Showing posts with label भूगोल. Show all posts
Showing posts with label भूगोल. Show all posts

Friday 9 February 2018

महाराष्ट्रातील खनिज संपत्ती व संबंधित जिल्हे



  • देशाच्या खनिज उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा ३.९% आहे, १२.३३% क्षेत्र खनिजयुक्त आहे.
  • महाराष्ट्राची खनिज संपत्तीही प्रामुख्याने बेसॉल्ट खडकाच्या बाह्य़ क्षेत्रात स्फटिकयुक्त व रूपांतरित खडकात आहे.
  • बेसॉल्ट खडक हा दक्षिण कोकण व महाराष्ट्राचा अतिपूर्व भाग वगळता महाराष्ट्रात सर्वत्र सापडतो.
  • महाराष्ट्रात दगडी कोळसा मँगनिज, लोह खनिज, बॉक्साइट, इ. खनिजे आढळतात.
  • महाराष्ट्रातील खनिज संपत्तीचे मुख्य क्षेत्र पूर्व विदर्भ असून यात चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ इ. जिल्हे येतात. याशिवाय सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, इ. ठिकाणीदेखील खनिजे आढळतात.

1. दगडी कोळसा -
  • महाराष्ट्रात दगडी कोळशाचा साठा ५,००० दशलक्ष टन आहे.
  • देशाच्या एकूण दगडी कोळशाच्या साठ्याच्या तो ४% इतका आहे.
  • सावनेर, कामठी, उमरेड (नागपूर), वणी (यवतमाळ), गुग्गुस, बल्लारपूर (चंद्रपूर).
2. बॉक्साईट -

  • भारतातील बॉक्साईटच्या एकूण उत्पादनापैकी २०% उत्पादन महाराष्ट्रात होते. 
  • महाराष्ट्रात जवळ जवळ ८० दशलक्ष टन इतका बॉक्साईटचा साठा आहे.
  • कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.


3. कच्चे लोखंड -

  • रेड्डी (सिंधुदुर्ग).


4. मँगेनीजचा -

  • भारतातील मँगेनीजच्या एकूण साठ्यापैकी सुमारे ४०% मँगेनीजचा साठा महाराष्ट्रात आहे. 
  • तसेच मँगेनीज उत्पादनात महाराष्ट्राचा भारतात दुसरा क्रमांक लागतो.
  • सावनेर (नागपूर), तुमसर (भंडारा), सावंतवाडी (सिंधुदुर्ग).


5. तांबे -

  • चंद्रपूर, नागपूर.


6. चुनखडी -

  • यवतमाळ.


7. डोलोमाईट -

  • देशातील एकूण साठ्यांपैकी ९% डेलोमाईटचा साठा महाराष्ट्रात आहे. 
  • रत्नागिरी, यवतमाळ.


8. क्रोमाईट -

  • देशातील एकूण क्रोमाईटच्या साठ्याच्या १०% इतका साठा महाराष्ट्रात आहे.
  • भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग.


9. कायनाईट -

  • देशातील कायनाईटच्या एकूण उत्पादनात महाराष्ट्राचा हिस्सा १५% इतका आहे.
  • देहुगाव (भंडारा).


10. शिसे व जस्त -

  • नागपूर.


11. खनिज तेल -

  • मुंबईनजीक समुद्रातील ‘मुंबई हाय’ या क्षेत्रात खनिज तेल, तसेच नैसर्गिक वायू सापडतात. 
  • रायगड जिल्ह्यात उरणजवळ समुद्रात खनिज तेलाचे साठे आढळतात. 
  • भारतातील सर्व प्रकारच्या खनिजांच्या सुमारे ३.३% खनिजांचे उत्पादन महाराष्ट्रात होते. 
  • महाराष्ट्राच्या पूर्व व दक्षिण या दोनच भागात प्रामुख्याने खनिजे सापडतात. त्यामुळे याच भागात खनिजाधारीत उद्योगांचा विकास झालेला आढळतो. 
  • महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ (एम.एस.एन.सी.) १९७३ मध्ये नागपूर येथे स्थापन करण्यात आले.
  • उद्देश - खनिज संपत्तीचे जास्तीतजास्त उत्पादन व विकास करणे.

  • भारताच्या एकूण लोहखनिज साठ्यांपैकी २% लोहखनिजसाठा महाराष्ट्रात आहे.

अधिक माहितीसाठी :-

Sunday 14 January 2018

त्रिभुज प्रदेश



  • त्रिभुज प्रदेश म्हणजे नदीच्या मुखाजवळ नदीने वाहून आणलेल्या गाळामुळे तयार झालेला त्रिकोणी प्रदेश होय.
  • नदीच्या मुखाशी उतार कमी झाल्याने संथ वाहणारे पाणी सर्व गाळ वाहू शकत नाही. त्यामुळे पात्रातच गाळ साचल्याने मुख भरून येते आणि नदीचे पाणी दुसऱ्या मुखाने नवा मार्ग काढून समुद्रास मिळते व कालांतराने ते मुखही गाळाने भरून आल्याने नदी तिसऱ्या मुखाने समुद्रास मिळते, त्यामुळे नदी बहुमुखी बनते. नदीच्या अशा मुखप्रवाहांस उपमुख म्हणतात.
  • मोठ्या नद्यांचे त्रिभुज प्रदेश नदीच्या पात्राला सहसा अनेक प्रवाहांमध्ये विभागतात.

त्रिभुज प्रदेशाची निर्मिती 


  • त्रिभुज प्रदेशाची निर्मिती ही नदीवर अवलंबून असते. या प्रदेशातील जमीन गाळाची व बहुधा दलदलयुक्त असते.
  • एखाद्या नदीच्या मुखाजवळ तयार होणाऱ्या त्रिभुज प्रदेशाची निर्मिती खालील घटकांवर अवलंबून असते :-


  1. नदीतील गाळाचे प्रमाण.
  2. नदीचा मुखाजवळील वेग.
  3. सागराची खोली.
  4. त्या प्रदेशातील हवामान, पर्जन्य

सागरप्रवाह.


  • नदी समुद्राला जाऊन मिळताना नदीच्या शेवटच्या टप्प्यात नदीप्रवाहाचा वेग कमी होतो. 
  • वेग मंदावलेल्या प्रवाहातील वाळू, माती, खडी, दगड इत्यादी नदीच्या मुखाशी जमा होत जातात. 
  • खडी आणि वाळू जड असल्यामुळे सहसा ते सर्वांत पहिल्यांदा जमा होतात. माती हलकी असल्यामुळे समुद्रात आतपर्यंत वाहून नेली जाते. 
  • खाऱ्या पाण्यामुळे मातीच्या गुठळ्या तयार होतात व त्या गुठळ्यांमुळे माती जड होते आणि तळाशी जाऊन साचू लागते. अशा गाळाचे एकावर एक थर साठून त्रिभुज प्रदेश तयार होतो. 
  • नंतर या प्रदेशावर वनस्पती वाढून त्याला स्थैर्य देतात. बऱ्याच वेळा त्रिभुज प्रदेशाचा आकार पक्ष्याच्या पायांप्रमाणे अनेक फाटे पडल्यासारखा असतो. 
  • उंचीच्या दृष्टिकोनातून हा प्रदेश सखल मैदानी असतो. त्याची समुद्रसपाटीपासून उंची सहसा २० मीटरांपेक्षा जास्त नसते. 
  • त्रिभुज प्रदेशावर लाटा किंवा भरती-ओहोटी यांचा फारसा परिणाम होताना आढळत नाही.

उदाहरणे



  • भारतीय उपखंडात कृष्णा, गोदावरी, कावेरी या नद्यांचे त्रिभुज प्रदेश आहे.
  • गंगा-ब्रह्मपुत्रा या नद्यांनी केलेले बांग्लादेशमधील त्रिभुजप्रदेश, अ‍ॅमेझॉन, मिसिसिपी, र्‍हाइन, डॅन्यूब इत्यादी नद्यांचे त्रिभुज प्रदेश प्रसिद्ध आहेत. 
  • मिसिसिपी नदीचा त्रिभुज प्रदेश हा जगातील सर्वात विस्तृत त्रिभुज प्रदेश आहे. त्याचे क्षेत्रफळ ३१,००,००० चौ.कि.मी. पेक्षा अधिक आहे.

अधिक माहितीसाठी -

Monday 1 January 2018

लोकसंख्या

भारतातील लोकसंख्येनुसार दर्जा 



भारतामध्ये विशिष्ट लोकसंख्येवरून त्या वस्तीला खेडेगाव, गाव किंवा शहर संबोधले जाते.

ज्या गावाची लोकसंख्या ५,००० पेक्षा कमी असेल तर त्याला ‘खेडेगाव’ म्हणतात.

ज्या गावाची लोकसंख्या ५,००० ते १,००,००० दरम्यान असेल त्याला ‘गाव’ (Town) म्हणतात.

ज्या गावाची वस्ती १,००,००० (एक लाख) किंवा त्याहून अधिक असेत तर त्याला ‘शहर’ म्हणतात.

खेडेगाव

  • ५,००० पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावातील लोकवस्तीला खेडे किंवा खेडेगाव असे म्हणतात.

खेडयांचे प्रकार


  • भारतात खेडयांचे दोन प्रकार आहेत.

संयुक्त खेडे व पृथक खेडे.


  • संयुक्त खेडयात सर्व जमीन सुसंघटित अशा मंडळाच्या मालकीची असते, यात पतिदारी संयुक्त खेडे आणि जमीनदारी संयुक्त खेडयांचा प्रकारही आहे.
  • रयतवारी खेडे महाराष्ट्रात मोठया प्रमाणात दिसून येते. यात जमीनमालकी सर्व खेडयाची नसून त्या त्या व्यक्तीची असते.
  • जमीनमालकच शेतसाऱ्याला जवाबदार असतो.
  • याशिवाय स्थानांतर करणारी खेडी, अंशत: खेडी, स्थायी खेडी, मध्यवर्ती खेडी, विखुरलेली खेडी, रेखात्मक वसाहतीची खेडी आहेत. 
  • वर्तुळाकार वसाहतीची खेडी इस्त्रायलमध्ये आढळून येतात.


गाव

  • ज्या गावाची लोकसंख्या ५,००० ते १,००,००० दरम्यान असेल त्याला ‘गाव’ (Town) म्हणतात.
  • गाव हे साधारणपणे नदी  काठी अथवा पाण्याचे स्रोत असतील अशा ठिकाणी वसलेले आढळते.

विस्तार

  1. गावाचे लोकवस्ती नुसार विभाग आढळतात. 
  2. लोकवस्ती वाढल्यावर गावांची उपगावे तयार होत. अशी मूळ गावापेक्षा लहान वस्ती असल्यास त्यास बुद्रुक व मुख्य गावास खुर्द असे पूर्वी संबोधले जाते. 
  3. तसेच काहीवेळा शेतकरी गावापासून दूर शेतात वस्ती करीत, अशा मोजक्या घरांच्या वस्तीला वाडी असे म्हणतात.


शहर

  1. ज्या ठिकाणची वस्ती १,००,००० (एक लाख) किंवा त्याहून अधिक असेत तर त्याला ‘शहर’ म्हणतात.
  2. शहर हा शब्द मुळचा अरबी भाषेतला आहे. शहरे महणजे नागरी वसाहह्त होय.

सेन्सस टाऊन

ज्या गावाची लोकसंख्या किमान ५,००० असून त्यातील ७५ टक्के पुरुष शेतीवर अवलंबून नाहीत आणि ज्या गावाच्या लोकसंख्येची घनता दर चौरस किलोमीटरला ४०० हून अधिक आहे, अशा गावाला ‘सेन्सस टाऊन’ (CT) म्हणतात.


स्टॅट्युटरी टाऊन

ज्या गावात नगरपालिका, महापालिका, कॅन्टॉन्मेन्ट बोर्ड किंवा अशीच एखादी स्थानिक स्वराज्य संस्था असेल त्या गावाला स्टॅट्युटरी टाऊन म्हणतात.


गावांचे वर्गीकरण


  1. वर्ग I : लोकवस्ती एक लाख किंवा त्याहून अधिक.
  2. वर्ग II : लोकवस्ती ५०,००० ते ९९,९९९.
  3. वर्ग III : लोकवस्ती २०,००० ते ४९,९९९.
  4. वर्ग IV : लोकवस्ती १०,००० ते १९,९९९.
  5. वर्ग V : लोकवस्ती ५,००० ते ९,९९९.

अधिक माहितीसाठी :-

Monday 4 December 2017

भारतातील ज्योतिर्लिंगे


भारतात एकूण  .१२ ज्योतिर्लिंगे आहेत.

त्यातील  १२ ज्योतिर्लिंगांपैकी पाच महाराष्ट्रात आहेत.

ज्‍योर्तिलिंगांचे नाव -- राज्य -- ज्‍योर्तिलिंगाचे ठिकाण.


सोमनाथ -- गुजरात -- वेरावळ.

मल्लिकार्जुन -- आंध्रप्रदेश -- श्रीशैल्य.

महांकालेश्वर -- मध्यप्रदेश -- उज्जैन.

ओंकारेश्वर -- मध्यप्रदेश -- ओंकारेश्वर.

रामेश्वर -- तामिळनाडु -- रामेश्वर.

विश्वेश्वर -- उत्तर प्रदेश -- वाराणसी.

केदारनाथ -- उत्तराखंड -- केदारनाथ.

महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगे :-


वैजनाथ -- महाराष्ट्र -- परळी.

भीमाशंकर -- महाराष्ट्र -- भीमाशंकर.

नागेश्वर -- महाराष्ट्र -- औंढा नागनाथ.

त्र्यंबकेश्वर -- महाराष्ट्र -- त्र्यंबकेश्वर.

घृष्णेश्वर -- महाराष्ट्र -- औरंगाबाद.


अधिक माहितीसाठी :-
www.reliableacademy.com