Wednesday, 11 July 2018

चालु घडामोडी

भारताची अर्थव्यवस्था सहाव्या स्थानावर 


 • बलाढ्य अर्थव्यवस्थेच्या बाबतीत पहिले सहा देश :- अमेरीका, चीन, जपान, जर्मनी, ब्रिटन व भारत हे देश आहेत. 
 • जागतिक बँकेच्या २०१७ च्या अपडेटेड डेटामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. 
 • भारताचा जीडीपी गेल्यावर्षी २.९७ ट्रिलियन डॉलर होता. तर फ्रान्सचा २.५८२ ट्रिलियन डॉलर होता. मंदीनंतर भारताची अर्थव्यवस्था जुलै २०१७ नंतर पुन्हा एकदा मजबूत झाली. 
 • सध्या भारताची लोकसंख्या १ अब्ज ३४ कोटी आहे. तर फ्रान्सची लोकसंख्या ही ६ कोटी ७ लाख इतकी आहे. 
 • नोटबंदी आणि जीएसटीमुळे काही काळ थांबलेली मॅन्युफॅक्चरिंग आणि ग्राहक खर्चात वाढ झाल्याने भारतीय अर्थव्यवस्थेला चालना मिळाली. एका दशकात भारताचा जीडीपी दुप्पट झाला आहे. 
 • चीनची अर्थव्यवस्था मंदावल्यास भारत आशियातील प्रमुख शक्तीपैकी एक होईल. 
 • आंतरराष्ट्रीय चलन निधी (IMF) नुसार, यावर्षी भारताचा दर ७.४ टक्के राहू शकतो. तर २०१९ मध्ये भारताचा विकास दर ७.८ टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो. 
 • २०१७ मध्ये भारताचा जीडीपी ६.७ टक्क्यांनी वाढला मात्र याच कालावधीत चीनचा जीडीपी ६.८ टक्क्यांनी वाढला. 
 • त्यातही विशेष म्हणजे आधी भारताची अर्थव्यवस्था 7.1 टक्क्यांच्या गतीने वाढली होती, मात्र नोटाबंदीमुळे 2017 मध्ये ही वाढ मंदावत 6.7 टक्क्यांवर आली.


OUR TELEGRAM LINK https://telegram.me/mpscofficers


‘इज ऑफ डुइंग बिझनेस’मध्ये महाराष्ट्र १३ व्या स्थानी • इज ऑफ डुइंग बिझनेसमध्ये (उद्योगस्नेही वातावरण) क्रमानुसार प्रथम १३ राज्य :- आंध्र प्रदेश, तेलंगणा, हरयाणा, झारखंड, गुजरात, छत्तीसगड, मध्य प्रदेश, कर्नाटक, राजस्थान, उत्तर प्रदेश, ओडिशाचा आणि १३ व्या स्थानी महाराष्ट्र.

'इज ऑफ डुइंग बिझनेस'चे मुख्य उद्देश :- 

प्रत्येक राज्यांने त्यांच्या राज्यांमध्ये गुंतवणूदारांना आकर्षित करणे आणि व्यवसाय, व्यापारातील स्पर्धा वाढवण्याचा आहे.

 • इज ऑफ डुइंग बिझनेसमध्ये (उद्योगस्नेही वातावरण) आंध्र प्रदेश दुसऱ्यांदा प्रथम स्थानी आले आहे. आंध्र प्रदेश शेजारील तेलंगणा दुसऱ्या स्थानी आहे. 
 • गेल्या वर्षी देखील म्हणजेच २०१६ मध्ये ही आंध्र प्रदेश आणि तेलंगणा हे दोन्ही राज्ये अग्रस्थानी होते. 
 • पहिल्या वर्षी क्रमवारीत केवळ सात राज्यांनीच सरकारने सुचवलेल्या ५० टक्के सूचना लागू केल्या होत्या. दुसऱ्यांदा १८ राज्यांनी असे केले तर यंदाच्यावेळी २१ राज्य या सूचीत आले होते. 
 • जागतिक बँकेने काढलेल्या इज ऑफ डुइंग बिझनेसच्या यादीतही भारताची स्थिती सुधारली आहे. १९० देशांमध्ये भारत १०० व्या स्थानी आहे. जागतिक बँकेच्या यादीत ५० क्रमांकाच्या आत येण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.

 अधिक चालु घडामोडींकरीता WEBSITE :-www.reliableacademy.com