Thursday 18 January 2018

सत्यशोधक समाज - महात्मा फुले

स्थापना - सप्टेंबर २४, इ.स. १८७३.

सत्यशोधक समाजाचे ध्येय - पुरोहितांकडून होणाऱ्या अन्याय, अत्याचारापासून , गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे.

  • घोष वाक्य - ‘सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥’
  • सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ - सार्वजनिक सत्यधर्म'.
  • `निर्मिकाचा धर्म सत्य आहे एक, भांडणे अनेक कशासाठी’ हा विचार फुले यांनी मांडला.
  • सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली.
  • सत्यशोधक समाजातर्फे पुरोहिताशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली.त्यासाठी मराठीत मंगलाष्टके रचली.

सत्यशोधक समाजाचे कार्य 

  • सत्यशोधक समाजाने लोकशिक्षणाबरोबरच शेतकऱ्यांची जमीनदार व सावकार यांच्या मगरमिठीतून सुटका करण्यासाठी अथक प्रयत्न केले. 
  • दीनबंधू , दीनमित्र वगैरे वृत्तपत्र-मासिकांतून शेतकऱ्यांची गाऱ्हाणी त्यांनी हिरिरीने मांडली. 
  • शेतकऱ्याचा आसूड मधून म. फुल्यांनी शासनाच्या नजरेस कृषिवर्गाची दुःस्थिती आणली. त्यामुळेच ‘ डेक्कन अ‍ॅगिकल्चर रिलिफ अ‍ॅक्ट ’ संमत झाला.
  • दीनबंधू वृत्तपत्राने गिरणीकामगारांची स्थिती सुधारण्याचा पहिला प्रयत्न केला.
  • नारायण मेघाजी लोखंडे यांनी ‘ मिलहँड असोसिएशन ’ स्थापून, फॅक्टरी आयोगापुढे कामगारांची बाजू मांडली. तसेच लहान शेतकऱ्यांना जंगल खात्याच्या अधिकाऱ्यांकडून होणारा उपद्रव दूर केला. 
  • जातिभेदखंडन करणारे तुकाराम तात्या पडवळ यांचे जातिभेद विवेकसार, परमहंस सभेचे दादोबा पांडुरंगलिखित धर्मदर्शक आणि म. फुल्यांचे सार्वजनिक सत्यधर्म ह्या गंथांचा सत्यशोधक चळवळीने मार्गदर्शनपर उपयोग केला. 
  • तसेच अनिष्ट अंधश्रद्धामूलक परंपरा, चालीरीती, रूढी यांचे समूळ उच्चटन करण्याचा प्रचार केला. 
  • १८७९ मध्ये पुण्यातील एका थिएटरमध्ये त्यांनी स्त्रियांच्या निबंधवाचनाचा समारंभ घडवून आणला. 
  • शेतकऱ्यांच्या दुःस्थितीबद्दल व पिळवणुकीबद्दल त्यांनी बारामती तालुक्यात चिंचोली गावात शेतकऱ्यांची सभा भरवून (१८८०) शेतसारा, कर्ज, जंगलत्रास, सक्तीचे शिक्षण वगैरेंविषयी ठराव संमत केले. 
  • एवढेच नव्हे, तर भालेकर यांनी विदर्भ व मध्य प्रदेशात कंत्राटी कामानिमित्त काही महिने गेले असता, तेथे सत्यशोधक समाजाचे प्रचारकार्य केले.
  • सत्यशोधक समाजाने लोकशिक्षणाबरोबरच शेतकऱ्यांची जमीनदार व सावकार यांच्या मगरमिठीतून सुटका करण्यासाठी अथक प्रयत्न केले.

सत्यशोधक समाजाची अधिवेशने/संमेलने 

  • १८७३ मध्ये सत्यशोधक समाजाची म. फुले यांनी स्थापना केली; मात्र समाज अधिवेशनांची सुरूवात १९११ पासून झाली. 
  • १९११ पासून २००७ पर्यंत सत्यशोधक समाजाची एकूण ३५ अधिवेशने संपन्न झाली. 
  • पहिले अधिवेशन १७ एप्रिल १९११ रोजी पुणे येथे स्वामी रामय्या व्यंकय्या अय्यावरू यांच्या अध्यक्षतेने पार पडले.
  • तर, पस्तीसावे अधिवेशन २२ डिसेंबर २००७ रोजी गेवराई (जिल्हा बीड, मराठवाडा) येथे डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.

अधिक माहिती करीता :-

3 comments: