Monday 25 September 2017

समाजसुधधारक -- धोंडो केशव कर्वे..


समाजसुधधारक -- धोंडो केशव कर्वे..

👉 टोपणनाव..-
अण्णा..

👉 जन्म..-
एप्रिल १८, इ.स. १८५८
मुरूड..

👉 मृत्यू..-
नोव्हेंबर ९, इ.स. १९६२..

👉प्रमुख चळवळ..-
स्त्री शिक्षण आणि सामाजिक सुधारणा..

👉 पुरस्कार..-
भारतरत्‍न..

👉 वडील..-
केशव कर्वे..

👉 पत्नी..-
राधाबाई धोंडो कर्वे , आनंदीबाई धोंडो कर्वे..


👉 बालपण आणि तारुण्य..--

-- रत्‍नागिरी जिल्ह्यातील मुरूड हे अण्णांचे गाव..
शिक्षणासाठी त्यांना खूप पायपीट करावी लागली..

-- इ.स. १८८१ मध्ये मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला..
त्या कॉलेजातून त्यांनी गणिताची पदवी संपादन केली..

-- वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांचा राधाबाईंशी विवाह झाला. राधाबाई त्या वेळी ८ वर्षांच्या होत्या..

-- वयाच्या २७ व्या वर्षी, इ.स. १८९१ साली बाळंतपणात राधाबाईंचा मृत्यू झाला..

-- प्रौढ वयात विधुर झालेल्या पुरुषानेही अल्पवयीन कुमारिकेशीच लग्न करण्याची त्या काळात प्रथा होती..

-- लहान वयात मुलींची लग्ने होत, पण दुर्दैवाने पती लवकर मरण पावला तर त्या मुलीला मात्र त्याची विधवा म्हणून उर्वरित आयुष्य घालवावे लागे..

-- ही समाज रीत नाकारणाऱ्या अण्णांनी पंडिता रमाबाईंच्या शारदा सदन संस्थेत शिकणाऱ्या गोदूबाई या विधवा मुलीशी पुनर्विवाह केला..

-- ही गोष्ट काळाला मानवणारी नव्हती. अण्णा पत्‍नीसह मुरूडला गेल्यानंतर अण्णांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याचा ठराव संमत झाला..

-- याच गोदूबाई पुढे आनंदी कर्वे किंवा बाया कर्वे म्हणून ख्यातनाम झाल्या..

-- अण्णासाहेबांच्या कार्यात बाया कर्वे यांचा सक्रिय वाटा होता..

-- इ.स. १८९१ साली अण्णासाहेबांनी फर्ग्युसन कॉलेजात गणित शिकवायला सुरुवात केली..

-- पुढे इ.स. १९१४पर्यंत त्यांनी ही नोकरी केली..
अण्णा गणिती होते..

-- लोकमान्य टिळक हे फर्ग्युसन महाविद्यालयात गणिताचे अध्यापन करीत होते..
पण राजकारणाच्या रणधुमाळीत ते उतरल्यानंतर त्यांच्या रिकाम्या जागी गणित विभागाचे प्रमुख असणारे गोपाळ कृष्ण गोखले यांनी अण्णांना बोलावून घेतले..

-- इ.स. १८९१ ते इ.स. १९१४ या प्रदीर्घ कालखंडात अण्णांनी गणित हा विषय शिकवला..


👉 ..कार्य..--

-- इ.स. १९०० मध्ये अनाथ बालिकाश्रमाचे स्थलांतर हिंगण्यास करण्यात आले..

-- याच परिसरात अण्णांनी विधवांसाठी एक हक्काची सावली निर्माण केली..
विधवांचे हे वसतिगृह ही एक सामाजिक प्रयोगशाळा होती..

-- पंडिता रमाबाई आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या जीवनकार्यांमुळे अण्णासाहेब खूपच प्रभावित झाले होते..
थोर तत्त्वज्ञ हर्बर्ट स्पेन्सर यांच्या विचारांचाही त्यांच्यावर पगडा होता..

-- इ.स. १८९६मध्ये अण्णासाहेबांनी पुण्याजवळील हिंगणे (आता कर्वेनगर) या गावी विधवा महिलांसाठी आश्रम स्थापन केला..

