Friday, 29 September 2017

समाजसुधारक -- काशीबाई कानिटकर..--


..समाजसुधारक -- काशीबाई कानिटकर..--समाजसुधारक काशीबाई कानिटकर..


👉 जन्म..-
इ.स. १८६१..
अष्टे, सांगली, महाराष्ट्र..

👉 मृत्यू..-
इ.स. १९४८..

👉 कार्यक्षेत्र..-
साहित्य..

👉 पती..-
गोविद वासुदेव कानिटकर..


-- काशीबाईंचा जन्म वर्तमान महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यातील अष्टे गावी झाला..

-- न्यायालयीन पेशात असलेल्या व स्वतः व्यासंगी लेखक असलेल्या गोविंद वासुदेव कानिटकरांसोबत वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह झाला..

-- गोविंदरावांनी काशीबाईंना घरीच मराठी, संस्कृत, इंग्रजी भाषा शिकवल्या..

-- काशीबाई बनारस हिंदू विश्वविद्यालयात मराठी भाषाविषय शिकवीत असत..

-- पहिल्या भारतीय स्त्री डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी यांच्या मृत्यूनंतर त्यांचे चरित्र काशीबाई कानिटकर यांनी लिहिले..

-- काशीबाई इ.स. १९१० च्या भारतीय राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनास हजर होत्या..


👉 प्रमुख कादंबरी..-

-- रंगराव..

-- पालखीचा गोंडा..


👉 कथा संग्रह..-

-- शेवट तर गोड झाला..

-- चांदण्यातील गप्पा..

Thursday, 28 September 2017

भारतीय अर्थव्यवस्था...-- ३ री पंचवार्षिक योजना..३ री पंचवार्षिक योजना..:--

👉 कालावधी..-

इ.स. १९६१ - इ.स. १९६६..


👉 प्राधान्य..-

कृषी व मुलभुत उद्योग (१९६२ च्या चीन युद्धानंतर 'संरक्षण आणि विकास' याला प्राधान्य देण्यात आले)..


👉 खर्च..-

प्रस्तावित खर्च..- ७५०० कोटी रु., वास्तविक खर्च..- ८५७७ कोटी रु..


👉 प्रकल्प..-

१.
Intensive Agriculture Area programme-1964-65..

२.
दांतवाला यांच्या अध्यक्षतेखाली कृषी मुल्य आयोगाची स्थापना ३
वर्षांसाठी करण्यात आली.. (१९८५ मध्ये त्याचे नाव बदलून Commission for Agricultural Costs and Prices करण्यात आले आणि त्याला कायमस्वरूपी दर्जा देण्यात आला)..

३.
Food Corporation of India (१९६५)..

४.
१९६४ मध्ये IDBI व UTI ची स्थापना करण्यात आली..


👉 महत्वपूर्ण घटना..-

१.
१९६२ चे चीन युद्ध..

२.
१९६५ चे पाकीस्थान युद्ध..

३.
१९६५-६६ चा भीषण दुष्काळ..


👉 मूल्यमापन..-

-- तिसरी योजना हि पूर्णपणे अपयशी ठरली..

-- अन्न धान्याचे उत्पादन ८२ दशलक्ष टनावरून ७२ दशलक्ष टनापर्यंत कमी झाले..

-- भारतीय अर्थव्यवस्था दिवाळखोर बनली मदतीसाठी IMF कडे जावे लागले..

-- १९६६ मध्ये रुपयाचे ३६.५ टक्क्यांनी अवमूल्यन घडवण्यात आले..

Wednesday, 27 September 2017

✍ ..स्वामीनाथन आयोग..:--

स्वामीनाथन आयोग....-- स्वामीनाथन आयोग किंवा राष्ट्रीय शेतकरी (कृषक) आयोगची स्थापना हरित क्रांतीचे जनक डॉ. एम.एस. स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली १८ नोव्हेंबर इ.स. २००४ रोजी शेती व शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी करण्यात आली..

-- या आयोगाने इ.स. २००६ पर्यंत एकूण ६ अहवाल सादर केले..
शेवटचा अहवाल ४ ऑक्टोबर २००६ रोजी सादर केला..
 व या अहवालात आयोगाने शेतकर्‍यांचा दुरवस्थेची कारणे व त्यावर उपाय सुचविले..

-- देशाच्या एकूण उत्पादनात १४ टक्के वाटा हा शेतीचा आहे..

-- देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी ५० ते ५५ टक्के लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे..

-- त्यामुळे देशाच्या एकूण उत्पन्नात झालेली वाढ चांगली असली तरी रोजगार निर्मितीच्या बाबत भारत मागे आहे..


👉 आयोगाने सुचवलेल्या सुधारणा..-


-- सिलिंगप्रमाणे अतिरिक्त आणि उपजाऊ नसलेल्या जमिनीचे फेरवाटप करणे..

-- बागायती जमिनीचा आणि वनक्षेत्राचा वापर उद्योगांसाठी करण्यास प्रतिबंध करणे..

-- गवताळ जमिनीवर चराईचे अधिकार आणि वनसंपत्ती अधिकार आदिवासी आणि पशुपालकांना देणे आणि जंगलात जाण्याचे अधिकार देणे..

-- पर्यावरण आणि खनिज संपत्ती यांच्या अभ्यासातून जमिनीच्या योग्य वापरासाठी एक केंद्रीय जमीन वापर समिती निर्माण करणे..

-- शेती खरेदी करताना कोण कशासाठी आणि किती जमीन खरेदी करते आहे याचे नियमन करण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारणे..


👉 आयोगाने सुचवलेल्या उपाययोजना..-


-- पावसाच्या पाण्याचा जास्तीत जास्त वापर, जलस्रोरोत पुनर्भरणाची सक्ती..

-- 'दशलक्ष विहिरी पुनर्भरण' योजना याच खासगी विहिरींना नजरेसमोर ठेवून आखण्यात आलेली आहे..

-- पंचवार्षिक योजनेत जास्तीत जास्त निधी सिंचनासाठी राखून ठेवून त्यातील जास्तीत जास्त खर्च हा लघुप्रकल्प, भूजलपातळी वाढ आणि पाणी जिरवण्यासाठी करणे..


👉 शेतकरी आत्महत्या  रोखण्यासाठी उपाययोजना..-


-- माफक दरात आरोग्य विमा उपलब्ध करून द्यावा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांची स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्‍न करावेत..

-- आत्महत्याबहुल क्षेत्रात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशनला जास्त काम करायला लावणे आवश्यक आहे..

-- शेतकर्‍यांचा सहभाग असलेल्या शेतकरी आयोगाने सरकारी यंत्रणेचा त्वरित प्रतिसाद शेतकर्‍यांच्या समस्या सोडवायला मिळेल याची काळजी घेणे..

-- सूक्ष्मपतपुरवठा योजना सक्षम कराव्यात आणि त्याचा आवाका तंत्रज्ञान, बाजारपेठ आणि व्यवस्थापन या क्षेत्रात वाढवावा..

-- मंडल किंवा ब्लॉक पद्धत प्रमाण न धरता गावाचे क्षेत्र प्रमाण धरून सगळ्या पिकांच्यासाठी विमा योजना राबवावी..

-- वृद्धांना आरोग्यविमा आणि इतर सुविधा पुरवायला सामाजिक सुरक्षा यंत्रणा सक्षम करावी..

-- पावसाचे पाणी साठवण्यासाठी आणि जलस्स्रोत पुनर्भरणाला उत्तेजन देणे..

-- पाणी वापर आणि वाटप नियोजन गावपातळीवर करावे आणि प्रत्येक गावाला जल स्वराज्य मिळवणे आणि ग्रामसभा पाणी पंचायती म्हणून काम करतील अशी योजना राबवणे..

-- उच्च गुणवत्तेच्या बियाणांचा आणि इतर पूरक बाबींचा योग्य वेळेला, योग्य ठिकाणी आणि परवडेल अशा दरांत पुरवठा करावा..

-- कमी जोखमीचे आणि कमी किमतीचे तंत्रज्ञान पुरवण्यात यावे, जेणेकरून पीक हातातून गेले तरीही होणारा तोटा मर्यादेत राहील..

-- जिरा किंवा तत्सम पिके, जी कोरडवाहू भागात घेतली जातात, अशा पिकांच्या बाजारभावावर नियंत्रण ठेवण्यासाठी, बाजारात हस्तक्षेप करण्यासाठी यंत्रणा उभारावी..

-- सोबतच किमतीतले चढउतार सोसण्यासाठी किंमत स्थिरीकरण निधी उभारावा..

-- शेतमालाच्या आयातीवर आयातशुल्क लावण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात..

-- गरजेची माहिती शेतकर्‍यांना सहज उपलब्ध होण्यासाठी गावागावात माहिती केंद्र स्थापन करावीत..

-- आत्महत्या करण्याची प्रवृत्ती किंवा लक्षण इतर माणसांना समजण्यासाठी, उपाययोजना करण्यासाठी जनजागृती मोहीम राबवावी..


👉 शेतीची उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी उपाययोजना..-


-- सिंचन, पाण्याचा निचरा, जमिनीचा पोत आणि गुणवत्ता सुधारणे, भूजलपातळी वाढवणे, जलस्रोत रक्षण, संशोधन आणि शेतमालाच्या वाहतुकीसाठी ग्रामीण रस्ते या शेतीशी निगडित पायाभूत सुविधांमध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक व्हावी..

-- राष्ट्रीय पातळीवर आधुनिक माती परीक्षण प्रयोगशाळांची साखळी उभारून मातीची तपासणी करून सूक्ष्म पोषण द्रव्यांची तपासणी करण्याची आणि सल्ला देण्याची सुविधा असावी..

-- मातीची गुणवत्ता टिकून राहायला मार्गदर्शन, लोकांना मातीची गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्‍न करायला प्रवृत्त करणे, पाण्याची शुद्धता टिकवण्यासाठी आणि जैवविविधता टिकवण्यासाठी प्रवृत्त करणे..


👉 आयोगाने सुचवलेल्या शिफारशी..-


-- शेतकर्‍यांच्या उत्पादनाला नफ्यातील ५० टक्के वाटा मिळायला हवा..
-- शेतकर्‍यांचे खर्च वजा जाऊन उत्पन्न सरकारी कर्मचार्‍यांप्रमाणे असावे..

-- शेतमालाचा हमीभाव उत्पादन खर्च वगळता ५० % असावा..

-- शेतमालाची आधारभूत किमत लागू करण्याची पद्धत सुधारून गहू आणि इतर खाद्यान्न वगळता इतर पिकांना आधारभूत किंमत मिळायची व्यवस्था करावी
बाजाराच्या चढउतारापासून शेतकर्‍यांचे संरक्षण व्हावे म्हणून ‘मूल्य स्थिरता निधी’ ची स्थापना करावी..

-- आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतीच्या दुष्परिणाम पासून शेतकर्‍यांचे संरक्षण करण्यासाठी इतर देशामधून येणार्‍या शेतमालाला आयात कर
लावावा..

-- दुष्काळ व इतर आपत्तीपासून बचावासाठी ‘कृषी आपत्काल निधी’ ची स्थापना करावी.
कृषी पतपुरवठा प्रणालीचा विस्तार करावा..

-- पीक कर्जावरील व्याजाचा दर कमी करावा..

-- हलाखीची स्थिती असेलेल्या क्षेत्रामध्ये नैसर्गिक आपत्ती वेळी, पूर्वस्थिती येईपर्यंत गैरसंस्थात्मक कर्जासाहित सर्व कर्जाची वसुली स्थगित करून त्यावरील व्याज माफ करावे..

-- संपूर्ण देशातील सर्व पिकांना कमीत कमी हप्‍त्यावर विमा संरक्षण मिळेल अशा रीतीने पीक विमा योजनेचा विस्तार व ‘ग्रामीण विमा विकास निधी’ ची स्थापना करावी..

-- पिकांच्या नुकसानीचे मूल्यमापन करत असताना ब्लॉक ऐवजी गाव हा घटक वापरून विमा संरक्षण द्यावे..

-- सामाजिक सुरक्षेचे जाळे निर्माण करून त्या अंतर्गत शेतकर्‍यांसाठी वृद्धावस्थेत आधार तसेच स्वास्थ्य विम्याची तरतूद करावी..

-- परवडणार्‍या दरात बी-बियाणे व इतर यंत्रसामुग्री उपलब्ध करून द्यावी..

-- संपूर्ण देशात प्रगत शेती व माती परीक्षण प्रयोगशाळेचे संचालन..

-- शेतीला कायम आणि सम प्रमाणात सिंचन आणि वीजपुरवठा व सिंचन व्यवस्थेत आमूलाग्र सुधारणा घडवून आणाव्य

Tuesday, 26 September 2017

१८५७ चा उठाव..

१० मे १८५७ - २० जून १८५८

स्थान :- उ.भारतीय मैदानी प्रदेश,बंगाल

परिणती 

 • ईस्ट इंडिया कंपनीचा अंमल संपुष्टात.
 • शिपायांचा उठाव दडपला गेला.
 • ब्रिटीश राणीचा अंमल सुरू. • १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध हे १० मे १८५७ रोजी मीरत येथील लष्करछावणीतील बंडापासून सुरू झाले व लवकरच ते उत्तर व मध्य भारतातील अनेक ठिकाणी पसरले.
 • हा लढा १८५७चे स्वातंत्र्यसमर, पहिला भारतीय स्वातंत्र्यलढा, शिपाई बंडाळी अशा इतर नावांनीही ओळखला जातो..

उठावाची राजकीय कारणे 

 1. सन 1600 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली.
 2. व्यापार करणे हा कंपनीचा मुख्य हेतु होता.
 3. परंतु भारतातील अस्थिर राजकीय परिस्थितीचा फायदा घेऊन कंपनीने सत्ताविस्तारास सुरुवात केली.
 4. र्लॉड वेलस्ली, र्लॉड हेस्टिंग्ज र्लॉड डलहौसी या गव्हर्नर जनरलची प्रचंड सत्ताविस्तार करुन सर्व देशभर कंपनीचे वर्चस्व निर्माण केले.
 5. कंपनीच्या या राजकीय हस्तक्षेपामुळे ज्या संस्थानिकांच्या सत्ता नामशेष झाल्या ज्यांचे व्यापार, उद्योग बुडाले ते लोक असंतुष्ट झाले.
 6. इ.स. 1798 मध्ये वेलस्ली गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला.
 7. त्याने तैनाती फौजेच्या पध्दतीचा अवलंब करून साम्राज्य विस्तारावर भर दिला.
 8. तैनाती फौज दुर्बल संस्थानिकांच्या अंतर्गत व बाहय संरक्षणासाठी देण्यात आली.
 9. याच्या मोबदल्यात संस्थानिकास कंपनीस रोख रकमेऐवजी आपल्या राज्याचा काही प्रदेश तोडून द्यावा लागे.या फौजेचा खर्च संस्थानिकास करावा लागे.
 10. इ.स. 1848 मध्ये र्लॉड डलहौसी गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला तो अतिशय महत्वाकांक्षी व साम्राज्यावादी वृत्तीवरचा होता. 
 11. र्लॉड डलहौसी देशी राज्यांना ब्रिटिश साम्राज्यात विलीन करण्यासाछी, खालसा पध्दतीचा अवलंब केला.

उठावाची धार्मिक कारणे

 1. इ.स. 1813 च्या चार्टर अॅक्टनुसार धर्मप्रसारासाठी कंपनीची मदत मिळू लागली.
 2. अनेक धर्म प्रसारक ख्रिश्चन धर्मप्रसारासाठी भारतात येऊ लागले.
 3. कंपनी सरकारने अनेक हिंदू मंदिरांची व मुस्लीम मशिदीची वतने काढून घेतली. यामुळे धर्मगुरु व मौलवंशीची अप्रतिष्ठा झाली. धार्मिक असंतोष वाढीस लागला.

उठावाची प्रमुख कारणे

 • बंगाल प्रांत काबीज केल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीने आपले साम्राज्यवादी धोरण पुढे नेत अनेक प्रदेश भारतीयांकडून जिंकले व रयतेवर जुलूमी शासन लादले.
 • कंपनीच्या सैन्यातील एकाच पदावर असलेल्या ब्रिटिश व भारतीय सैनिकांमध्ये भेद केला जात असे.
 • ब्रिटिश सैनिकाला भारतीय सैनिकापेक्षा अधिक सोयीसुविधा व पगार दिला जात असे.
 • कंपनी सरकारने भारतीयांना नीळ,अफू अशी नगदी पीके घेण्यास सक्ती केली.
 • भारतीयांकडून ही पीके ते स्वस्तात विकत घेत व चीनमधे जाऊन मोठ्या नफ्याने विकत.
 • शेतकरी,कामगारांकडून मोठ्या प्रमाणात करवसुली केली जात असे.
 • १८५७ च्या सुरुवातीला सरकारने नव्या बंदुका आणल्या.
 • त्या बंदुकांची काडतुसे गुळगुळीत होण्यासाठी गायीच्या वा डुक्कराच्या चरबीत बुडवलेली असत. गाय हिंदूना पवित्र तर डुक्कर मुसलमानांना निषिद्ध असते.
 • बंदुकीत भरण्यापूर्वी अशी काडतुसे ओठात धरून उघडावी लागत. त्यासाठी ती काडतुसे तोंडात घालण्याची जबरदस्ती केल्याने भारतीय सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता.
 • या व अशा कारणांमुळे शिपायांनी बंड पुकारण्याचे ठरवले.
 • खरे कारण भारतीयांना देश ईस्ट इंडिया कंपनीपासून मुक्त करायचा होता, हे आहे.


अधिक माहितीसाठी :-
www.reliableacademy.com

Monday, 25 September 2017

समाजसुधधारक -- धोंडो केशव कर्वे..


समाजसुधधारक -- धोंडो केशव कर्वे..

👉 टोपणनाव..-
अण्णा..

👉 जन्म..-
एप्रिल १८, इ.स. १८५८
मुरूड..

👉 मृत्यू..-
नोव्हेंबर ९, इ.स. १९६२..

👉प्रमुख चळवळ..-
स्त्री शिक्षण आणि सामाजिक सुधारणा..

👉 पुरस्कार..-
भारतरत्‍न..

👉 वडील..-
केशव कर्वे..

👉 पत्नी..-
राधाबाई धोंडो कर्वे , आनंदीबाई धोंडो कर्वे..


👉 बालपण आणि तारुण्य..--

-- रत्‍नागिरी जिल्ह्यातील मुरूड हे अण्णांचे गाव..
शिक्षणासाठी त्यांना खूप पायपीट करावी लागली..

-- इ.स. १८८१ मध्ये मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला..
त्या कॉलेजातून त्यांनी गणिताची पदवी संपादन केली..

-- वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांचा राधाबाईंशी विवाह झाला. राधाबाई त्या वेळी ८ वर्षांच्या होत्या..

-- वयाच्या २७ व्या वर्षी, इ.स. १८९१ साली बाळंतपणात राधाबाईंचा मृत्यू झाला..

-- प्रौढ वयात विधुर झालेल्या पुरुषानेही अल्पवयीन कुमारिकेशीच लग्न करण्याची त्या काळात प्रथा होती..

-- लहान वयात मुलींची लग्ने होत, पण दुर्दैवाने पती लवकर मरण पावला तर त्या मुलीला मात्र त्याची विधवा म्हणून उर्वरित आयुष्य घालवावे लागे..

-- ही समाज रीत नाकारणाऱ्या अण्णांनी पंडिता रमाबाईंच्या शारदा सदन संस्थेत शिकणाऱ्या गोदूबाई या विधवा मुलीशी पुनर्विवाह केला..

-- ही गोष्ट काळाला मानवणारी नव्हती. अण्णा पत्‍नीसह मुरूडला गेल्यानंतर अण्णांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याचा ठराव संमत झाला..

-- याच गोदूबाई पुढे आनंदी कर्वे किंवा बाया कर्वे म्हणून ख्यातनाम झाल्या..

-- अण्णासाहेबांच्या कार्यात बाया कर्वे यांचा सक्रिय वाटा होता..

-- इ.स. १८९१ साली अण्णासाहेबांनी फर्ग्युसन कॉलेजात गणित शिकवायला सुरुवात केली..

-- पुढे इ.स. १९१४पर्यंत त्यांनी ही नोकरी केली..
अण्णा गणिती होते..

-- लोकमान्य टिळक हे फर्ग्युसन महाविद्यालयात गणिताचे अध्यापन करीत होते..
पण राजकारणाच्या रणधुमाळीत ते उतरल्यानंतर त्यांच्या रिकाम्या जागी गणित विभागाचे प्रमुख असणारे गोपाळ कृष्ण गोखले यांनी अण्णांना बोलावून घेतले..

-- इ.स. १८९१ ते इ.स. १९१४ या प्रदीर्घ कालखंडात अण्णांनी गणित हा विषय शिकवला..


👉 ..कार्य..--

-- इ.स. १९०० मध्ये अनाथ बालिकाश्रमाचे स्थलांतर हिंगण्यास करण्यात आले..

-- याच परिसरात अण्णांनी विधवांसाठी एक हक्काची सावली निर्माण केली..
विधवांचे हे वसतिगृह ही एक सामाजिक प्रयोगशाळा होती..

-- पंडिता रमाबाई आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या जीवनकार्यांमुळे अण्णासाहेब खूपच प्रभावित झाले होते..
थोर तत्त्वज्ञ हर्बर्ट स्पेन्सर यांच्या विचारांचाही त्यांच्यावर पगडा होता..

-- इ.स. १८९६मध्ये अण्णासाहेबांनी पुण्याजवळील हिंगणे (आता कर्वेनगर) या गावी विधवा महिलांसाठी आश्रम स्थापन केला..

-- या आश्रमात याच ठिकाणी इ.स. १९०७ साली महिला विद्यालयाची स्थापना त्यांनी केली..

-- अण्णासाहेबांची २० वर्षांची विधवा मेहुणी - पार्वतीबाई आठवले - या विद्यालयाच्या पहिल्या विद्यार्थिनी होत..

-- आश्रम आणि शाळा या दोन्हींसाठी लागणारे कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी त्यांनी '`निष्काम कर्म मठा'ची स्थापना इ.स. १९१० साली
केली..

-- पुढे या तिन्ही संस्थांचे कार्य उत्तरोत्तर वाढत गेल्याने त्याचे एकत्रीकरण करून `'हिंगणे स्त्री शिक्षण संस्था' आणि त्यानंतर `महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था' असे त्याचे नामकरण करण्यात आले..

-- १९९६साली त्यांच्या कार्यारंभाला १०० वर्षे पूर्ण झाली म्हणून महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था दरवर्षी शैक्षणिक आणि सामाजिक कार्य करणाऱ्या स्त्रीला बाया कर्वे पुरस्कार देते..

-- जपानच्या महिला विद्यापीठाला भेट दिल्यानंतर अण्णासाहेब अत्यंत प्रभावित झाले..

-- त्यांनी पुण्यात भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना झाली..

-- पुढे विठ्ठलदास ठाकरसी यांनी १५ लाखांचे अनुदान दिल्याने या विद्यापीठाचे `श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ' (एसएनडीटी) असे नामकरण करण्यात आले..

-- अण्णासाहेबांनी अनेक परदेश दौरे केले..

-- कर्वे यांची चारही मुले रघुनाथ, शंकर, दिनकर आणि भास्कर यांनीही पुढे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये भरीव कार्य केले..


👉 ..आत्मचरित्र..--

-- मराठी (आत्मवृत्त, इ.स. १९२८) आणि इंग्रजी (लुकिंग बॅक, इ.स. १९३६)..


👉 ..श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी या विद्यापीठची स्थापना..--

-- शिक्षण संस्थांभोवती कार्यकर्त्यांची तटबंदी असावी म्हणून इ.स. १९०८ मध्ये ‘निष्काम कर्ममठ‘ या संस्कारपीठाची स्थापना केली..

-- इ.स. १९१५ मध्ये भरलेल्या अखिल भारतीय सामाजिक परिषदेचे अध्यक्षस्थान अण्णांनी भूषविले..

-- अध्यक्षीय भाषणात त्यांनी ‘महिला विद्यापीठ‘ या कल्पनेचा पुनरुच्चार केला..


-- ३ जून, इ.स. १९१६ रोजी महिला विद्यापीठाची स्थापना झाली..

-- इंग्लंड, जर्मनी, जपान, अमेरिका या देशांना भेटी देऊन अण्णांनी आपल्या संस्थांची आणि संकल्पांची माहिती जगाला करून दिली..

-- बर्लिनमध्ये असताना सापेक्षतावादाचे प्रणेते प्रा. अल्बर्ट आइनस्टाइन यांची त्यांनी भेट घेतली..
त्यांनी बर्लिनमधली गृहविज्ञानशाळा पाहिली..

-- टोकियोतील महिला विद्यापीठ पाहिले..
अनेक राष्ट्रांत स्त्रियांनी चालविलेल्या संस्था पाहिल्या..

-- त्या दर्शनाने सुचलेल्या अनेक नव्या योजना त्यांनी पूर्णत्वास नेल्या..
अनेक भारतीय विद्यापीठांनी त्यांना डी.लिट. देऊन सन्मानित केले..

-- `पद्मविभूषण' हा किताब त्यांना इ.स. १९५५ साली प्रदान करण्यात आला, तर लगेच इ.स. १९५८ साली त्यांना भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान `भारतरत्‍न'ने सन्मानित करण्यात आले..

-- एकशेचार वर्षांचे दीर्घायुष्य देऊन निसर्गानेही त्यांना सन्मानित केले..
पुण्यातच ९ नोव्हेंबर, इ.स. १९६२ ला त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले..समाजसुधधारक -- धोंडो केशव कर्वे..


Sunday, 24 September 2017

✍ २..री पंचवार्षिक योजना..--

भारतीय अर्थव्यवस्था..-- २..री पंचवार्षिक योजना..


👉 ..कालावधी..--
इ.स. १९५६ - इ.स. १९६१..

👉 प्राधान्य..--
जड व मुलभुत उद्योग मॉडेल.. Mahalanobis Model..

👉 खर्च..--
प्रस्तावित खर्च - ४८०० कोटी रु., वास्तविक खर्च - ४६०० कोटी रु..

👉 प्रमुख प्रकल्प..-

१.
भिलाई (छत्तीसगड) पोलाद प्रकल्प(१९५९) -
रशियाच्या मदतीने..
२.
रुरकेला (ओरिसा) पोलाद प्रकल्प(१९५९) -
जर्मनीच्या मदतीने..
३.
दुर्गापूर (पश्चिम बंगाल) पोलाद प्रकल्प(१९६२) -
ब्रिटनच्या मदतीने..
४.
BHEL (Bharat Heavy Electricals Ltd.) -
भोपाळ..
५.
नानगल व रुरकेला खत कारखाने..
६.
पेरांम्बर रेल्वे वाघिणींचा कारखाना उभारण्यात आला..

👉 महत्वपूर्ण घटना..--

१.
भारताचे दुसरे औद्योगिक धोरण १९५६ जाहीर..
२.
Intensive Agriculture district programme –
(1960) मूल्यमापन - आर्थिक वाढीचा दर ७.५% (संकल्पित) ४.२% (साध्य) किंमतीचा निर्देशांक ३० टक्क्यांनी वाढला..
३.
पेराम्बूर कारखान्याचे उत्पादन वाढविण्यात आले..
४.
नॅशनल ऑरगॅनिक केमिकल..
५.
समाजवादी समाजरचनेचा स्वीकार..
६.
कुटुंब नियोजनाचे कुटुंब कल्याण असे नामकरण..
७.
बलवंत रॉय मेहता आयोगाची स्थापना - 1957..

Saturday, 23 September 2017

✍ पहिली पंचवार्षिक योजना..

-- कृषी, वाहतूक, औद्योगिकरण, आर्थिक विकास आणि त्याच बरोबर सामाजिक न्याय, साक्षरता, देशातील गरिबी दुर व्हावी व देशाचा सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने भारतीय पंचवार्षिक योजना ( Five-Year plans of India) भारतीय नियोजन आयोगामार्फत राबविल्या गेल्या..
-- राष्ट्रीय विकास परिषद(एनडीसी) पंचवार्षिक योजनांना अंतिम रूप दिले गेले..
-- भारताचे पंतप्रधान हे भारतीय नियोजन मंडळाचे व राष्ट्रीय विकास परिषदेचे पदसिध्द अध्यक्ष असतात..
अर्थातच भारतीय पंचवार्षिक योजनेचे अध्यक्षपदी पंतप्रधानच असतात..
 ..पहिली पंचवार्षिक योजना..
-- कालावधी :--
इ.स. १९५१ - इ.स. १९५६..
-- अध्यक्ष :--
पंतप्रधान
पं.जवाहरलाला नेहरु..
-- अग्रक्रम :--
कृषी विकास..
-- प्रतिमान :-
हेरॉल्ड-डोमर..
-- पहिल्या योजना काळात सार्वजनिक क्षेत्रात २०६९ कोटी रु. खर्च करण्याचे ठरविले , तरी प्रत्यक्षात मात्र १९६० कोटी रु. दुसऱ्या महायुद्धाचे झालेले परिणाम व नुकत्याच झालेल्या फाळणीमुळे मोठ्या प्रमाणावर अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली..
 महत्त्वपुर्ण प्रकल्प :--
१. दामोदर खोरे विकास योजना (झारखंड-पश्चिम बंगाल)..
२. भाक्रा-नानगल प्रकल्प (सतलज नदीवर,हिमाचल प्रदेश-पंजाब)..
३. कोसी प्रकल्प (कोसी नदी बिहार)..
४. हिराकूड योजना (महानदीवर ओरिसा)..
५. सिंद्री (झारखंड) खत कारखाना..
६. चित्तरंजन (पश्चिम बंगाल) येथे रेल्वे इंजिनचा कारखाना..
७. पेरांबुर (तामिळनाडू) येथे रेल्वे डब्यांचा कारखाना..
८. HMT- बँगलोर..
९. हिंदुस्थान एंटीबायोटिक..
 ..महत्वपूर्ण घटनाक्रम :--
१. औद्योगिक विकास व नियमन अधिनियम १९५१ लागू..
२. Community Development Programme 1952..
३. अखिल भारतीय हातमाग बोर्ड (१९५२) आणि अखिल भारतीय खादी व ग्रामोद्योग बोर्ड (१९५३) स्थापना..
४. १९५५ मध्ये गोरवाल समितीच्या शिफारशीनु इम्पिरियल बँकेचे रुपांतर स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये करण्यात आले..
५. भारतीय औद्योगिक पत आणि गुंतवणूक महामंडळ (१९५५)..
 .. या योजनेचे मूल्यमापन :--
-- योजना सर्व बाबतीत यशस्वी झाली..
-- अन्न धान्याचे उत्पादन ५२.२ दशलक्ष टनावरून (१९५१-५२) ६५.८ दशलक्ष टनापर्यंत (१९५५-५६) वाढले..
-- आर्थिक वाढीचा दर २.१% (संकल्पित) ३.६% (साध्य) राष्ट्रीय उत्पन्न १८ टक्क्यांनी तर दरडोही उत्पन्न ११ टक्क्यांनी वाढले..
-- तसेच किंमतीचा निर्देशांक १३ टक्क्यांनी कमी झाला..

Thursday, 21 September 2017

हडप्पा संस्कृती...


-- हडप्पा संस्कृती ही जगातील प्राचीन ताम्र युगीन संस्कृतींपैकी एक आहे..

-- हिचा कालखंड लिबी यांच्या कार्बन १४ या शास्त्रीय पद्धतीनुसार इ.स.पूर्व २७०० ते इ.स.पूर्व १५०० असा मानला जातो..

-- इ.स. १९२० च्या सुमारास लाहोर-मुलतान रेल्वे मार्गाचे काम सुरू असताना काही प्राचीन विटांचे अवशेष सापडले..

-- यामुळे पुरातत्त्व खात्याने याचा शोध घेण्यासाठी --सर जॉन मार्शल-- यांच्या नेतृत्वाखाली उत्खनन सुरू केले आणि एक प्राचीन संस्कृती प्रकाशात आली..

-- या संस्कृतीचे प्रथम अवशेष हडप्पा येथे सापडले म्हणून नव्यानेच शोधलेल्या या संस्कृतीला हडप्पा संस्कृती असे म्हणतात..

-- ही संस्कृती प्रामुख्याने सिंधू नदीच्या प्रदेशात केंद्रित असल्याने तिला 'सिंधू संस्कृती' असेही म्हणतात..

-- उत्खननात हडप्पा व मोहनजोदडो या दोन्ही नगरांच्या ठिकाणी एकाच प्रकारच्या मुद्रा आढळून आल्या..

-- अशाच प्रकारच्या संस्कृतीचे अवशेष पश्चिम भारतात कालीबंगन, धोळावीरा, सुरकोटडा, लोथल, दायमाबाद इत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणात सापडले..

👉🏻 ..नगररचना..--

-- हडप्पा संस्कृतीची नगररचना व स्थापत्य अत्यंत प्रगत होते..

-- घरे, तटबंदी, सांडपाण्याची व्यवस्था, स्नानगृहे, धान्याची कोठारे, जहाजाची गोदी इत्यादी घटक पाहता हडप्पाकालीन संस्कृतीच्या प्रगत स्थापत्याची कल्पना येते..

-- प्राचीन इजिप्त व मेसोपोटेमिया या समकालीन संस्कृतींच्या अगदी विरुद्ध हडप्पामध्ये कोणतीही भव्य मंदिरे किंवा तत्सम बांधकामे नव्हती..

-- हडप्पाकालीन नगराची विभागणी प्रशासकीय इमारती व लोकवस्ती अशा दोन घटकांत करण्यात आलेली होती..

-- शहराच्या लोकवस्तीचा भाग बुद्धिबळाच्या पटाप्रमाणे किंवा जाळीप्रमाणे विविध प्रभागांमध्ये विभागला होता..

-- नगर बांधणीसाठीच्या विटा ४:२:१(लांबी:रुंदी:उंची) या प्रमाणातच असत..

👉🏻 ..घरे..--

-- हडप्पा संस्कृतीत प्रत्येक प्रभागात २० ते ३० घरे असत..
ती पक्क्या विटांची असून प्रशस्त होती..

-- प्रत्येक घरामध्ये स्नानगृह असे..
काही घरांच्या परसात विहिरी आढळल्या आहेत..

-- घरांच्या मध्यभागी, जसे आजही वाड्यांच्या व इतर भारतातील पारंपरिक घरांमध्ये असते, तसे.अंगण असे..
घरे एक किंवा दोन मजली
असत..

-- फारच क्वचित याहून अधिक मजले असत...

-- हडप्पाकालीन नगरांना संरक्षक तटबंदी असे..
तटबंदी रुंद असून तिचे बांधकाम पक्क्या विटांचे असे..
तटबंदीला बुरूज होते..
यावरून हडप्पा संस्कृतीने नगराच्या संरक्षणाकडे लक्ष दिल्याचे दिसते..

👉🏻 ..रस्ते..--

-- शहराच्या प्रभागाकडून जाणारे रस्ते मुख्य रस्त्यांना जोडलेले असत..

-- रस्ते पुरेसे रुंद असून ते एकमेकांना काटकोनांत छेदणारे होते..

-- रस्त्यांच्या कडेला सापडलेल्या लाकडांच्या अवशेषांवरून रस्त्यांवर दिवाबत्तीची सोय असावी असे दिसते..

👉🏻 ..स्नानगृह व सांडपाण्याची व्यवस्था..--

-- हडप्पा संस्कृतीत सार्वजनिक स्नानगृहे होती..
मोहनजोदडो येथे एका भव्य स्नानगृहाचे अवशेष सापडले..

-- या स्नानगृहाची लांबी १२ मीटर, रुंदी ७ मीटर आणि खोली २.५ मीटर आहे..

-- याच्या बाहेरच्या भिंती ७ ते ८ फूट रुंदीच्या असून कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र खोल्यांची व्यवस्था होती..

-- स्नानगृहाचे वापरलेले पाणी बाहेर सोडण्याची व शुद्ध पाणी आत आणण्याची व्यवस्था केलेली होती..

-- लोथल येथील उत्खननामध्ये एका प्रचंड गोदीचे अवशेष सापडले..

-- या गोदीची लांबी २७० मीटर तर रुंदी ३७ मीटर आहे..
या गोदीवरून जहाजबांधणी, व्यापार, व्यापारीमार्ग यांची माहिती या संस्कृतीमधील लोकांना होती असे दिसून येते..

-- येथे सापडलेल्या एका मुद्रेवर जहाजाचे चित्र कोरले आहे.. तसेच लोथल येथे पक्क्या विटांनी बांधलेली धान्य कोठारे सापडली आहेत..

-- हडप्पा संस्कृतीत सांडपाणी व पावसाचे पाणी गावाबाहेर वाहून नेण्यासाठी एक मीटर खोल भुयारी गटारांची व्यवस्था होती..

-- ही गटारे दगड व पक्क्या विटांनी बांधलेली होती..

👉🏻 ..समाजरचना..

-- हडप्पा संस्कृतीत कुटुंबसंस्था महत्त्वाची होती..

-- नगररचनेच्या अवशेषांवरून समाजात राज्यकर्त्यांचा वर्ग, व्यापारी वर्ग व सर्वसामान्यांचा वर्ग असल्याचे दिसते..

-- नद्यांच्या काठी सुपीक प्रदेशात ही संस्कृती विकसित झालेली असल्याने शेती हा समाज जीवनाचा कणा होता..

👉🏻 ..इतर माहीती..

-- हडप्पाकालीन संस्कृतीच्या उत्खननात एक शृंगारपेटी मिळाली..
यामध्ये ब्राॅन्झचे आरसे, हस्तिदंती कंगवे, केसासाठी आकडे, पिना, ओठ व भुवया रंगवण्यासाठी लागणाऱ्या विविध रंगाच्या कांड्या मिळाल्या..

-- हडप्पाकालीन लोकांना सौंदर्यप्रसाधनांप्रमाणेच अलंकाराची आवड होती.. उत्खननामध्ये मण्यांचे व सोन्याचे हार, बांगड्या, अंगठ्या, वाक्या, कमरपट्टा इत्यादी अलंकार मिळाले तसेच नर्तकीचा ब्राँझचा पुतळा मिळाला..
तिच्याही हातात बांगड्या व गळ्यात हार आहे..

-- हडप्पा संस्कृतीधील मातीच्या भांड्यांवर मिळालेले कापडाचे ठसे, मृण्मयमूर्तीवर दाखवलेले वस्त्र, उत्खननात मिळालेल्या विविध आकारांच्या सुया यावरून लोकांना वेशभूषेचे चांगले ज्ञान असल्याचे दिसते..

-- तसेच तत्कालीन मूर्तींवरून केशभूषेची माहिती मिळते..

-- पुरुष दाढी कोरत, मधोमध भांग पाडत तर स्त्रिया विविध प्रकारची केशरचना करत असत..

-- हडप्पाकालीन लोकांची सोंगट्या, फासे ही करमणुकीची साधने होती..

-- नृत्य, गायन, शिकार व प्राण्यांच्या झुंजी इत्यादींमधून करमणूक केली जाई..

-- तेथील लोकांचा प्रमुख आहार गहू होता. त्याचबरोबर जव, तीळ, वाटाणा, यासारखी दुय्यम धान्ये सुद्धा पिकवीत असत..

-- खजुराचा उपयोगही ते अन्न म्हणून करीत असत..
येथील लोक पशू बाळगीत त्यामुळे दूधदुभत्यांचा पुरवठा त्यांच्याकडे होत असावा..
तसेच मांसाहारही केला जात असे..

-- येथील लोक अनेक प्रकारच्या वजनांचा उपयोग करीत..
त्यांत दोराने उचलण्याच्या वजनापासून ते सोनाराने उपयोगात आणलेल्या लहानशा वजनापर्यंतचा समावेश होता..

-- वजन माप हे 16 च्या पटितील होते..

-- 0.8565 हे वजन कमीत कमी होते व 274.938 हे जास्तीत जास्त होते..

👉🏻 ..धर्मकल्पना..--

-- हडप्पा संस्कृतीत उत्खननात सापडलेल्या विविध मुद्रा, मूर्ती, अग्निकुंड, मृतांना पुरण्याची पद्धत यावरून त्यांच्या धार्मिक कल्पनेची माहिती मिळते..

-- लोकांची प्रामुख्याने शेतीवरती उपजीविका असल्याने लोक भूमातेस मातृदेवता मानत..

-- त्यांच्या धार्मिक जीवनात निसर्गशक्तीस महत्त्वाचे स्थान होते. सूर्य, जल, अग्नी, वृक्ष यांची ते पूजा करत..

-- कालिबंगन येथे सापडलेल्या अग्निकुंडावरून ते अग्निपूजा करत असल्याचे दिसते..

-- निसर्गदेवतेप्रमाणेच पशुपती, नाग, वृषभ म्हणजे बैल यांचीही ते पूजा करत होते..
लोक मूर्तिपूजक होते, मात्र हडप्पा संस्कृतीत मंदिरे आढळली नाहीत..

-- तेथील लोक मृतदेहाचे विधिपूर्वक दफन करत..
दफन करते वेळी त्यांचे सोबत अलंकार व भांडी ठेवली जात..

-- अंतविधी संस्कार:पूर्णसमाधी,आंशिकसमाधी,दाहकर्म..

👉🏻 ..या संस्कृतीच्या विनाशाची अनेक कारणे सांगितली जातात त्यातील काही प्रमुख कारणे..:--

१) नैसर्गिक संकटामुळे..-

- नदीला आलेला पूर/अतिवृष्टी
भूकंप..
- हवामानात होणारा बदल..
- जमिनीची सुपिकता घटली..
- थर वाळवंट विस्तारल्याने सरस्वती नदी लुप्त होणे..

२) बाह्य आक्रमणे..-
आर्यांचे आक्रमण
युयुत्सु लोकांचे आक्रमण..

३) तंत्रज्ञानावरील मक्तेदारी संपली..

४) राजकीय विघटनामुळे नाश..

५) आर्थिक विघटनामुळे नाश..

६) कायदा व सुव्यवस्था नसावी...

👉🏻 पुणे डेक्कन कॉलेज, खरगपूर येथील इंडियन इन्स्टिटय़ुट ऑफ टेक्नॉलॉजी व इतर संस्थांनी २०१६ साली केलेल्या एका नव्या संशोधनातून प्राचीन सिंधू संस्कृती ही ५५०० वर्षांपूर्वीची नसून ८००० वर्षांपूर्वीची असल्याचे निष्कर्ष काढले गेले आहेत..

👉🏻 ‘नेचर’ या विज्ञानसंशोधनविषयक नियतकालिकाच्या एप्रिल २०१६ च्या अंकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे..

👉🏻 २०१४ मध्ये तामिळनाडुतील शिवगंगा जिल्‍ह्यातील पल्‍लीसंथाई थिडल या गावात जमिनीखाली गाडले गेलेले हडप्‍पा संस्‍कृतीसारखे अवशेष आढळून आले आहेत..

👉🏻 बंगळूरू येथील पुरात्‍तव विभागाच्‍या संशोधकांनी याचा शोध लावला आहे..

Wednesday, 20 September 2017

✍ ..महाराष्ट्रातील व भारतातील मृदेचे वितरण..:-


✍  ..महाराष्ट्रातील व भारतातील मृदेचे वितरण..:-


-- मूळ खडकाचे अपक्षय (विदारण) होते..
त्यामध्ये सेंद्रिय द्रव्ये मिसळली जातात..
मृदांच्या कणांमध्ये असणाऱ्या पोकळीत वायू भरलेला असतो आणि काही प्रमाणात पाण्याचाही अंश असतो..
अशा संयुक्त घटकांनी निर्माण होणाऱ्या पदार्थाला ‘मृदा’
असे म्हणतात..


१.
गाळाची मृदा..:--

-- भारतीय उपखंडाच्या खंडांतर्गत भागात नद्यांनी वाहून आणलेला गाळ व सागर किनारपट्टीवर सागरी लाटांच्या कार्यामुळे गाळाची मृदा तयार झाली आहे..

-- प्रामुख्याने सतलज-गंगा-ब्रह्मपुत्रा नद्यांच्या मदानी प्रदेशात गाळाची मृदा आढळते..

-- उत्तर भारतात पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, आसाम राज्यात गाळाची मृदा आहे..

-- उत्तरेकडील मदानी प्रदेशात गाळाच्या संचयन काळानुसार त्याचे दोन उपप्रकार आहेत :-
जुनी गाळाची मृदा-भांगर,
नवीन गाळाची मृदा-खादर..


२.
काळी मृदा/ रेगूर मृदा..:--

-- दख्खनच्या पठारावर काळी मृदा आढळते.. तिला रेगूर मृदा या नावानेही ओळखतात..

-- बेसॉल्ट व ग्रॅनाइट खडकांचे विदारण होऊन काळी मृदा तयार झाली आहे..

-- महाराष्ट्रात काळी मृदा विस्तृत प्रमाणात आढळते..

-- कर्नाटकात उत्तरेकडे या मृदेचा रंग अधिक काळा होत जातो..

-- आंध्र प्रदेशात गोदावरी व कृष्णा खोऱ्यात खोल काळी मृदा आढळते..

-- या मातीत लोह, अ‍ॅल्युमिनिअम व ह्यूमसचे प्रमाण जास्त असते..
तसेच टिटॅनी फेरस मॅग्नेटाइट (मुख्यत: टिटॅनिअम) मुळे त्या मृदेला काळा रंग प्राप्त झालेला आहे..

-- उन्हाळ्यात या जमिनींना भेगा पडतात..
मोसमी काळात पावसाच्या पाण्याने या मृदा फुगतात..

🌾 पिके..--

-- काळ्या मृदेतून खरीप व रब्बी पिकांचे उत्पादन घेतले जाते..

-- कापूस, ऊस, तंबाखू यांसारख्या नगदी पिकांचे उत्पादन घेतले जाते, तृणधान्ये, तेलबिया, विविध प्रकारचा भाजीपाला, संत्री- मोसंबी- द्राक्षांसारखी फळे
पिकवली जातात..

-- या जमिनीची ओलावा धरून ठेवण्याची क्षमता जास्त असल्याने कोरडवाहू शेतीसाठी ही जमीन आदर्श मानली जाते..


👉🏻 ..महाराष्ट्रातील काळी मृदा..--

-- सहय़ाद्री पर्वताच्या पूर्वेकडे घाटमाथा ओलांडल्यावर संपूर्ण प्रदेश काळय़ा मृदेचा असून विदर्भातील पूर्वेकडील प्रदेश वगळता सर्वत्र काळी मृदा आढळते..

🌾 पिके..--

-- महाराष्ट्रातील सर्वोत्तम मृदेत काळी मृदा प्रसिद्ध आहे..

-- कापूस, गहू, ऊस, ज्वारी, तंबाखू, जवस तसेच कडधान्यांचे उत्पादनही घेतले जाते..

-- पश्चिम महाराष्ट्रात जलसिंचनाच्या उत्तम सोयी उपलब्ध झाल्यामुळे उसाचे क्षेत्र वाढलेले आहे..

-- तसेच काही प्रमाणात कापसाची लागवड केली जाते..
विशेषत -- गोदावरी, भीमा व कृष्णा नद्यांच्या खोऱ्यातील ऊस, कापूस, तंबाखू, भुईमूग वगरेंसारखी नगदी पिके, विदर्भात कापूस हे सर्वात महत्त्वाचे पीक आहे..

-- खानदेशमध्ये तापी नदीच्या खोऱ्यात कापसाच्या खालोखाल केळीच्याही बागा व इतर पिकेही आहेत..


३.  
जांभा मृद..:-

-- सह्य़ाद्रीच्या घाटमाथ्यावर, पूर्व घाट, राजमहल टेकडय़ांवर, केरळ, कर्नाटक तसेच महाराष्ट्रातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्य़ांमध्ये राधानगरी, आंध्रप्रदेशात मेडक, ओडिशात मयूरभंज येथे जांभा मृदा आढळते..

-- उष्ण कटिबंधीय प्रदेशात आद्र्र हवामानात जांभा जमीन तयार होते..

-- पावसाचे प्रमाण २०० सें.मी.पेक्षा जास्त असल्याने खडकाचे अपक्षरण होते..

-- खडकामधील सिलिकांवर अपक्षयाची क्रिया होऊन लिचिंगची प्रक्रिया व त्यापासून आयर्न ऑक्साइड तयार होते..
अशा तांबूस पिवळसर जमिनीस ‘जांभा मृदा’ असे म्हणतात..

-- अ‍ॅल्युमिनिअम ऑक्साइड व लोह ही द्रव्ये या मृदेत असतात..
ही मृदा फारशी सुपीक असत नाही..

-- परंतु खताला लगेचच आणि चांगला प्रतिसाद देते..

-- या मृदेतून नाचणी, भात, कडधान्ये, ऊस ही पिके तसेच आंबा, काजूसारखी फळझाडे चांगली वाढतात..महाराष्ट्रातील व भारतातील मृदेचे वितरण..

Tuesday, 19 September 2017

भारतरत्‍न...


-- भारतरत्‍न हा *भारतातील सर्वोच्च नागरी* सन्मान आहे..

-- देशासाठी सर्वोच्च प्रतीचे काम करणाऱ्या भारताची कीर्ती जगभरात वृद्धीगंत करणाऱ्या व्यक्तीस हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरविले जाते..

-- अशा व्यक्तींनी उभी हयात यासाठी घालविलेली असते..
अनेकांना तर हा सन्मान मरणोत्तर दिला गेला आहे..

-- सेवा, कला, साहित्य, विज्ञान व विश्वशांती, मानव विकास, कारखानदारी इत्यादी क्षेत्रांतील लोकांना, सनदी सेवा बजावलेल्या व्यक्तींना व अन्य अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्यांना, हा अमूल्य पुरस्कार देऊन गौरवायचे, असा निर्णय *इ.स. १९५४* मध्ये तत्कालिन भारत सरकारतर्फे घेण्यात आला *२ जानेवारी १९५४* रोजी भारताच्या राष्ट्रपतींनी त्यावर मान्यतेची मोहर उठवली..

-- *१९५५ साली* कायद्यात काही बदल करून *मरणोपरान्त ‘भारतरत्‍न’* देण्याची सोय करण्यात आली..

-- त्यानंतर १२ हून अधिक जणांना मरणोपरान्त भारतरत्‍न दिले गेले आहे..

-- २०१४ मध्ये वरील क्षेत्रांबरोबरच क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्कारात स्थान देण्यात आले..

-- २०१५ सालापर्यंत ४१ जणांना ‘भारतरत्‍न’ हा पुरस्कार लाभलेला आहे..
त्यात तीन नावे परदेशी व्यक्तींची आहेत..

-- या पुरस्काराचे वैशिष्ट्ये व तो देण्यासंबंधीचे नियम भारत सरकारच्या *राजपत्रात मनूद केले* आहेत..

-- भारतरत्न हा शब्द नावाआधी लिहिण्याचा एक किताब म्हणून वापरता येत नाही..

*.. वैशिष्ट्ये..--*

-- हे पदक पिंपळाच्या पानाच्या आकाराचे असेल..
हे पदक ५.८ सें.मी. लांबीचे, ४.७ सें.मी. रूंदीचे आणि ३.१ मि.मी. जाडीचे पिंपळाच्या पानाच्या आकाराचे बनविलेले असते..

-- हे पदक काशाचे बनवले जाईल..
याच्या दर्शनी बाजूवर ०.६२५ इंच व्यासाच्या सूर्याची प्रतिकृती कोरलेली असेल..

-- पदकच्या मागील भागावर भारताचे राष्ट्रीय चिन्ह चार सिंहांची राजमुद्रा व आदर्श घोषवाक्य कोरलेले असते..

-- सूर्य, राजचिन्ह व कडा प्लॅटिनमच्या आणि शब्द चमकदार पितळेचे बनवले जातात..

-- हे पदक पांढऱ्या रंगाच्या रिबीनीमध्ये ओवले जाते.. कोलकत्याला असलेल्या टांकसाळीत हे पदक बनवले जाते..

*..पुरस्काराचे स्वरूप..--*

-- रोख पुरस्कार..-- शून्य..

-- हा पुरस्कार मिळवणाऱ्यांना इतर कुठलीही विशेष पदवी किंवा मानधन वगैरे मिळत नाही..

-- पण त्यांना Indian order of precedence मध्ये ७वे स्थान स्थान मिळते..

-- (Bharat Ratna recipients rank seventh in the Indian order of precedence, but are constitutionally prohibited from using the award name as a title.)

-- *हा पुरस्कार ज्या व्यक्तींना मिळाला आहे, त्यांच्या नावाआधी भारतरत्‍न हा शब्द उपाधीसारखा वापरायची मुभा नाही..*

*..भारतरत्न’ विजेत्याला खालील सुविधा मिळतात..--*

-- ‘व्हीव्हीआयपी’च्या समकक्ष श्रेणी
संसदेच्या बैठका व सत्रांमध्ये सहभागी होण्याची सवलत..

-- भारतीय प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन समारंभात सन्माननीय अतिथी..

-- भारतामध्ये कुठेही जाण्यासाठी प्रथम श्रेणीचे मोफत विमान व रेल्वे प्रवास तिकिट..

-- पंतप्रधानांच्या वेतनाएवढे किंवा त्याच्या ५०% एवढे निवृत्ती
वेतन..

-- आवश्यकेनुसार ‘झेड’ श्रेणीची सुविधा..

-- माजी पंतप्रधान, केंद्र सरकारमधील कॅबिनेट स्तराचे मंत्री, लोकसभा व राज्यसभेतील प्रमुख विरोधी पक्षनेता, भारतीय योजना आयोगाचे डेप्युटी चेअरमन आणि राज्यांचे मुख्यमंत्री यांच्या नंतरच्या सातव्या स्थानाच्या दर्जाचा सन्मान ‘भारतरत्न’ विजेत्या व्यक्तीला दिलेला आहे..

*..भारतरत्न पुरस्कार विजेत्यांची यादी..--*

१.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
(१८८८-१९७५)
-- १९५४
भारताचे माजी राष्ट्रपती व नामांकीत शिक्षणतञ..

२.
चक्रवर्ती राजगोपालचारी
(१८७८-१९७२)
-- १९५४
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व शेवटचे गव्हर्नर जनरल..

३.
डॉ. चंद्रशेखर वेंकट रमण
(१८८८-१९७०)
-- १९५४
प्रसिद्ध भारतीय भौतिकशास्त्रजञ..

४.
डॉ. भगवान दास
(१८६९-१९५८)
-- १९५५
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते..

५.
डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या
(१८६१-१९६२)
-- १९५५
पहिले अभियंता ‘बँक ऑफ म्हैसूर’ ची स्थापना..

६.
जवाहरलाल नेहरू
(१८८९ -१९६४)
-- १९५५
भारताचे पहिले पंतप्रधान व भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेले काँग्रेसचे लोकप्रिय नेते..

७.
गोविंद वल्लभ पंत
(१८८७-१९६१)
-- १९५७
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व उत्तर प्रदेशाचे प्रथम मुख्यमंत्री
व भारताचे दुसरे गृहमंत्री..

८.
डॉ. धोंडो केशव कर्वे
(१८५८-१९६२)
-- १९५८
समाजसुधारक, शिक्षणप्रसारक..

९.
डॉ. बिधान चंद्र रॉय
(१८८२-१९६२)
-- १९६१
पश्चिम बंगालचे पहिले मुख्यमंत्री व वैद्यक..

१०.
पुरूषोत्तम दास टंडन
(१८८२-१९६२)
--१९६१
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व शिक्षणप्रसारक..

११.
डॉ. राजेंद्र प्रसाद
(१८८४-१९६३)
-- १९६२
भारत१२.
डॉ. झाकिर हुसेन
(१८९७-१९६९)
-- १९६३
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे राष्ट्रपती..

१३.
डॉ. पांडुरंग वामन काणे
(१८८०-१९७२)
-- १९६३
शिक्षणप्रसारक..

१४.
लाल बहादूर शास्त्री (मरणोत्तर)
(१९०४-१९६६)
-- १९६६
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे दुसरे पंतप्रधान..

१५.
इंदिरा गांधी
(१९१७-१९८४)
--- १९७१
भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान..

१६.
वराहगिरी वेंकट गिरी
(१८९४-१९८०)
-- १९७५
कामगार युनियन व भारताचे चौथे राष्ट्रपती..

१७.
के. कामराज (मरणोत्तर)
(१९०३-१९७५)
-- १९७६
भारतीय स्वतंत्रता चळवळीत भाग, मद्रास जाज्याचे मुख्यमंत्री..

१८.
मदर तेरेसा
(१९१०-१९९७)
-- १९८०
ख्रिश्चन मिशनरी समाजसुधारक, मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या संस्थापक..

१९.
आचार्य विनोबा भावे (मरणोत्तर)
(१८९५-१९८२)
-- १९८३
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व समाजसुधारक..

२०.
खान अब्दुल गफार खान
(१८९०-१९८८)
-- १९८७
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील पहिले बिगर भारतीय नेते..

२१.
एम. जी. रामचंद्रन (मरणोत्तर)
(१९१७-१९८७)
-- १९८८
चित्रपट अभिनेते व तमिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री..

२२.
भीमराव रामजी आंबेडकर (मरणोत्तर)
(१८९१-१९५६)
-- १९९०
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, अर्थतज्ञ, राजकीय नेते..

२३.
नेल्सन मंडेला
(जन्म १९१८-२०१३)
-- १९९०
वर्णभेद विरोधी चळवळीचे
प्रणेते..

२४.
राजीव गांधी (मरणोत्तर)
(१९४४-१९९१)
-- १९९१
भारताचे सातवे पंतप्रधान..

२५.
सरदार वल्लभभाई पटेल ( मरणोत्तर)
(१८७५-१९५०)
-- १९९१
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पहिले गृहमंत्री..

२६.
मोरारजी देसाई
(१८९६-१९९५)
-- १९९१
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पाचवे पंतप्रधान..

२७.
मौलाना अबुल कलाम आझाद (मरणोत्तर)
(१८८८-१९५८)
-- १९९२
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पहिले शिक्षणमंत्री..

२८.
जे. आर. डी. टाटा
(१९०४-१९९३)
-- १९९२
उद्योजक..

२९.
सत्यजित रे
(१९२२-१९९२)
-- १९९२
बंगाली चित्रपट निर्माते..

३०.
ए. पी. जे. अब्दुल कलाम
(जन्म १९३१)
-- १९९७
भारताचे ११वे राष्ट्रपती..

३१.
गुलझारीलाल नंदा
(१८९८-१९९८)
-- १९९७
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पंतप्रधान..

३२.
अरुणा आसफ अली‎ (मरणोत्तर)
(१९०६-१९९५)
-- १९९७
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेत्या..

३३.
एम.एस. सुब्बुलक्ष्मी
(१९१६-२००४)
-- १९९८
कर्नाटक शैलीतील गायिका..

३४.
चिदंबरम्‌ सुब्रमण्यम्
(१९१०-२०००)
-- १९९८
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे माजी कृषीमंत्री..

३५.
जयप्रकाश नारायण (मरणोत्तर)
(१९०२-१९७९)
-- १९९९
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते..

३६.
रवी शंकर
(१९२०-२०१२)
-- १९९९
प्रसिद्ध सितारवादक..

३७.
अमर्त्य सेन
(जन्म १९३३)
-- १९९९
प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ..

३८.
गोपीनाथ बोरदोलोई‎ (मरणोत्तर)
(१८९०-१९५०)
-- १९९९
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व आसामचे मुख्यमंत्री..

३९.
लता मंगेशकर
(जन्म १९२९)
-- २००१
पार्श्वगायिका..

४०.
बिसमिल्ला खान
(१९१६-२००६)
-- २००१
शहनाईवादक..

४१.
भीमसेन जोशी
(१९२२-२०११)
-- २००८
हिंदुस्थानी शास्त्रीय गायक..

४२.
सी.एन.आर.राव
(जन्म-१९३४)
-- २०१४
शास्त्रञ..

४३.
सचिन तेंडूलकर
जन्म-इ.स.१९७३
-- २०१३
क्रिकेटपटू..

४४.
मदनमोहन मालवीय (मरणोत्तर)
(१८६१-१९४६)
-- २०१४
स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाचे योगदान देणारे, बनारस हिंदू विश्वविद्यापीठ व हिंदू महासभेचे संस्थापक, प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ..

४५.
अटलबिहारी वाजपेयी
(जन्म १९२४)
-- २०१४
कविमनाचे, अजातशत्रू, मुत्सद्दी, वक्ता
माजी पंतप्रधान..

Monday, 18 September 2017

मूलभूत हक्क

..विषय -- राज्यघटना..
✍ ..मूलभूत हक्क..:--
-- मुलभूत हक्क ही भारतीय संविधानातील मुलभूत अधिकारांची सनद आहे..
-- ही सनद भारतीयांना भारतीय नागरिक म्हणून त्यांचे आयुष्य शांतता व समानतेने व्यतीत करण्याचे नागरी अधिकार प्रदान करते..
-- या मुलभूत हक्कांमध्ये कायद्यापुढे समानता, उच्चार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य, शांततेने कोठेही उपस्थित राहण्याचे व सभा स्वातंत्र्य, आणि नागरी हक्कांच्या संरक्षणासाठी संवैधानिक प्रतिकारासाठी habeas corpus यासारख्या याचिकांचा अधिकार असे उदारमतवादी लोकतांत्रिक देशांमध्ये असलेल्या अधिकारांचा समावेश होतो..
-- या अधिकारांचा भंग केल्यास न्यायालयाच्या विवेकानुसार भारतीय दंडविधान संहितेखाली शिक्षा होऊ शकते..
-- मुलभूत मानवी अधिकाराखाली भारतीय नागरिकाच्या व्यक्तिमत्वाच्या योग्य आणि मैत्रीपूर्ण प्रगतीसाठीचे हक्क अशी भारताच्या मुलभूत हक्कांची व्याख्या केली जाऊ शकते..
-- हे हक्क संपूर्ण जगात वंश, जन्माचे ठिकाण, धर्म, जात, संप्रदाय, रंग, लिंग यात भेदभावाशिवाय सर्व नागरिकांना लागू आहेत..
-- काही बंधने वगळता हे अधिकार न्यायालयाद्वारे सर्व ठिकाणी लागू आहेत..
-- इंग्लंडचे हक्कांविषयीचे विधेयक, अमेरिकन संयुक्त राज्यांचे हक्कांविषयीचे विधेयक, आणि फ्रान्सचे माणसाच्या अधिकाराच्या घोषणा यांमध्ये भारताच्या मुलभूत अधिकारांचे मूळ आहे..
 *..भारतीय संविधानाने प्रदान केलेले सात मुलभूत अधिकार खालील प्रमाणे आहेत..:--*
-- समानतेचा हक्क..
-- अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क..
-- शोषणापासून संरक्षणाचा हक्क..
-- धार्मिक निवड व स्वातंत्र्याचा हक्क..
-- सांस्कृतिक व शैक्षणीक हक्क..
-- संवैधानिक प्रतिकाराचा हक्क..
-- मालमत्तेचा हक्क.. (हा हक्क ४४व्या संवैधानिक दुरुस्तीनुसार मुलभूत अधिकारातून वगळून कायदेशीर अधिकार म्हणून नमूद करण्यात आला आहे.)..
-- खासगी व समुदायाच्या भल्याकरता असणाऱ्या स्वातंत्र्याला हक्क असे संबोधले जाते..
-- भारतीय घटनेने प्रदान केलेले हक्क हे *"भूभागाचे मुलभूत कायदे"* यामध्ये अंतर्भूत केले असल्याकारणाने ते मुलभूत असून न्यायालयाद्वारे प्रवर्तित केले गेले आहेत..
-- तरीही, हे हक्क अपरिवर्तनशील किंवा घटनादुरुस्तीपासून मुक्त नाहीत..

इतिहासातील महत्त्वपूर्ण वृत्तपत्रे

📚 दी इंडियन स्पेक्टॅटर :-
      बेहरामजी मलबारी..

📚 इंडियन :-
     फिल्ड किशोरीचंद मित्र..

📚 अबला बांधव :-
      द्वारकानाथ गांगुली..

📚 फ्री हिन्दुस्थान :-
     तारकानाथ दास..

📚 परिदर्शक :-
      बिपिनचंद्र पाल..

📚 जन्मभूी :-
   पट्टाभि सितारामय्या..

📚 मुंबई समाचार :-
     फरदुनजी मर्झबान..

📚 तलवार :-
    विरेंद्रनाथ चटोपाध्याय..

📚 लीडर पं. मदन :-
      मोहन मालवीय..

📚 पख्तून :-
      खान अब्दुल गफारखान..

📚 इंडियन मजलीस :-
      अरविद घोष (केम्ब्रिज)..