Friday, 26 January 2018

🇮🇳 ‘प्रजासत्ताक दिन’ (गणराज्य दिन) 🇮🇳 • भारताचे संविधान संविधान समितीने २६ नोव्हेंबर, इ.स. १९४९ रोजी स्वीकारले व २६ जानेवारी इ.स. १९५० रोजी पासून भारतीय संविधान अंमलात आले. 
 • जवाहरलाल नेहरूंनी २६ जानेवारी इ.स. १९३० रोजी लाहोर अधिवेशनात तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमला आणण्यासाठी निवडण्यात आला.
 • २६ जानेवारी, इ.स. १९५० रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधान अंमलात आणून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती.

काय आहे भारताचे संविधान

 • भारताचे संविधान (भारताची राज्यघटना) हा भारताचा सर्वोच्च कायदा व पायाभूत कायदा आहे.
 • १९५० साली अमलात आलेले भारतीय संविधान मुख्यत्वे १९३५च्या भारत सरकार कायद्यावर (Government of India Act of 1935) आधारित आहे.
 • ब्रिटिश पंतप्रधान क्लेमंट ॲटली यांच्या शिष्टमंडळाच्या स्वतंत्र भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यासाठी एका मसुदा समितीच्या स्थापनेविषयीच्या  कल्पनेस भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या नेत्यांनी सहमती दर्शविली होती.
 • १९४६च्या उन्हा़ळ्यात या समितीची स्थापना झाली व तिची पहिली बैठक ९ डिसेंबर १९४६ रोजी सच्चिदानंद सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथील संविधान सभागृह मध्ये पार पडली कि, जे आज सेंट्रल हॉल या नावाने परिचित आहे.
 • पहिल्या बैठकीला ९ महिलांसह एकूण २०७ सदस्य उपस्थिती होते . 
 • १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारतास स्वातंत्र्य मिळाल्यावर अल्पकाळ या समितीने भारताचे प्रतिनिधी रूपात काम केले होते.
 • २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मसूदा समिती स्थापन झाली. 
 • संविधानाचा मसुदा सभेपुढे ४ नोव्हेंबर १९४७ रोजी सादर करण्यात आला. या सभेने सार्वजनिक चर्चेसाठी सभागृहात हा प्रस्ताव १६६ दिवसांसाठी खुला केला आणि २ वर्ष,११ महिने आणि १८ दिवस चर्चा केल्यानंतर समितीने हा मसुदा अंतिम केला. 
 • बरेचसे विचार विमर्श आणि सुधारणा केल्यानंतर समितीच्या ३०८ सद्स्यांनी दोन हस्तलिखित प्रती (हिंदी आणि इंग्रजी ) २४ जानेवारी १९५० रोजी स्वाक्षरांकित केल्या. दोन दिवसानंतर हे संविधान संपूर्ण राष्ट्रासाठी लागू करण्यात आले.


संविधानाची काही ठळक वैशिष्टये पुढीलप्रमाणे : 

१.संसदीय लोकशाही,
२.मूलभूत अधिकार,
३.सामाजिक न्याय,
४.न्यायालयीन पुनर्विलोकन,
५.संघराज्य पद्धती,
६.मार्गदर्शक तत्त्वे.

२६ जानेवारीचे संचलन


 • स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या उपस्थितीत १९५० साली राजधानी दिल्ली येथे राजपथावर पहिले संचलन आयोजित करण्यात आले. भारताच्या विविधतेतून एकता या वैशिष्ट्याला ही मानवंदना होती. 
 • भारताच्या राजधानीत, म्हणजे नवी दिल्ली येथे, एक मोठे संचलन आयोजित केले जाते. 
 • हे संचलन रायसीना हिलपासून राष्ट्रपती भवनापर्यंत राजपथ मार्गाद्वारे जाते. 
 • संचलनाच्या अगोदर अनाम सैनिकांसाठी बनवले गेलेले स्मारक, अमर जवान ज्योती, येथे भारताचे पंतप्रधान पुष्पचक्र अर्पण करतात. 
 • भारतासाठी आपले प्राण अर्पण करणार्‍या वीर सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात येते. 
 • राष्ट्रगीत सुरु होताच राष्ट्रपती ध्वजारोहण करतात व २१ तोफांची सलामी दिली जाते.
 • त्यानंतर देशासाठी शौर्य गाजवलेल्या सैनिकांना राष्ट्रपतींच्या हस्ते अशोक चक्र आणि कीर्ती चक्र, हे मुख्य पुरस्कार देण्यात येतात. 
 • राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेली देशातील शूर बालके सजवलेल्या हत्तीवरून किंवा वाहनावरून या संचलनात सहभागी होतात.
 • प्रमुख पाहुणे म्हणून परराष्ट्रीय राष्ट्राध्यक्षांना निमंत्रण दिले जाते.{राजपुत्र शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान - संयुक्त अरब अमिराती (२०१७ चे प्रमुख पाहुणे)}.
 • आशियान शिखर परिषदेतील नेते २०१८ च्या 'प्रजासत्ताक' दिनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.


🇮🇳 जय हिंद 🇮🇳  
       🇮🇳 जय भारत 🇮🇳
             🇮🇳 जय महाराष्ट्र 🇮🇳


अधिक माहितीसाठी :-

Friday, 19 January 2018

वंगभंग चळवळ


सुरूवात - १६ ऑक्टोबर १९०५ रोजी.

 • मूळ कल्पना - सर विल्यम वार्ड (१८९६).
 • फाळणीस विरोध - सर हेन्री काटन (१८९६).
 • फाळणी विरोधात स्वदेशी चळवळीस सुरूवात - १७  ऑगस्ट १९०५.
 • वंगभंग चळवळ सुरु करण्यामागील कारण.- बंगालच्या फाळणीच्या विरोधात.

वंगभंग चळवळ

 • बंगालच्या फळणीविरोधी स्वदेशी तसेच वंगभंग आंदोलन या नावाने ओळखळे जात स्वदेशी चळवळीचा मुख्य कार्यक्रम चतुःसूत्री होय.
 • बंगाल प्रांताची फाळणी करण्याच्या ब्रिटिश राजवटीच्या धोरणाविरुद्ध झालेली १९०४-१९०५ ची चळवळ म्हणुन देखील ओळखली जाते.
 • ह्या चळवळीने राष्ट्रीय काँग्रेसमधील जहालांचा गट लोकप्रिय बनण्यास मदत झाली.
 • ब्रिटिश काळातील बंगाल प्रांत, विद्यमान पश्चिम बंगाल राज्य, बांगला देश, बिहार आणि ओरिसा एवढा भौगोलिक दृष्ट्या अवाढव्य होता. 
 • प्रशासनाच्या सोयीसाठी बंगालची फाळणी कशी करावी, यावर सुमारे दहा वर्षे चर्चा चालू होती. अखेर ही फाळणी राजकीय हितासाठी करण्याचे ठरले.
 • डिसेंबर १९०३ च्या अधिकृत पत्रकान्वये पूर्व बंगालचे चितगाँग, मैमनसिंग व टिपेरा हे तीन जिल्हे आसामला जोडण्याची योजना सरकारच्या विचाराधीन होती.
 • फेब्रुवारी १९०४ मध्ये व्हाइसरॉय कर्झनने ब्रिटिश सरकारला लिहिले की, ‘बंगाल्यांच्या आरडा ओरड्याला भिऊन आपण जर कच खाल्ली, तर बंगालला खच्ची करण्याची दुसरी संधी यानंतर मिळणार नाही’.
 • पूर्व बंगाल-आसामच्या नव्या प्रांतात मुसलमानांची प्रभावी बहुसंख्या असेल व ते त्यांना फायदेशीरच होईल, असे कर्झनने आवर्जून सांगितले.
 • फाळणीविरोधी आंदोलनाला शह देण्यासाठी प्रचंड कर्जाच्या ओझ्याखाली बेजार झालेल्या डाक्क्याच्या नबाबांना कर्जमुक्त करण्यासाठी नाममात्र व्याजावर दीर्घमुदतीचे चौदा लाख रूपयांचे कर्ज सरकारी तिजोरीतून देण्यात आले. मुसलमानांमध्ये फाळणीचा जबरदस्त पुरस्कार केला; पण त्याचा प्रभाव पडला नाही.
 • बंगाली मुसलमानही वंगभंग चळवळीत हिरिरीने सहभागी झाले. शेवटी डाक्का नबाबांनी डाक्क्यालाच मुस्लिम लीगचे स्थापना अधिवेशन भरविले. १९०५ च्या ऑगस्टमध्ये फाळणीचा निर्णय घोषित करण्यात आला.
 • १६ ऑक्टोबर रोजी फाळणी अंमलात आली.
 • गो. कृ. गोखले इंग्लंडला गेले. व फाळणी रद्द व्हावी म्हणून सर्वतोपरी प्रयत्न केले; पण त्याचा उपयोग झाला नाही.
 • जून १९०८ मध्ये ब्रिटिश पार्लमेंटमध्ये हिंदुस्थानच्या परिस्थितीवर चर्चा झाली. तेव्हा बंगाल फाळणीमुळेच भारतात असंतोष दीर्घकाळ भडकत राहिला आहे; बंगालची फाळणी करण्याऐवजी बिहार आणि ओरिसा वेगळे केले असते, तर लोकांचा रोष पतकरावा लागला नसता, असे अनेक सभासदांनी स्ष्टपणे बोलून दाखविले.
 • फेब्रुवारी १९०६ मध्ये पार्लमेंटमध्ये बोलताना भारतमंत्री लॉर्ड मोर्ले यांनी लोकांच्या भावनेची कदर न करता फाळणी करण्यात आली आहे, हे मान्य करूनही फाळणीचा निर्णय ही काळ्या दगडवरची रेघ आहे, असे जाहीर केले.
 • १९११ मध्ये आपल्या भारतभेटीच्या वेळी नूतन बादशाहा पंचम जॉर्ज यांनी हिंदुस्थानात आणि लॉर्ड मोर्ले यांनी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये फाळणी रद्द केल्याचे घोषित केले


वंगभंग चळवळी दरम्यान घडलेल्या महत्त्वाच्या घटना -

 • जनरल लॉर्ड कर्झन १८९९ साली भारताचा गवर्नर जनरल झाला. व त्याने १९०५ साली बंगालची फाळणी केली.
 • १९०५ साली राष्ट्रीय सभेचे अधिवेशन बनारस येथे झाले. आणि त्याचे नामदार गोपाळ कृष्ण गोखले अध्यक्ष झाले.
 • १९०६ साली राष्ट्रीय सभेचे अधिवेशन कोलकाता येथे व दादाभाई नौरोजी हे अध्यक्ष होते.
 • लोकमान्य टिळकांना मंडालेचा तुरुंगात ६ वर्षे कारावास झाला.
 • १९०६ साली मुस्लिम लीगची स्थापना झाली.
 • १९०९ साली मोर्ले मिंटो कायदा आला.
 • १९१६ साली लखनौ करार झाला.
 • १९१४ साली पहिले महायुद्ध व १९१९ साली दुसरे युद्ध झाले.
 • अँनी बेझंट व टिळक यांनी होमरूल चळवळ स्थापन केली.
 • १९१९ साली मोन्टेग्यू चेम्स्फार्ड कायदा स्थापना झाला.
 • १९२० साली लोकमान्य टिळकांनी निधन झाले.


अधिक माहितीसाठी :-

Thursday, 18 January 2018

सत्यशोधक समाज - महात्मा फुले

स्थापना - सप्टेंबर २४, इ.स. १८७३.

सत्यशोधक समाजाचे ध्येय - पुरोहितांकडून होणाऱ्या अन्याय, अत्याचारापासून , गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे.

 • घोष वाक्य - ‘सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥’
 • सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ - सार्वजनिक सत्यधर्म'.
 • `निर्मिकाचा धर्म सत्य आहे एक, भांडणे अनेक कशासाठी’ हा विचार फुले यांनी मांडला.
 • सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली.
 • सत्यशोधक समाजातर्फे पुरोहिताशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली.त्यासाठी मराठीत मंगलाष्टके रचली.

सत्यशोधक समाजाचे कार्य 

 • सत्यशोधक समाजाने लोकशिक्षणाबरोबरच शेतकऱ्यांची जमीनदार व सावकार यांच्या मगरमिठीतून सुटका करण्यासाठी अथक प्रयत्न केले. 
 • दीनबंधू , दीनमित्र वगैरे वृत्तपत्र-मासिकांतून शेतकऱ्यांची गाऱ्हाणी त्यांनी हिरिरीने मांडली. 
 • शेतकऱ्याचा आसूड मधून म. फुल्यांनी शासनाच्या नजरेस कृषिवर्गाची दुःस्थिती आणली. त्यामुळेच ‘ डेक्कन अ‍ॅगिकल्चर रिलिफ अ‍ॅक्ट ’ संमत झाला.
 • दीनबंधू वृत्तपत्राने गिरणीकामगारांची स्थिती सुधारण्याचा पहिला प्रयत्न केला.
 • नारायण मेघाजी लोखंडे यांनी ‘ मिलहँड असोसिएशन ’ स्थापून, फॅक्टरी आयोगापुढे कामगारांची बाजू मांडली. तसेच लहान शेतकऱ्यांना जंगल खात्याच्या अधिकाऱ्यांकडून होणारा उपद्रव दूर केला. 
 • जातिभेदखंडन करणारे तुकाराम तात्या पडवळ यांचे जातिभेद विवेकसार, परमहंस सभेचे दादोबा पांडुरंगलिखित धर्मदर्शक आणि म. फुल्यांचे सार्वजनिक सत्यधर्म ह्या गंथांचा सत्यशोधक चळवळीने मार्गदर्शनपर उपयोग केला. 
 • तसेच अनिष्ट अंधश्रद्धामूलक परंपरा, चालीरीती, रूढी यांचे समूळ उच्चटन करण्याचा प्रचार केला. 
 • १८७९ मध्ये पुण्यातील एका थिएटरमध्ये त्यांनी स्त्रियांच्या निबंधवाचनाचा समारंभ घडवून आणला. 
 • शेतकऱ्यांच्या दुःस्थितीबद्दल व पिळवणुकीबद्दल त्यांनी बारामती तालुक्यात चिंचोली गावात शेतकऱ्यांची सभा भरवून (१८८०) शेतसारा, कर्ज, जंगलत्रास, सक्तीचे शिक्षण वगैरेंविषयी ठराव संमत केले. 
 • एवढेच नव्हे, तर भालेकर यांनी विदर्भ व मध्य प्रदेशात कंत्राटी कामानिमित्त काही महिने गेले असता, तेथे सत्यशोधक समाजाचे प्रचारकार्य केले.
 • सत्यशोधक समाजाने लोकशिक्षणाबरोबरच शेतकऱ्यांची जमीनदार व सावकार यांच्या मगरमिठीतून सुटका करण्यासाठी अथक प्रयत्न केले.

सत्यशोधक समाजाची अधिवेशने/संमेलने 

 • १८७३ मध्ये सत्यशोधक समाजाची म. फुले यांनी स्थापना केली; मात्र समाज अधिवेशनांची सुरूवात १९११ पासून झाली. 
 • १९११ पासून २००७ पर्यंत सत्यशोधक समाजाची एकूण ३५ अधिवेशने संपन्न झाली. 
 • पहिले अधिवेशन १७ एप्रिल १९११ रोजी पुणे येथे स्वामी रामय्या व्यंकय्या अय्यावरू यांच्या अध्यक्षतेने पार पडले.
 • तर, पस्तीसावे अधिवेशन २२ डिसेंबर २००७ रोजी गेवराई (जिल्हा बीड, मराठवाडा) येथे डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.

अधिक माहिती करीता :-

Tuesday, 16 January 2018

१० वी पंचवार्षिक योजना


कालावधी - इ.स. २००० ते इ.स. २००२.

प्राधान्य - शिक्षण व प्राथमिक शिक्षणावर भर.

घोषवाक्य - सर्वसामान्य विकासाचे धोरण.


 • सर्वाधिक खर्च - सामाजिक सेवा (२७%).

 उद्दिष्ट -


 • आर्थिक विकास ८ टक्के महत्वाकांक्षी दराने साध्य करणे.
 • दारिद्र्यरेषेखालील लोकांचे प्रमाण ५ टक्के ने कमी करून ते २१ टक्के वर आणणे आणि २०१२ पर्यंत १० टक्के वर आणणे.
 • २००७ पर्यंत प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण कऱणे. साक्षरतेचे प्रमाण ७५ टक्के पर्यंत नेणे.
 • नवजात अर्भकाच्या मृत्यूचे प्रमाण २००७ पर्यंत प्रतिहजार ४५ तर २०१२ पर्यंत २८ पर्यंत कमी करणे.
 • २००७ पर्यंत जंगलाखालील जमिनीचे क्षेत्र २५ टक्के पर्यंत करणे.
 • २००७ पर्यंत इतर नोंदणीकृत नद्यांचे शुद्धीकरण करणे. सर्व प्रमुख मोठ्या प्रदूषित नद्यांचे आणि २०१२ पर्यंत इतर नोंदणीकृत नद्यांचे शुद्धीकरण करणे.
 • २००१ - २०११ या दशकांसाठीचा जननदक १६.२ टक्के इतका कमी करणे.

महत्वपूर्ण घटना -


 1. या योजनेदरम्यान  ७.६.% एवढी सरासरी वर्षीक वृद्धी दर प्राप्त झाला.
 2. उद्योग व सेवा या अर्थव्यवस्थांच्या दोन प्रमुख क्षेत्रांमधील वृद्धी दर साध्य झाला.
 3. कृषि क्षेत्र २.१३% वार्षिक वृद्धीचे लक्ष्य होते. साध्य प्राप्त आकड्यांनुसार केवळ २.१३% एवढा वृद्धी दर प्राप्त झाला.
 4. या योजनेत चालू किमतीची गुंतवणूक दर जीडीपीच्या ३.०८% राहिला, त्याचे लक्ष्य २८.४१% एवढे होते.
 5. योजना कालावधीत चलन वाढीचा दर सरासरी ५% ठेवण्याचे लक्ष्य होते. मात्र प्रत्यक्षात तो ५.१% एवढा ठरला.

अधिक माहितीसाठी :-

Sunday, 14 January 2018

त्रिभुज प्रदेश • त्रिभुज प्रदेश म्हणजे नदीच्या मुखाजवळ नदीने वाहून आणलेल्या गाळामुळे तयार झालेला त्रिकोणी प्रदेश होय.
 • नदीच्या मुखाशी उतार कमी झाल्याने संथ वाहणारे पाणी सर्व गाळ वाहू शकत नाही. त्यामुळे पात्रातच गाळ साचल्याने मुख भरून येते आणि नदीचे पाणी दुसऱ्या मुखाने नवा मार्ग काढून समुद्रास मिळते व कालांतराने ते मुखही गाळाने भरून आल्याने नदी तिसऱ्या मुखाने समुद्रास मिळते, त्यामुळे नदी बहुमुखी बनते. नदीच्या अशा मुखप्रवाहांस उपमुख म्हणतात.
 • मोठ्या नद्यांचे त्रिभुज प्रदेश नदीच्या पात्राला सहसा अनेक प्रवाहांमध्ये विभागतात.

त्रिभुज प्रदेशाची निर्मिती 


 • त्रिभुज प्रदेशाची निर्मिती ही नदीवर अवलंबून असते. या प्रदेशातील जमीन गाळाची व बहुधा दलदलयुक्त असते.
 • एखाद्या नदीच्या मुखाजवळ तयार होणाऱ्या त्रिभुज प्रदेशाची निर्मिती खालील घटकांवर अवलंबून असते :-


 1. नदीतील गाळाचे प्रमाण.
 2. नदीचा मुखाजवळील वेग.
 3. सागराची खोली.
 4. त्या प्रदेशातील हवामान, पर्जन्य

सागरप्रवाह.


 • नदी समुद्राला जाऊन मिळताना नदीच्या शेवटच्या टप्प्यात नदीप्रवाहाचा वेग कमी होतो. 
 • वेग मंदावलेल्या प्रवाहातील वाळू, माती, खडी, दगड इत्यादी नदीच्या मुखाशी जमा होत जातात. 
 • खडी आणि वाळू जड असल्यामुळे सहसा ते सर्वांत पहिल्यांदा जमा होतात. माती हलकी असल्यामुळे समुद्रात आतपर्यंत वाहून नेली जाते. 
 • खाऱ्या पाण्यामुळे मातीच्या गुठळ्या तयार होतात व त्या गुठळ्यांमुळे माती जड होते आणि तळाशी जाऊन साचू लागते. अशा गाळाचे एकावर एक थर साठून त्रिभुज प्रदेश तयार होतो. 
 • नंतर या प्रदेशावर वनस्पती वाढून त्याला स्थैर्य देतात. बऱ्याच वेळा त्रिभुज प्रदेशाचा आकार पक्ष्याच्या पायांप्रमाणे अनेक फाटे पडल्यासारखा असतो. 
 • उंचीच्या दृष्टिकोनातून हा प्रदेश सखल मैदानी असतो. त्याची समुद्रसपाटीपासून उंची सहसा २० मीटरांपेक्षा जास्त नसते. 
 • त्रिभुज प्रदेशावर लाटा किंवा भरती-ओहोटी यांचा फारसा परिणाम होताना आढळत नाही.

उदाहरणे • भारतीय उपखंडात कृष्णा, गोदावरी, कावेरी या नद्यांचे त्रिभुज प्रदेश आहे.
 • गंगा-ब्रह्मपुत्रा या नद्यांनी केलेले बांग्लादेशमधील त्रिभुजप्रदेश, अ‍ॅमेझॉन, मिसिसिपी, र्‍हाइन, डॅन्यूब इत्यादी नद्यांचे त्रिभुज प्रदेश प्रसिद्ध आहेत. 
 • मिसिसिपी नदीचा त्रिभुज प्रदेश हा जगातील सर्वात विस्तृत त्रिभुज प्रदेश आहे. त्याचे क्षेत्रफळ ३१,००,००० चौ.कि.मी. पेक्षा अधिक आहे.

अधिक माहितीसाठी -

Wednesday, 10 January 2018

ऊती (जीवशास्त्र)


 • ऊती हे पेशी पासून तयार झालेल्या संस्था असतात.
 •  ऊतिनिर्मिती प्रक्रिया ही पेशीविभेदनाच्या प्रक्रियेची पुढची पायरी आहे. 
 • एकपेशीय फलित अंड्याचे विभाजन होऊन पेशींचा एकच थर असलेले कोरक गोल (ब्लास्ट्युला) तयार होतात, या अवस्थेत ऊती अजून बनलेल्या नसतात. 
 • कोरक गोलापासून आद्यभ्रूणन प्रक्रियेत बाह्यस्तर, मध्यस्तर आणि अंत:स्तर असे तीन जननस्तर तयार होतात. या प्रक्रियेतील पेशीविभेदनातून ऊतिनिर्मिती सुरू होते आणि इंद्रिये वा अंगे पूर्ण तयार होईपर्यंत चालू राहते. 
 • एकाच प्रकारच्या ऊतीतील पेशी या कमीजास्त प्रमाणात एकसारख्याच असतात आणि एकाच प्रकारचे कार्य करतात.
 • अनेक ऊती मिळून एक अवयव बनवतात, अवयव मधील सर्व ऊती  एकत्र काम करतात. 
 • सर्व साजीवांमध्ये निरनिराळ्या प्रकारांच्या ऊती एकत्र येउन अवयव बनवतात, हे अवयव एकत्र येउन अवयव संस्था तयार होते.  उदा. श्वासंसंस्त्था, पचनसंस्था इ.

पेशी -> ऊती -> अवयव -> अवयव संस्था -> सजीव.

प्राण्यांचे ऊती

प्राणी ऊतींचे चार प्रकार आहेत. त्यांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे करतात :
अभिस्तर ऊती, स्नायू ऊती, चेता ऊती, संयोजी ऊती.

 • अभिस्तर उती :-
 1. अभिस्तर उतींमधील पेशांची रचना दाटीवाटीची असून त्या एक मेकीस चिटकून असतात. त्यामुळे त्यांचा एक सलग स्थळ तयार होतो. 
 2. अभिस्तर हे अन्तर्प्रेशिय पोकळीतील तंतूमय पटलाने खालच्या उतींपासून वेगळे झालेले असते. 
 3. त्वचा, तोंडाच्या आतील स्थर, रक्तवाहिन्यांचे स्थर इ. हे अभिस्थर उतीपासून बनलेले असतात. 
 • अभिस्तर उतीचे विविध प्रकार पुढील प्रमाणे आहेत -
 1. सरल पटट्की अभिस्तर.
 2. स्तरीत पटट्की अभिस्तर.
 3. स्तम्भीय अभिस्तर.
 4. रोमक स्तम्भीय अभिस्तर.
 5. घनाभरूप अभिस्तर.
 6. ग्रंथिल अभिस्तर.
 • संयोजी उती :-
संयोजी उतीमध्ये अधारक असते आणि त्या आधारराकांमध्ये पेशी रुतलेल्या असतात.
या आधारकाचे स्वरूप, घनता आणि प्रमाण हे त्यातील संयोजी उटीच्या कार्यानुसार ठरते. हे अधारक जेलीस्दृश द्रवरूप व दाट किंवा दृढ अस्ते.

संयोजी उतीचे बरेच विविध प्रकार असतात :
 1. अस्थी.
 2. रक्त.
 3. अस्थिबंध.
 4. स्नायुरज्जू.
 5. कास्थी.
 6. विरल उती.
 7. चरबीयुक्त उती.
 • स्नायू उती :-
स्नायू उती या स्नायूतंतूच्या लांब पेशीपासून बनलेल्या असतात. स्नायुंमध्ये विशिष्ट प्रकारचे प्रथिन असते. त्यास 'संकोची प्रथिन' असे म्हणतात या प्रथिनानच्या आकुंचन व प्रसारणामुळे स्नायूंची हालचाल होते.
 • चेता उती :-
सर्व पेशींमध्ये चेतना क्षमता आढळते. या उती चेतना ग्रहण करतात व या अत्यंत जलद गतीने शरीरातील एका भागाकडून दुसर्या भागाकडे वहन करतात.

मेन्दू , चेतरज्जू व चेतान्तू हे सर्व चेताउतीनी बनलेले असतात.

वनस्पती ऊती

वनस्पती ऊतींचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत.
साध्या ऊती व संयुक्त ऊती.


 • साध्या ऊती :-
या ऊतींचे मूलोती, स्थूलकोनोती आणि दृढोती असे तीन प्रकार आहेत :- मूलोती (मूलभूत ऊती) यांमधील पेशी जिवंत, पेशीभित्तिका पातळ.

मूलोती (मूलभूत ऊती) -
पेशी एकमेकांना चिकटून असल्या तरी पेशींच्या दरम्यान जागा असते.
पाणी, अन्न साठविणे, तसेच आधार देणे असे यांचे कार्य आहे.

स्थूलकोनोति -
या ऊती मूलोतीप्रमाणेच जिवंत पेशींच्या बनलेल्या असतात, मात्र पेशींच्या दरम्यान पेशीभित्तिका जाड झाल्यामुळे जागा नसते.
त्यामुळे जिथे या ऊती असतात त्या भागाला आधार देणे हे यांचे कार्य आहे.
त्या पाणी, अन्नसुद्धा साठवितात.

दृढोती -
या ऊतींमधील पेशी मृत असतात. त्यांच्या पेशीभित्तिकावर आतील बाजूस लिग्नेनचा थर असल्यामुळे भिंती जाड असतात.
यांचे मुख्य कार्य आधार देणे आहे


 • संयुक्त ऊती 

एकापेक्षा जास्त प्रकारच्या जास्त प्रकारच्या साध्या ऊती एकत्र येऊन संयुक्त ऊती बनतात. त्यांचे कार्य अन्नरस, पाणी यांचे वहन करणे.
संयुक्त ऊतीचे काष्ठ व रसवाहिनी असे दोन प्रकार आहेत.

काष्ठ -
या संयुक्त ऊतीमध्ये काष्ठमूलोती, काष्ठदृढोती, वाहिका, वाहिनी अशा पेशी असतात मुळांनी शोषिलेले पाणी खोडातून इतर अवयवांकडे वाहून नेणे हे कार्य काष्ठ करते.

रसवाहिनी -
ही संयुक्त ऊती रसमूलोती, रसदृढोती, चाळणी नलिका, चाळणी पेशी यांपासून बनलेली असते. पानांनी तयार केलेले अन्न वनस्पतीच्या इतर भागांकडे वाहून नेणे हे यांचे कार्य आहे.


अधिक माहितीसाठी
www.reliableacademy.com

Tuesday, 9 January 2018

भारताचा पहिला गव्हर्नर जनरल - वॉरन हेस्टिंग्स


जन्म -  इ.स. ६ डिसेंबर १७३२ (चर्चिल - इंग्लंड)


मृत्यु - इ.स.  २२ ऑगस्ट १८१८ (डेल्सफोर्ड - इंग्लंड)

 • वॉरन हेस्टिंग्स हा हा इंग्लिश राजकारणी आणि भारताचा पहिला गव्हर्नर जनरल होता.
 • कारकीर्द सुरु - २० ऑक्टोबर १७७३ (originally joined on २८ एप्रिल १७७२).
 • कार्यकाल समाप्त - १ फेब्रुवारी १७८५.

बालपण -

 • हेस्टिंग्सचा जन्म व बालपण हलाखीच्या परिस्थितीतील होते.
 • वेस्टमिन्स्टर स्कूलमध्ये शिकायला असताना हा युनायटेड किंग्डमचा भविष्यातील पंतप्रधान लॉर्ड शेल्बर्न आणि विल्यम हेन्री कॅव्हेंडिश-बेंटिंक तसेच कवी विल्यम काउपर यांचा समकालीन होता.

भारतातील कार्यकाल 

 • हेस्टिंग्स १७५०मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीमध्ये कारकून म्हणून नोकरीला लागला व त्यासाठी कोलकात्यास आला.
 • त्याच्या कष्टाचे चीज म्हणून त्याला कासीमबझार येथे बढतीसह पाठविण्यात आले. म्हणुन त्याची कासिमबाझार येथे नियुक्ती करण्यात आली (१७५३). 
 • तेथील वास्तव्यात त्याने फार्सी, बंगाली आणि ऊर्दू या भाषा व एतद्देशीय रीतिरिवाजांचे ज्ञान प्राप्त करून घेतले. 
 • कंपनीने त्याची एका व्यापारपेढीवर व्यवस्थापक म्हणून नियुक्ती केली. 
 • त्याने कलकत्ता घेण्यासाठी लॉर्ड रॉबर्ट क्लाइव्हबरोबर युद्धात भाग घेतला (१७५६). 
 • त्यानंतर त्याची बंगालच्या वखारीत (फॅक्टरी) रेसिडेन्ट म्हणून निवड झाली (१७५७). तेथील कार्यक्षम कामगिरीमुळे कलकत्त्याच्या मंडळात तो प्रविष्ट झाला (१७६१); तथापि तेथील भ्रष्टाचार व गैरकारभार यांमुळे त्याने आपल्या मंडळाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन तो इंग्लंडला परतला (१७६४). 
 • पुन्हा त्याची ईस्ट इंडिया कंपनीने १७६९ मध्ये मद्रास येथील काउन्सिलवर नेमणूक केली. त्याच्या कर्तृत्वाचा विचार करून त्यास बंगालचा गव्हर्नर नेमले (१७७१) आणि पुढे गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया या उच्च पदावर त्याची नियुक्ती झाली (१७७४). 
 • तत्पूर्वी १७७३ मध्ये ब्रिटिश संसदेने रेग्युलेटिंग अ‍ॅक्ट संमत करून बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल हा हुद्दा देऊन त्याचा अधिकार मुंबई-मद्रास येथील गव्हर्नरांवर निश्चित केला आणि त्याच्या मदतीस चार ब्रिटिश सदस्यांचे मंडळ दिले. त्यामुळे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या शासनव्यवस्थेला वैधानिक स्वरूप प्राप्त झाले.
 • तेथे त्याने विल्यम वॉट्सच्या देखरेखीखाली पूर्व भारतातील राजकारणाचे धडे घेतले. 
 • याच सुमारास बंगालचा नवाब अलिवर्दी खान मृत्यूशय्येवर होता व त्याचा नातू सिराज उददौला सत्तेवर येणे अपेक्षित होते. 
 • सिराज उददौला युरोपीय लोकांच्या विरुद्ध होता व त्यांच्या राजकीय लुडबुडीस त्याचा सक्त विरोध होता. 
 • सत्तेवर आल्याआल्या बंगालच्या सैन्याने युरोपीय ठाण्यांवर हल्ले चढविले. त्यात कासीमबझारच्या इंग्लिश ठाण्यासही वेढा घातला गेला.
 • आपल्यापेक्षा अनेकपटींनी मोठ्या असलेल्या शत्रूसैन्याविरुद्ध ब्रिटिशांनी शरणागती पत्करली.
 • बंगाली, फार्सी, उर्दू या भाषांव्यतिरिक्त हेस्टिंग्जला अरबी भाषेचेही जुजबी ज्ञान होते.
 • त्याने कलकत्त्यात मद्रसा स्थापन केली (१७८१). त्याने संस्कृत भाषेच्या उत्तेजनार्थ नथॅन्यल हॅलहेडकडून हिंदू विधीचे भाषांतर करून घेतले. 
 • त्याचा मित्र सर चार्ल्स विल्किन्स हा संस्कृत व फार्सी भाषांचा जाणकार होता. विल्किन्सने भगवद्गीते चा इंग्रजी अनुवाद केला. थोर प्राच्यविद्यातज्ज्ञ सर विल्यम जोन्स याने मनुस्मृती चे भाषांतर केले (१७८३). 
 • जोन्स, विल्किन्स व हॅलहेड यांच्या सहकार्याने हेस्टिंग्जने आपल्या कारकिर्दीच्या शेवटच्या काळात एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. त्याने संस्कृत पंडितांकरवी संस्कृत साहित्य, उपनिषदे, भगवद्गीता यांतील ज्ञान सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न केले.

वॉरन हेस्टिंग्सच्या कार्यकाळातील प्रमुख घटना


 • रेग्युलेटिंग अ‍ॅक्ट, १७७३.
 • Supreme Council Of Bengal.
 • बंगाल एशियाटिक सोसायटी.
 • शाह आलम दुसरा या मुघल सम्राटाचे पेन्शन बंद केले.
 • Stopped Diarchy in Bengal.
 • जॉनथन डंकन द्वारा नवीन संस्कृत शाळा.
 • टांकसाळ मुर्शिदाबाद वरून कोलकाताला हलवली.
 • बंगाल गॅझेट - पहिले भारतीय वृतपत्र प्रसिद्ध.
 • पहिले आंग्ल - मराठा युद्ध (१७७५–८२).
 • दूसरे आंग्ल - म्हैसूर युद्ध (१७८०–८४ ).
 • पहिले रोहिला युद्ध १७७३–१७७४.
 • दुसरा रोहिला - उठाव १७७९.
 • Experimentation on land settlements. (१७७२-five years settlement, changed to १ year in १७७६).
 • भगवतगीता चे इंग्रजीत भाषांतर.

अधिक माहितीसाठी -

Monday, 8 January 2018

प्रवासी भारतीय दिन - ९ जानेवारी • प्रवासी भारतीय दिवस दरवर्षी भारतामध्ये ९ जानेवारी रोजी साजरा केला जातो त्याचे कारण असे की, ९ जानेवारी १९१५ रोजी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेहून मुंबईमध्ये परतले होते.
 • म्हणुन २००३ सालापासून दरवर्षी अनिवासी भारतीय नागरिकांच्या भारताच्या प्रगतीमधील योगदानासाठी प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जात आहे.

आयोजन :-

भारत सरकारचे अनिवासी भारतीय कार्य मंत्रालय (Ministry of Overseas Indian Affairs) व उत्तर पूर्वी क्षेत्र विकास मंत्रालय (Ministry for Development of North Eastern Region), फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज आणि कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री ह्यांच्या मार्फत केले जाते.


 • १ला प्रवासी भारतीय दिवस - नवी दिल्ली. (२००३).
 • मागील वर्षाचा म्हणजेच १५वा प्रवासी भारतीय दिवस - बंगळुर (२०१७) येथे पार पडला होता.
 • यावर्षीचा प्रवासी भारतीय दिवस सिंगापुर येथे पार पडणार आहे.
 • सिंगापूरमध्ये दोन दिवसीय ‘ASEAN-भारत प्रवासी भारतीय दिवस’ आयोजित करण्यात आलेला आहे.    
 • शिवाय २५ - २६ जानेवारीला ASEAN - भारत भागीदारीचे २५ वे वर्ष आहे. 
 • हे वर्ष चिन्हांकित करण्यासाठी ‘अँसीयंट रूट, न्यू जर्नी: डायस्पोरा इन द डायनॅमिक ASEAN-इंडिया पार्टनरशिप’ या विषयाखाली एका शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
 • शेजारी राष्ट्रांसह व्यावसायिक आणि राजकीय संबंधांना अधिक व्यापक करण्यासाठी आणि परदेशासंबंधी धोरणांना आणखी बळकट करण्याच्या उद्देशाने भारत योजनेचे क्रियान्वयन करणार आहे.

दक्षिण-पूर्व आशियाई राष्ट्रांची संघटना (Association of Southeast Asian Nations -ASEAN)


 • स्थापना :-  ८ ऑगस्ट  १९६७.
 • सदस्य असलेले देश :-
ब्रुनेई दरुसालेम,
कंबोडिया,
म्यानमार,
मलेशिया,
फिलीपीन्स,
सिंगापूर,
लाओ PDR,
इंडोनेशिया,
थायलंड,
व्हिएतनाम या राष्ट्रांचा क्षेत्रीय आंतरसरकारी समूह आहे.

 • निर्मिती :- 
मलेशिया, फिलीपीन्स, सिंगापूर, इंडोनेशिया, थायलंड या देशांनी 8 ऑगस्ट 1967 रोजी केली.

 • ASEAN हा संयुक्त राष्ट्रसंघाचा अधिकृत निरीक्षक आहे.

अधिक माहितीसाठी :-

Saturday, 6 January 2018

समाजसुधारक बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर


मराठी वृत्तपत्र चे जनक - बाळशास्त्री जांभेकर 


जन्म - ६ जानेवारी, १८१२.

मृत्यू - १८ मे, १८४६.


जन्म ठिकाण :- राजापूर तालुक्यातील पोंभुर्ले गाव.
वडील :- गंगाधरशास्त्री जांभेकर.

जीवन


 • जांभेकरांनी बालपणी वडिलांकडे घरीच मराठी व संस्कृत भाषांचा अभ्यास आरंभला. इ.स. १८२५ साली त्यांचे मुंबईमध्ये आगमन झाले. 
 • मुंबईस येऊन ते सदाशिव काशीनाथ ऊर्फ ‘बापू छत्रे’ आणि बापूशास्त्री शुक्ल यांजकडे अनुक्रमे इंग्रजी व संस्कृत शिकू लागले. या दोन विषयांबरोबरच गणित आणि शास्त्र या विषयांत त्यांनी प्रावीण्य मिळविले. 
 • ‘बाँबे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’च्या विद्यालयात अभ्यास करून त्यांनी विशीच्या आत प्राध्यापक म्हणून नियुक्ती ज्ञान मिळवले. 
 • इ.स. १८३४ साली एल्फिन्स्टन कॉलेजात पहिले एतद्देशीय व्याख्याते म्हणून जांभेकरांची नियुक्ती झाली.


भाषांचे ज्ञान - 

मराठी, संस्कृत, बंगाली, गुजराती, कानडी, तेलुगू, फारसी, फ्रेंच, लॅटिन व ग्रीक.
(फ्रेंच भाषेतील नैपुण्याबद्दल फ्रान्सच्या राजाकडून त्यांचा मानसन्मान झाला होता.)

विषयांचे ज्ञान -

रसायनशास्त्र , भूगर्भशास्त्र, प्राणिशास्त्र, वनस्पतीशास्त्र, न्यायशास्त्र, इतिहास, मानसशास्त्र.

समाजकार्य


 • सार्वजनिक गंथालयांचे महत्त्व ओळखून 'बाँबे नेटिव्ह जनरल लायब्ररी' या ग्रंथालयाची जांभेकरांनी स्थापना केली. 
 • 'एशियाटिक सोसायटी'च्या त्रैमासिकात शोधनिबंध लिहिणारे ते पहिले भारतीय होते.
 • ज्ञानेश्वरीची पहिली मुद्रित आवृत्ती त्यांनी इ.स. १८४५ साली काढली.
 • विविध समस्यांवर सकस चर्चा घडवण्यासाठी बाळशास्त्रींनी ‘नेटिव्ह इंप्रुव्हमेंट सोसायटी’ची स्थापना केली. 
 • यातूनच पुढे ‘स्ट्युडंट्स लिटररी ॲन्ड सायंटिफिक सोसायटी’ या संस्थेला प्रेरणा मिळाली व दादाभाई नौरोजी, भाऊ दाजी लाड  यांसारखे दिग्गज कार्यरत झाले.
 • बाळशास्त्रींनी साधारणपणे इ.स. १८३० ते इ.स. १८४६ या काळात आपले योगदान महाराष्ट्राला व भारताला दिले.
 • ख्रिस्त्याच्या घरात राहिल्यामुळे वाळीत टाकल्या गेलेल्या एका हिंदू मुलास त्यांनी तत्कालीन सनातन्यांच्या विरोधास न जुमानता शुद्ध करून पुन्हा हिंदू धर्मात घेण्याची व्यवस्था केली.


पत्रकारिता 

मराठीतील पहिले वृत्तपत्र दर्पण -

 1. सहयोगी गोविंद कुंटे आणि भाऊ महाजनांच्या मदतीने त्यांनी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र काढले.
 2. जानेवारी ६, इ.स. १८३२ रोजी दर्पणाचा पहिला अंक प्रकाशित झाला. 
 3. जनसामान्यांसाठी वृत्तपत्राची भाषा मराठी ठेवण्यात आली असली तरी ब्रिटिश शासनापर्यंत आपला आवाज जावा या हेतूने, वृत्तपत्राचा एक स्तंभ इंग्लिश भाषेत असायचा. 
 4. वृत्तपत्राची किंमत १ रुपया होती. इंग्रजी आणि मराठी अशा जोड भाषेत प्रकाशित होणारे हे वृत्तपत्र! या अंकात दोन स्तंभ असत. उभ्या मजकुरात एक स्तंभ (कॉलम) मराठीत आणि एक स्तंभ इंग्रजीत असे. 
 5. मराठी मजकूर अर्थातच सर्वसामान्य जनतेसाठी होता आणि इंग्रजी मजकूर वृत्तपत्रात काय लिहिले आहे, हे राज्यकर्त्यांनाही कळावे यासाठी इंग्रजी मजकूर होता. 
 6. वृत्तपत्राची संकल्पना त्या काळी लोकांना नवीन होती. त्यामुळे दर्पणचे वर्गणीदार सुरुवातीच्या काळात खूप कमी होते. पण हळूहळू लोकांमध्ये ही संकल्पना जशी रुजली, तसे त्यातील विचारही रुजले आणि प्रतिसाद वाढत गेला. 
 7. दर्पणवर प्रथमपासूनच बाळशास्त्री जांभेकरांच्या विचारांचा आणि व्यक्तिमत्त्वाचा ठसा होता. दर्पण अशा रीतीने साडे आठ वर्षे चालले आणि जुलै, इ.स. १८४० ला त्याचा शेवटचा अंक प्रकाशित झाला.

मराठीतले पहिले मासिक 'दिग्दर्शन' 

 1. मराठीतले पहिले मासिक 'दिग्दर्शन' त्यांनी इ.स. १८४० साली सुरू केले. 
 2. 'दिग्दर्शन' मधून ते भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, व्याकरण, गणित तसेच भूगोल  व इतिहासावर लेख प्रकाशित करत. 
 3. भाऊ दाजी लाड, दादाभाई नौरोजी हे त्यांचे विद्यार्थी त्यांना या कामी मदत करत.
 4. या मासिकाचे संपादक म्हणून त्यांनी ५ वर्षे काम पाहिले. या मासिकातून त्यांनी भूगोल, इतिहास, रसायन शास्त्र, पदार्थ विज्ञान, निसर्ग विज्ञान आदी विषयांवर्चे लेखन नकाशे व आकृत्यांच्या साहाय्याने प्रसिद्ध केले. 
 5. या अभिनव माध्यमातून त्यांनी लोकांची आकलनक्षमता वाढवण्याचा प्रयत्‍न केला.

सन्मान

 • ‘बाँबे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’चे ‘नेटिव्ह सेक्रेटरी’, अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक, एल्‌फिन्स्टन इन्स्टिट्यूटमध्ये पहिले असिस्टंट प्रोफसर, शाळा तपासनीस, अध्यापनशाळेचे (नॉर्मल स्कूल) संचालक अशा अनेक मानाच्या जागांवर त्यांनी काम केले. 
 • त्यांना ‘जस्टिस ऑफ द पीस’ ही करण्यात आले होते (१८४०).
 • ६ जानेवारी, इ.स. १८३२ रोजी दर्पण वृत्तपत्राच्या पहिला अंक प्रकाशित झाला, तसेच योगायोगाने ६ जानेवारी हा जांभेकरांचा जन्मदिवसही असल्यामुळे हा दिवस दर वर्षी महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा होतो.

अधिक माहितीसाठी :-

Friday, 5 January 2018

देश आणि देशांची चलने • भारत - रुपया..
 • अफगाणिस्तान - अफगाणी.
 • आयरीश रिपब्लीक - आयरीश पौंड.
 • ऑस्ट्रेलिया - ऑस्ट्रेलियन डॉलर.
 • र्जॉडन - दिनार.
 • ऑस्ट्रिया - शिलींग.
 • इटली - लिरा.
 • बोटसवाना - रँड.
 • कुवेत - दिनार.
 • बंगलादेश - टका.
 • जपान - येन.
 • बेल्जियम - फ्रँक.
 • केनिया - शिलींग.
 • बुरुंडी - फ्रँक.
 • लिबिया - दिनार.
 • ब्रिटन - पौंड.
 • लेबनॉन - पौंड.
 • बर्मा - कॅट.
 • नेदरलँड - गिल्डर.
 • क्युबा - पेसो.
 • मेक्सिको - पेसो.
 • कॅनडा - डॉलर.
 • नेपाळ - रुपया.
 • सायप्रस - पौंड.
 • पाकिस्तान - रुपया.
 • चीन युआन.
 • न्यूझीलंड - डॉलर.
 • झेकोस्लाव्हिया - क्रोन.
 • पेरु - सोल.
 • डेन्मार्क - क्लोनर.
 • नायजेरिया - पौंड.
 • फिनलँड - मार्क.
 • फिलिपाईन्स - पेसो.
 • इथोपिया - बीर.
 • नॉर्वे - क्लोनर.
 • फ्रान्स - फ्रँक.
 • पोलंड - ज्लोटी.
 • घाना - न्युकेडी.
 • पनामा - बल्बोआ.
 • जर्मनी - मार्क.
 • पोर्तुगाल - एस्कुडो.
 • गियान - डॉलर.
 • रुमानिया - लेवू.
 • ग्रीस - ड्रॅक्मा.
 • सॅल्वेडॉर - कॉलन.
 • होंडुरा - लेंपिरा.
 • सौदी अरेबिया - रियाल.
 • इस्त्रायल - शेकेल.
 • सुदान - पौंड.
 • इराण - दिनार.
 • स्वित्झर्लंड - फ्रँक.
 • जमैका - डॉलर.
 • स्वीडन - क्रोन.
 • सिरिया - पौंड.
 • टांझानिया - शिलींग.
 • थायलंड - बाहत.
 • टुनीशीया - दिनार.
 • युगांडा - शिलींग.
 • यु.के. - पौंड.
 • त्रिनिदाद आणि टॉबेगो - डॉलर.
 • टर्की - लिरा.
 • रशिया - रूबल.
 • अमेरीका - डॉलर.
 • व्हिएतनाम - दौग.
 • झांबीया - क्वाच्छा.

Wednesday, 3 January 2018

शिक्षणप्रसारक, समाजसुधारक - सावित्रीबाई फुले

सावित्रीबाई जोतीराव फुले


जन्म :- जानेवारी ३, इ.स. १८३१ , नायगाव, सातारा, महाराष्ट्र.

मृत्यू :- मार्च १०, इ.स. १८९७, पुणे, सातारा, महाराष्ट्र.


 • वडील :- खंडोजी नेवसे.
 • आई :- लक्ष्मीबाई नेवसे.
 • पती :- महात्मा फुले.
 • टोपणनाव :- सावित्री, क्रांतिज्योती.


 • सावित्रीबाई फुले ) या मराठी शिक्षणप्रसारक, समाजसुधारक महिला होत्या. 
 • महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतिराव फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली.
 • सावित्रीबाई या मराठीतील पहिल्या कवयित्री आहेत.

जीवन 

 • सावित्रीबाईंच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर गावचे पाटील असणार्‍या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते. 
 • इ.स. १८४० साली जोतिराव फुल्यांशी सावित्रीबाईंचा विवाह झाला. लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंचे वय नऊ, तर जोतिरावांचे वय तेरा वर्षांचे होते. 
 • सावित्रीचे सासरे गोविंदराव फुले हे मुळचे फुरसुंगीचे क्षीरसागर, परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली म्हणून ते पुण्याला येऊन राहिले व फुलांच्या व्यवसायावरून त्यांना फुले हे आडनाव मिळाले.
 • सावित्रीबाईंचे पती जोतिराव यांना लहानपणापासूनच मातृप्रेम लाभले नाही. त्यांची मावस बहीण सगुणाऊ यांनीच त्यांचा सांभाळ केला होता. 
 • सगुणाऊ एका इंग्रज अधिकार्‍याच्या मुलाच्या दाई म्हणून काम करायच्या. त्यांना इंग्रजी कळायचे व बोलताही यायचे. 
 • त्यांनी आपल्या या ज्ञानाचा उपयोग जोतिरावांना प्रेरित करण्यासाठी केला. जोतिरावही शिक्षणाकडे आकर्षित झाले. 
 • सावित्रीबाईंना ख्रिश्चन मिशनर्‍यांनी लग्नापूर्वी दिलेले एक पुस्तक त्या सासरी घेऊन आल्या होत्या. त्यावरून जोतिरावांनाही एक नवा मार्ग सापडला त्यांनी स्वतः शिकून सावित्रीबाईंना शिकवले. 
 • सगुणाऊ तर सोबत होतीच. दोघींनी रीतसर शिक्षण घेतले.

शैक्षणिक कार्य व सामाजिक कार्य


 • १ मे, इ.स. १८४७ रोजी सावित्रीबाईंनी सगुणाऊला मागासांच्या वस्तीत एक शाळा काढून दिली. ही त्यांची पहिली शाळा. 
 • सगुणाऊ तेथे आनंदाने व उत्साहाने शिकवू लागल्या. पुढे ही पहिली शाळा मध्येच बंद पडली.
 • १ जानेवारी, इ.स. १८४८ रोजी भिडेवाड्यात जोतिराव आणि सवित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली. 
 • सा-या कर्मठ समाजाच्या विरोधाला न जुमानता विवाहानंतर शिक्षण घेतले आणि शिक्षक, मुख्याध्यापक बनून शिक्षण दिले.
 • १८४७-१८४८ साली केवळ चार वर्षांत 18 शाळा उघडल्या आणि चालवल्या.
 • बाला-जरठ विवाहप्रथेमुळे अनेक मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या. ब्राह्मण  समाजात विधवा पुनर्विवाह अजिबात मान्य नव्हता. पतीच्या निधनानंतर अशा विधवांना सती जावे लागे किंवा मग त्यांचे केशवपन करून कुरूप बनविले जाई. 
 • जोतिरावांनी या समस्येवर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले. 
 • केशवपन बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करणे व त्यांचा संप घडवून आणणे, पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणे अशी अनेक कामे सावित्रीबाईंनी कल्पकतेने पार पाडली.
 • महात्मा फुले यांच्या निधनानंतर (इ.स. १८९०) सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा वाहिली.
 • आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केला. ‘काव्यफुले’ व ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले.

 • इ.स. १८९६-९७ सालांदरम्यान पुणे परिसरात प्लेगच्या  साथीने धुमाकूळ घातला.  हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेऊ लागला. हा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यावर ब्रिटिश शासनाने जबरदस्तीने संभाव्य रुग्णांना वेगळे काढून स्थानांतरित करण्याचा खबरदारीचा उपाय योजला. यातून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीबाईंनी प्लेगपीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. त्या रोग्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आधार देऊ लागल्या. प्लेगच्या रोग्यांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला. त्यातून १० मार्च, इ.स. १८९७ रोजी त्यांचे निधन झाले.
 • सावित्रीबाईनी जोतिबांच्या सर्व कार्यात हिरीरीने भाग घेतला स्त्रियांनी शिकावे हे त्यांचे ब्रीद वाक्य होते. 1. पुणे येथील हे शिक्षण कार्य पाहून १८५२मध्ये ईस्ट इंडिया कंपनी सरकारने फुले पतिपत्‍नींचा मेजर कॅन्डी यांच्या हस्ते जाहीर सत्कार केला आणि शाळांना सरकारी अनुदानही देऊ केले.
 2. सावित्रीबाईंच्या सामजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून १९९५ पासून ३ जानेवारी हा सावित्रीबाईचा जन्मदिन हा “बालिकादिन ” म्हणून साजरा केला जातो.

Monday, 1 January 2018

लोकसंख्या

भारतातील लोकसंख्येनुसार दर्जा भारतामध्ये विशिष्ट लोकसंख्येवरून त्या वस्तीला खेडेगाव, गाव किंवा शहर संबोधले जाते.

ज्या गावाची लोकसंख्या ५,००० पेक्षा कमी असेल तर त्याला ‘खेडेगाव’ म्हणतात.

ज्या गावाची लोकसंख्या ५,००० ते १,००,००० दरम्यान असेल त्याला ‘गाव’ (Town) म्हणतात.

ज्या गावाची वस्ती १,००,००० (एक लाख) किंवा त्याहून अधिक असेत तर त्याला ‘शहर’ म्हणतात.

खेडेगाव

 • ५,००० पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावातील लोकवस्तीला खेडे किंवा खेडेगाव असे म्हणतात.

खेडयांचे प्रकार


 • भारतात खेडयांचे दोन प्रकार आहेत.

संयुक्त खेडे व पृथक खेडे.


 • संयुक्त खेडयात सर्व जमीन सुसंघटित अशा मंडळाच्या मालकीची असते, यात पतिदारी संयुक्त खेडे आणि जमीनदारी संयुक्त खेडयांचा प्रकारही आहे.
 • रयतवारी खेडे महाराष्ट्रात मोठया प्रमाणात दिसून येते. यात जमीनमालकी सर्व खेडयाची नसून त्या त्या व्यक्तीची असते.
 • जमीनमालकच शेतसाऱ्याला जवाबदार असतो.
 • याशिवाय स्थानांतर करणारी खेडी, अंशत: खेडी, स्थायी खेडी, मध्यवर्ती खेडी, विखुरलेली खेडी, रेखात्मक वसाहतीची खेडी आहेत. 
 • वर्तुळाकार वसाहतीची खेडी इस्त्रायलमध्ये आढळून येतात.


गाव

 • ज्या गावाची लोकसंख्या ५,००० ते १,००,००० दरम्यान असेल त्याला ‘गाव’ (Town) म्हणतात.
 • गाव हे साधारणपणे नदी  काठी अथवा पाण्याचे स्रोत असतील अशा ठिकाणी वसलेले आढळते.

विस्तार

 1. गावाचे लोकवस्ती नुसार विभाग आढळतात. 
 2. लोकवस्ती वाढल्यावर गावांची उपगावे तयार होत. अशी मूळ गावापेक्षा लहान वस्ती असल्यास त्यास बुद्रुक व मुख्य गावास खुर्द असे पूर्वी संबोधले जाते. 
 3. तसेच काहीवेळा शेतकरी गावापासून दूर शेतात वस्ती करीत, अशा मोजक्या घरांच्या वस्तीला वाडी असे म्हणतात.


शहर

 1. ज्या ठिकाणची वस्ती १,००,००० (एक लाख) किंवा त्याहून अधिक असेत तर त्याला ‘शहर’ म्हणतात.
 2. शहर हा शब्द मुळचा अरबी भाषेतला आहे. शहरे महणजे नागरी वसाहह्त होय.

सेन्सस टाऊन

ज्या गावाची लोकसंख्या किमान ५,००० असून त्यातील ७५ टक्के पुरुष शेतीवर अवलंबून नाहीत आणि ज्या गावाच्या लोकसंख्येची घनता दर चौरस किलोमीटरला ४०० हून अधिक आहे, अशा गावाला ‘सेन्सस टाऊन’ (CT) म्हणतात.


स्टॅट्युटरी टाऊन

ज्या गावात नगरपालिका, महापालिका, कॅन्टॉन्मेन्ट बोर्ड किंवा अशीच एखादी स्थानिक स्वराज्य संस्था असेल त्या गावाला स्टॅट्युटरी टाऊन म्हणतात.


गावांचे वर्गीकरण


 1. वर्ग I : लोकवस्ती एक लाख किंवा त्याहून अधिक.
 2. वर्ग II : लोकवस्ती ५०,००० ते ९९,९९९.
 3. वर्ग III : लोकवस्ती २०,००० ते ४९,९९९.
 4. वर्ग IV : लोकवस्ती १०,००० ते १९,९९९.
 5. वर्ग V : लोकवस्ती ५,००० ते ९,९९९.

अधिक माहितीसाठी :-