Wednesday, 10 January 2018

ऊती (जीवशास्त्र)


 • ऊती हे पेशी पासून तयार झालेल्या संस्था असतात.
 •  ऊतिनिर्मिती प्रक्रिया ही पेशीविभेदनाच्या प्रक्रियेची पुढची पायरी आहे. 
 • एकपेशीय फलित अंड्याचे विभाजन होऊन पेशींचा एकच थर असलेले कोरक गोल (ब्लास्ट्युला) तयार होतात, या अवस्थेत ऊती अजून बनलेल्या नसतात. 
 • कोरक गोलापासून आद्यभ्रूणन प्रक्रियेत बाह्यस्तर, मध्यस्तर आणि अंत:स्तर असे तीन जननस्तर तयार होतात. या प्रक्रियेतील पेशीविभेदनातून ऊतिनिर्मिती सुरू होते आणि इंद्रिये वा अंगे पूर्ण तयार होईपर्यंत चालू राहते. 
 • एकाच प्रकारच्या ऊतीतील पेशी या कमीजास्त प्रमाणात एकसारख्याच असतात आणि एकाच प्रकारचे कार्य करतात.
 • अनेक ऊती मिळून एक अवयव बनवतात, अवयव मधील सर्व ऊती  एकत्र काम करतात. 
 • सर्व साजीवांमध्ये निरनिराळ्या प्रकारांच्या ऊती एकत्र येउन अवयव बनवतात, हे अवयव एकत्र येउन अवयव संस्था तयार होते.  उदा. श्वासंसंस्त्था, पचनसंस्था इ.

पेशी -> ऊती -> अवयव -> अवयव संस्था -> सजीव.

प्राण्यांचे ऊती

प्राणी ऊतींचे चार प्रकार आहेत. त्यांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे करतात :
अभिस्तर ऊती, स्नायू ऊती, चेता ऊती, संयोजी ऊती.

 • अभिस्तर उती :-
 1. अभिस्तर उतींमधील पेशांची रचना दाटीवाटीची असून त्या एक मेकीस चिटकून असतात. त्यामुळे त्यांचा एक सलग स्थळ तयार होतो. 
 2. अभिस्तर हे अन्तर्प्रेशिय पोकळीतील तंतूमय पटलाने खालच्या उतींपासून वेगळे झालेले असते. 
 3. त्वचा, तोंडाच्या आतील स्थर, रक्तवाहिन्यांचे स्थर इ. हे अभिस्थर उतीपासून बनलेले असतात. 
 • अभिस्तर उतीचे विविध प्रकार पुढील प्रमाणे आहेत -
 1. सरल पटट्की अभिस्तर.
 2. स्तरीत पटट्की अभिस्तर.
 3. स्तम्भीय अभिस्तर.
 4. रोमक स्तम्भीय अभिस्तर.
 5. घनाभरूप अभिस्तर.
 6. ग्रंथिल अभिस्तर.
 • संयोजी उती :-
संयोजी उतीमध्ये अधारक असते आणि त्या आधारराकांमध्ये पेशी रुतलेल्या असतात.
या आधारकाचे स्वरूप, घनता आणि प्रमाण हे त्यातील संयोजी उटीच्या कार्यानुसार ठरते. हे अधारक जेलीस्दृश द्रवरूप व दाट किंवा दृढ अस्ते.

संयोजी उतीचे बरेच विविध प्रकार असतात :
 1. अस्थी.
 2. रक्त.
 3. अस्थिबंध.
 4. स्नायुरज्जू.
 5. कास्थी.
 6. विरल उती.
 7. चरबीयुक्त उती.
 • स्नायू उती :-
स्नायू उती या स्नायूतंतूच्या लांब पेशीपासून बनलेल्या असतात. स्नायुंमध्ये विशिष्ट प्रकारचे प्रथिन असते. त्यास 'संकोची प्रथिन' असे म्हणतात या प्रथिनानच्या आकुंचन व प्रसारणामुळे स्नायूंची हालचाल होते.
 • चेता उती :-
सर्व पेशींमध्ये चेतना क्षमता आढळते. या उती चेतना ग्रहण करतात व या अत्यंत जलद गतीने शरीरातील एका भागाकडून दुसर्या भागाकडे वहन करतात.

मेन्दू , चेतरज्जू व चेतान्तू हे सर्व चेताउतीनी बनलेले असतात.

वनस्पती ऊती

वनस्पती ऊतींचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत.
साध्या ऊती व संयुक्त ऊती.


 • साध्या ऊती :-
या ऊतींचे मूलोती, स्थूलकोनोती आणि दृढोती असे तीन प्रकार आहेत :- मूलोती (मूलभूत ऊती) यांमधील पेशी जिवंत, पेशीभित्तिका पातळ.

मूलोती (मूलभूत ऊती) -
पेशी एकमेकांना चिकटून असल्या तरी पेशींच्या दरम्यान जागा असते.
पाणी, अन्न साठविणे, तसेच आधार देणे असे यांचे कार्य आहे.

स्थूलकोनोति -
या ऊती मूलोतीप्रमाणेच जिवंत पेशींच्या बनलेल्या असतात, मात्र पेशींच्या दरम्यान पेशीभित्तिका जाड झाल्यामुळे जागा नसते.
त्यामुळे जिथे या ऊती असतात त्या भागाला आधार देणे हे यांचे कार्य आहे.
त्या पाणी, अन्नसुद्धा साठवितात.

दृढोती -
या ऊतींमधील पेशी मृत असतात. त्यांच्या पेशीभित्तिकावर आतील बाजूस लिग्नेनचा थर असल्यामुळे भिंती जाड असतात.
यांचे मुख्य कार्य आधार देणे आहे


 • संयुक्त ऊती 

एकापेक्षा जास्त प्रकारच्या जास्त प्रकारच्या साध्या ऊती एकत्र येऊन संयुक्त ऊती बनतात. त्यांचे कार्य अन्नरस, पाणी यांचे वहन करणे.
संयुक्त ऊतीचे काष्ठ व रसवाहिनी असे दोन प्रकार आहेत.

काष्ठ -
या संयुक्त ऊतीमध्ये काष्ठमूलोती, काष्ठदृढोती, वाहिका, वाहिनी अशा पेशी असतात मुळांनी शोषिलेले पाणी खोडातून इतर अवयवांकडे वाहून नेणे हे कार्य काष्ठ करते.

रसवाहिनी -
ही संयुक्त ऊती रसमूलोती, रसदृढोती, चाळणी नलिका, चाळणी पेशी यांपासून बनलेली असते. पानांनी तयार केलेले अन्न वनस्पतीच्या इतर भागांकडे वाहून नेणे हे यांचे कार्य आहे.


अधिक माहितीसाठी
www.reliableacademy.com

No comments:

Post a Comment