-- या आश्रमात याच ठिकाणी इ.स. १९०७ साली महिला विद्यालयाची स्थापना त्यांनी केली..

-- अण्णासाहेबांची २० वर्षांची विधवा मेहुणी - पार्वतीबाई आठवले - या विद्यालयाच्या पहिल्या विद्यार्थिनी होत..

-- आश्रम आणि शाळा या दोन्हींसाठी लागणारे कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी त्यांनी '`निष्काम कर्म मठा'ची स्थापना इ.स. १९१० साली
केली..

-- पुढे या तिन्ही संस्थांचे कार्य उत्तरोत्तर वाढत गेल्याने त्याचे एकत्रीकरण करून `'हिंगणे स्त्री शिक्षण संस्था' आणि त्यानंतर `महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था' असे त्याचे नामकरण करण्यात आले..

-- १९९६साली त्यांच्या कार्यारंभाला १०० वर्षे पूर्ण झाली म्हणून महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था दरवर्षी शैक्षणिक आणि सामाजिक कार्य करणाऱ्या स्त्रीला बाया कर्वे पुरस्कार देते..

-- जपानच्या महिला विद्यापीठाला भेट दिल्यानंतर अण्णासाहेब अत्यंत प्रभावित झाले..

-- त्यांनी पुण्यात भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना झाली..

-- पुढे विठ्ठलदास ठाकरसी यांनी १५ लाखांचे अनुदान दिल्याने या विद्यापीठाचे `श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ' (एसएनडीटी) असे नामकरण करण्यात आले..

-- अण्णासाहेबांनी अनेक परदेश दौरे केले..

-- कर्वे यांची चारही मुले रघुनाथ, शंकर, दिनकर आणि भास्कर यांनीही पुढे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये भरीव कार्य केले..


👉 ..आत्मचरित्र..--

-- मराठी (आत्मवृत्त, इ.स. १९२८) आणि इंग्रजी (लुकिंग बॅक, इ.स. १९३६)..


👉 ..श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी या विद्यापीठची स्थापना..--

-- शिक्षण संस्थांभोवती कार्यकर्त्यांची तटबंदी असावी म्हणून इ.स. १९०८ मध्ये ‘निष्काम कर्ममठ‘ या संस्कारपीठाची स्थापना केली..

-- इ.स. १९१५ मध्ये भरलेल्या अखिल भारतीय सामाजिक परिषदेचे अध्यक्षस्थान अण्णांनी भूषविले..

-- अध्यक्षीय भाषणात त्यांनी ‘महिला विद्यापीठ‘ या कल्पनेचा पुनरुच्चार केला..


-- ३ जून, इ.स. १९१६ रोजी महिला विद्यापीठाची स्थापना झाली..

-- इंग्लंड, जर्मनी, जपान, अमेरिका या देशांना भेटी देऊन अण्णांनी आपल्या संस्थांची आणि संकल्पांची माहिती जगाला करून दिली..

-- बर्लिनमध्ये असताना सापेक्षतावादाचे प्रणेते प्रा. अल्बर्ट आइनस्टाइन यांची त्यांनी भेट घेतली..
त्यांनी बर्लिनमधली गृहविज्ञानशाळा पाहिली..

-- टोकियोतील महिला विद्यापीठ पाहिले..
अनेक राष्ट्रांत स्त्रियांनी चालविलेल्या संस्था पाहिल्या..

-- त्या दर्शनाने सुचलेल्या अनेक नव्या योजना त्यांनी पूर्णत्वास नेल्या..
अनेक भारतीय विद्यापीठांनी त्यांना डी.लिट. देऊन सन्मानित केले..

-- `पद्मविभूषण' हा किताब त्यांना इ.स. १९५५ साली प्रदान करण्यात आला, तर लगेच इ.स. १९५८ साली त्यांना भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान `भारतरत्‍न'ने सन्मानित करण्यात आले..

-- एकशेचार वर्षांचे दीर्घायुष्य देऊन निसर्गानेही त्यांना सन्मानित केले..
पुण्यातच ९ नोव्हेंबर, इ.स. १९६२ ला त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले..समाजसुधधारक -- धोंडो केशव कर्वे..


1 comment: