी देशी राज्यांना ब्रिटिश साम्राज्यात विलीन करण्यासाछी, खालसा पध्दतीचा अवलंब केला.

उठावाची धार्मिक कारणे

 1. इ.स. 1813 च्या चार्टर अॅक्टनुसार धर्मप्रसारासाठी कंपनीची मदत मिळू लागली.
 2. अनेक धर्म प्रसारक ख्रिश्चन धर्मप्रसारासाठी भारतात येऊ लागले.
 3. कंपनी सरकारने अनेक हिंदू मंदिरांची व मुस्लीम मशिदीची वतने काढून घेतली. यामुळे धर्मगुरु व मौलवंशीची अप्रतिष्ठा झाली. धार्मिक असंतोष वाढीस लागला.

उठावाची प्रमुख कारणे

 • बंगाल प्रांत काबीज केल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीने आपले साम्राज्यवादी धोरण पुढे नेत अनेक प्रदेश भारतीयांकडून जिंकले व रयतेवर जुलूमी शासन लादले.
 • कंपनीच्या सैन्यातील एकाच पदावर असलेल्या ब्रिटिश व भारतीय सैनिकांमध्ये भेद केला जात असे.
 • ब्रिटिश सैनिकाला भारतीय सैनिकापेक्षा अधिक सोयीसुविधा व पगार दिला जात असे.
 • कंपनी सरकारने भारतीयांना नीळ,अफू अशी नगदी पीके घेण्यास सक्ती केली.
 • भारतीयांकडून ही पीके ते स्वस्तात विकत घेत व चीनमधे जाऊन मोठ्या नफ्याने विकत.
 • शेतकरी,कामगारांकडून मोठ्या प्रमाणात करवसुली केली जात असे.
 • १८५७ च्या सुरुवातीला सरकारने नव्या बंदुका आणल्या.
 • त्या बंदुकांची काडतुसे गुळगुळीत होण्यासाठी गायीच्या वा डुक्कराच्या चरबीत बुडवलेली असत. गाय हिंदूना पवित्र तर डुक्कर मुसलमानांना निषिद्ध असते.
 • बंदुकीत भरण्यापूर्वी अशी काडतुसे ओठात धरून उघडावी लागत. त्यासाठी ती काडतुसे तोंडात घालण्याची जबरदस्ती केल्याने भारतीय सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता.
 • या व अशा कारणांमुळे शिपायांनी बंड पुकारण्याचे ठरवले.
 • खरे कारण भारतीयांना देश ईस्ट इंडिया कंपनीपासून मुक्त करायचा होता, हे आहे.


अधिक माहितीसाठी :-
www.reliableacademy.com

Thursday, 21 September 2017

हडप्पा संस्कृती...


-- हडप्पा संस्कृती ही जगातील प्राचीन ताम्र युगीन संस्कृतींपैकी एक आहे..

-- हिचा कालखंड लिबी यांच्या कार्बन १४ या शास्त्रीय पद्धतीनुसार इ.स.पूर्व २७०० ते इ.स.पूर्व १५०० असा मानला जातो..

-- इ.स. १९२० च्या सुमारास लाहोर-मुलतान रेल्वे मार्गाचे काम सुरू असताना काही प्राचीन विटांचे अवशेष सापडले..

-- यामुळे पुरातत्त्व खात्याने याचा शोध घेण्यासाठी --सर जॉन मार्शल-- यांच्या नेतृत्वाखाली उत्खनन सुरू केले आणि एक प्राचीन संस्कृती प्रकाशात आली..

-- या संस्कृतीचे प्रथम अवशेष हडप्पा येथे सापडले म्हणून नव्यानेच शोधलेल्या या संस्कृतीला हडप्पा संस्कृती असे म्हणतात..

-- ही संस्कृती प्रामुख्याने सिंधू नदीच्या प्रदेशात केंद्रित असल्याने तिला 'सिंधू संस्कृती' असेही म्हणतात..

-- उत्खननात हडप्पा व मोहनजोदडो या दोन्ही नगरांच्या ठिकाणी एकाच प्रकारच्या मुद्रा आढळून आल्या..

-- अशाच प्रकारच्या संस्कृतीचे अवशेष पश्चिम भारतात कालीबंगन, धोळावीरा, सुरकोटडा, लोथल, दायमाबाद इत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणात सापडले..

👉🏻 ..नगररचना..--

-- हडप्पा संस्कृतीची नगररचना व स्थापत्य अत्यंत प्रगत होते..

-- घरे, तटबंदी, सांडपाण्याची व्यवस्था, स्नानगृहे, धान्याची कोठारे, जहाजाची गोदी इत्यादी घटक पाहता हडप्पाकालीन संस्कृतीच्या प्रगत स्थापत्याची कल्पना येते..

-- प्राचीन इजिप्त व मेसोपोटेमिया या समकालीन संस्कृतींच्या अगदी विरुद्ध हडप्पामध्ये कोणतीही भव्य मंदिरे किंवा तत्सम बांधकामे नव्हती..

-- हडप्पाकालीन नगराची विभागणी प्रशासकीय इमारती व लोकवस्ती अशा दोन घटकांत करण्यात आलेली होती..

-- शहराच्या लोकवस्तीचा भाग बुद्धिबळाच्या पटाप्रमाणे किंवा जाळीप्रमाणे विविध प्रभागांमध्ये विभागला होता..

-- नगर बांधणीसाठीच्या विटा ४:२:१(लांबी:रुंदी:उंची) या प्रमाणातच असत..

👉🏻 ..घरे..--

-- हडप्पा संस्कृतीत प्रत्येक प्रभागात २० ते ३० घरे असत..
ती पक्क्या विटांची असून प्रशस्त होती..

-- प्रत्येक घरामध्ये स्नानगृह असे..
काही घरांच्या परसात विहिरी आढळल्या आहेत..

-- घरांच्या मध्यभागी, जसे आजही वाड्यांच्या व इतर भारतातील पारंपरिक घरांमध्ये असते, तसे.अंगण असे..
घरे एक किंवा दोन मजली
असत..

-- फारच क्वचित याहून अधिक मजले असत...

-- हडप्पाकालीन नगरांना संरक्षक तटबंदी असे..
तटबंदी रुंद असून तिचे बांधकाम पक्क्या विटांचे असे..
तटबंदीला बुरूज होते..
यावरून हडप्पा संस्कृतीने नगराच्या संरक्षणाकडे लक्ष दिल्याचे दिसते..

👉🏻 ..रस्ते..--

-- शहराच्या प्रभागाकडून जाणारे रस्ते मुख्य रस्त्यांना जोडलेले असत..

-- रस्ते पुरेसे रुंद असून ते एकमेकांना काटकोनांत छेदणारे होते..

-- रस्त्यांच्या कडेला सापडलेल्या लाकडांच्या अवशेषांवरून रस्त्यांवर दिवाबत्तीची सोय असावी असे दिसते..

👉🏻 ..स्नानगृह व सांडपाण्याची व्यवस्था..--

-- हडप्पा संस्कृतीत सार्वजनिक स्नानगृहे होती..
मोहनजोदडो येथे एका भव्य स्नानगृहाचे अवशेष सापडले..

-- या स्नानगृहाची लांबी १२ मीटर, रुंदी ७ मीटर आणि खोली २.५ मीटर आहे..

-- याच्या बाहेरच्या भिंती ७ ते ८ फूट रुंदीच्या असून कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र खोल्यांची व्यवस्था होती..

-- स्नानगृहाचे वापरलेले पाणी बाहेर सोडण्याची व शुद्ध पाणी आत आणण्याची व्यवस्था केलेली होती..

-- लोथल येथील उत्खननामध्ये एका प्रचंड गोदीचे अवशेष सापडले..

-- या गोदीची लांबी २७० मीटर तर रुंदी ३७ मीटर आहे..
या गोदीवरून जहाजबांधणी, व्यापार, व्यापारीमार्ग यांची माहिती या संस्कृतीमधील लोकांना होती असे दिसून येते..

-- येथे सापडलेल्या एका मुद्रेवर जहाजाचे चित्र कोरले आहे.. तसेच लोथल येथे पक्क्या विटांनी बांधलेली धान्य कोठारे सापडली आहेत..

-- हडप्पा संस्कृतीत सांडपाणी व पावसाचे पाणी गावाबाहेर वाहून नेण्यासाठी एक मीटर खोल भुयारी गटारांची व्यवस्था होती..

-- ही गटारे दगड व पक्क्या विटांनी बांधलेली होती..

👉🏻 ..समाजरचना..

-- हडप्पा संस्कृतीत कुटुंबसंस्था महत्त्वाची होती..

-- नगररचनेच्या अवशेषांवरून समाजात राज्यकर्त्यांचा वर्ग, व्यापारी वर्ग व सर्वसामान्यांचा वर्ग असल्याचे दिसते..

-- नद्यांच्या काठी सुपीक प्रदेशात ही संस्कृती विकसित झालेली असल्याने शेती हा समाज जीवनाचा कणा होता..

👉🏻 ..इतर माहीती..

-- हडप्पाकालीन संस्कृतीच्या उत्खननात एक शृंगारपेटी मिळाली..
यामध्ये ब्राॅन्झचे आरसे, हस्तिदंती कंगवे, केसासाठी आकडे, पिना, ओठ व भुवया रंगवण्यासाठी लागणाऱ्या विविध रंगाच्या कांड्या मिळाल्या..

-- हडप्पाकालीन लोकांना सौंदर्यप्रसाधनांप्रमाणेच अलंकाराची आवड होती.. उत्खननामध्ये मण्यांचे व सोन्याचे हार, बांगड्या, अंगठ्या, वाक्या, कमरपट्टा इत्यादी अलंकार मिळाले तसेच नर्तकीचा ब्राँझचा पुतळा मिळाला..
तिच्याही हातात बांगड्या व गळ्यात हार आहे..

-- हडप्पा संस्कृतीधील मातीच्या भांड्यांवर मिळालेले कापडाचे ठसे, मृण्मयमूर्तीवर दाखवलेले वस्त्र, उत्खननात मिळालेल्या विविध आकारांच्या सुया यावरून लोकांना वेशभूषेचे चांगले ज्ञान असल्याचे दिसते..

-- तसेच तत्कालीन मूर्तींवरून केशभूषेची माहिती मिळते..

-- पुरुष दाढी कोरत, मधोमध भांग पाडत तर स्त्रिया विविध प्रकारची केशरचना करत असत..

-- हडप्पाकालीन लोकांची सोंगट्या, फासे ही करमणुकीची साधने होती..

-- नृत्य, गायन, शिकार व प्राण्यांच्या झुंजी इत्यादींमधून करमणूक केली जाई..

-- तेथील लोकांचा प्रमुख आहार गहू होता. त्याचबरोबर जव, तीळ, वाटाणा, यासारखी दुय्यम धान्ये सुद्धा पिकवीत असत..

-- खजुराचा उपयोगही ते अन्न म्हणून करीत असत..
येथील लोक पशू बाळगीत त्यामुळे दूधदुभत्यांचा पुरवठा त्यांच्याकडे होत असावा..
तसेच मांसाहारही केला जात असे..

-- येथील लोक अनेक प्रकारच्या वजनांचा उपयोग करीत..
त्यांत दोराने उचलण्याच्या वजनापासून ते सोनाराने उपयोगात आणलेल्या लहानशा वजनापर्यंतचा समावेश होता..

-- वजन माप हे 16 च्या पटितील होते..

-- 0.8565 हे वजन कमीत कमी होते व 274.938 हे जास्तीत जास्त होते..

👉🏻 ..धर्मकल्पना..--

-- हडप्पा संस्कृतीत उत्खननात सापडलेल्या विविध मुद्रा, मूर्ती, अग्निकुंड, मृतांना पुरण्याची पद्धत यावरून त्यांच्या धार्मिक कल्पनेची माहिती मिळते..

-- लोकांची प्रामुख्याने शेतीवरती उपजीविका असल्याने लोक भूमातेस मातृदेवता मानत..

-- त्यांच्या धार्मिक जीवनात निसर्गशक्तीस महत्त्वाचे स्थान होते. सूर्य, जल, अग्नी, वृक्ष यांची ते पूजा करत..

-- कालिबंगन येथे सापडलेल्या अग्निकुंडावरून ते अग्निपूजा करत असल्याचे दिसते..

-- निसर्गदेवतेप्रमाणेच पशुपती, नाग, वृषभ म्हणजे बैल यांचीही ते पूजा करत होते..
लोक मूर्तिपूजक होते, मात्र हडप्पा संस्कृतीत मंदिरे आढळली नाहीत..

-- तेथील लोक मृतदेहाचे विधिपूर्वक दफन करत..
दफन करते वेळी त्यांचे सोबत अलंकार व भांडी ठेवली जात..

-- अंतविधी संस्कार:पूर्णसमाधी,आंशिकसमाधी,दाहकर्म..

👉🏻 ..या संस्कृतीच्या विनाशाची अनेक कारणे सांगितली जातात त्यातील काही प्रमुख कारणे..:--

१) नैसर्गिक संकटामुळे..-

- नदीला आलेला पूर/अतिवृष्टी
भूकंप..
- हवामानात होणारा बदल..
- जमिनीची सुपिकता घटली..
- थर वाळवंट विस्तारल्याने सरस्वती नदी लुप्त होणे..

२) बाह्य आक्रमणे..-
आर्यांचे आक्रमण
युयुत्सु लोकांचे आक्रमण..

३) तंत्रज्ञानावरील मक्तेदारी संपली..

४) राजकीय विघटनामुळे नाश..

५) आर्थिक विघटनामुळे नाश..

६) कायदा व सुव्यवस्था नसावी...

👉🏻 पुणे डेक्कन कॉलेज, खरगपूर येथील इंडियन इन्स्टिटय़ुट ऑफ टेक्नॉलॉजी व इतर संस्थांनी २०१६ साली केलेल्या एका नव्या संशोधनातून प्राचीन सिंधू संस्कृती ही ५५०० वर्षांपूर्वीची नसून ८००० वर्षांपूर्वीची असल्याचे निष्कर्ष काढले गेले आहेत..

👉🏻 ‘नेचर’ या विज्ञानसंशोधनविषयक नियतकालिकाच्या एप्रिल २०१६ च्या अंकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे..

👉🏻 २०१४ मध्ये तामिळनाडुतील शिवगंगा जिल्‍ह्यातील पल्‍लीसंथाई थिडल या गावात जमिनीखाली गाडले गेलेले हडप्‍पा संस्‍कृतीसारखे अवशेष आढळून आले आहेत..

👉🏻 बंगळूरू येथील पुरात्‍तव विभागाच्‍या संशोधकांनी याचा शोध लावला आहे..