Monday 8 January 2018

प्रवासी भारतीय दिन - ९ जानेवारी



  • प्रवासी भारतीय दिवस दरवर्षी भारतामध्ये ९ जानेवारी रोजी साजरा केला जातो त्याचे कारण असे की, ९ जानेवारी १९१५ रोजी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेहून मुंबईमध्ये परतले होते.
  • म्हणुन २००३ सालापासून दरवर्षी अनिवासी भारतीय नागरिकांच्या भारताच्या प्रगतीमधील योगदानासाठी प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जात आहे.

आयोजन :-

भारत सरकारचे अनिवासी भारतीय कार्य मंत्रालय (Ministry of Overseas Indian Affairs) व उत्तर पूर्वी क्षेत्र विकास मंत्रालय (Ministry for Development of North Eastern Region), फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज आणि कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री ह्यांच्या मार्फत केले जाते.


  • १ला प्रवासी भारतीय दिवस - नवी दिल्ली. (२००३).
  • मागील वर्षाचा म्हणजेच १५वा प्रवासी भारतीय दिवस - बंगळुर (२०१७) येथे पार पडला होता.
  • यावर्षीचा प्रवासी भारतीय दिवस सिंगापुर येथे पार पडणार आहे.
  • सिंगापूरमध्ये दोन दिवसीय ‘ASEAN-भारत प्रवासी भारतीय दिवस’ आयोजित करण्यात आलेला आहे.    
  • शिवाय २५ - २६ जानेवारीला ASEAN - भारत भागीदारीचे २५ वे वर्ष आहे. 
  • हे वर्ष चिन्हांकित करण्यासाठी ‘अँसीयंट रूट, न्यू जर्नी: डायस्पोरा इन द डायनॅमिक ASEAN-इंडिया पार्टनरशिप’ या विषयाखाली एका शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
  • शेजारी राष्ट्रांसह व्यावसायिक आणि राजकीय संबंधांना अधिक व्यापक करण्यासाठी आणि परदेशासंबंधी धोरणांना आणखी बळकट करण्याच्या उद्देशाने भारत योजनेचे क्रियान्वयन करणार आहे.

दक्षिण-पूर्व आशियाई राष्ट्रांची संघटना (Association of Southeast Asian Nations -ASEAN)


  • स्थापना :-  ८ ऑगस्ट  १९६७.
  • सदस्य असलेले देश :-
ब्रुनेई दरुसालेम,
कंबोडिया,
म्यानमार,
मलेशिया,
फिलीपीन्स,
सिंगापूर,
लाओ PDR,
इंडोनेशिया,
थायलंड,
व्हिएतनाम या राष्ट्रांचा क्षेत्रीय आंतरसरकारी समूह आहे.

  • निर्मिती :- 
मलेशिया, फिलीपीन्स, सिंगापूर, इंडोनेशिया, थायलंड या देशांनी 8 ऑगस्ट 1967 रोजी केली.

  • ASEAN हा संयुक्त राष्ट्रसंघाचा अधिकृत निरीक्षक आहे.

अधिक माहितीसाठी :-

No comments:

Post a Comment