Thursday 21 September 2017

हडप्पा संस्कृती...


-- हडप्पा संस्कृती ही जगातील प्राचीन ताम्र युगीन संस्कृतींपैकी एक आहे..

-- हिचा कालखंड लिबी यांच्या कार्बन १४ या शास्त्रीय पद्धतीनुसार इ.स.पूर्व २७०० ते इ.स.पूर्व १५०० असा मानला जातो..

-- इ.स. १९२० च्या सुमारास लाहोर-मुलतान रेल्वे मार्गाचे काम सुरू असताना काही प्राचीन विटांचे अवशेष सापडले..

-- यामुळे पुरातत्त्व खात्याने याचा शोध घेण्यासाठी --सर जॉन मार्शल-- यांच्या नेतृत्वाखाली उत्खनन सुरू केले आणि एक प्राचीन संस्कृती प्रकाशात आली..

-- या संस्कृतीचे प्रथम अवशेष हडप्पा येथे सापडले म्हणून नव्यानेच शोधलेल्या या संस्कृतीला हडप्पा संस्कृती असे म्हणतात..

-- ही संस्कृती प्रामुख्याने सिंधू नदीच्या प्रदेशात केंद्रित असल्याने तिला 'सिंधू संस्कृती' असेही म्हणतात..

-- उत्खननात हडप्पा व मोहनजोदडो या दोन्ही नगरांच्या ठिकाणी एकाच प्रकारच्या मुद्रा आढळून आल्या..

-- अशाच प्रकारच्या संस्कृतीचे अवशेष पश्चिम भारतात कालीबंगन, धोळावीरा, सुरकोटडा, लोथल, दायमाबाद इत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणात सापडले..

👉🏻 ..नगररचना..--

-- हडप्पा संस्कृतीची नगररचना व स्थापत्य अत्यंत प्रगत होते..

-- घरे, तटबंदी, सांडपाण्याची व्यवस्था, स्नानगृहे, धान्याची कोठारे, जहाजाची गोदी इत्यादी घटक पाहता हडप्पाकालीन संस्कृतीच्या प्रगत स्थापत्याची कल्पना येते..

-- प्राचीन इजिप्त व मेसोपोटेमिया या समकालीन संस्कृतींच्या अगदी विरुद्ध हडप्पामध्ये कोणतीही भव्य मंदिरे किंवा तत्सम बांधकामे नव्हती..

-- हडप्पाकालीन नगराची विभागणी प्रशासकीय इमारती व लोकवस्ती अशा दोन घटकांत करण्यात आलेली होती..

-- शहराच्या लोकवस्तीचा भाग बुद्धिबळाच्या पटाप्रमाणे किंवा जाळीप्रमाणे विविध प्रभागांमध्ये विभागला होता..

-- नगर बांधणीसाठीच्या विटा ४:२:१(लांबी:रुंदी:उंची) या प्रमाणातच असत..

👉🏻 ..घरे..--

-- हडप्पा संस्कृतीत प्रत्येक प्रभागात २० ते ३० घरे असत..
ती पक्क्या विटांची असून प्रशस्त होती..

-- प्रत्येक घरामध्ये स्नानगृह असे..
काही घरांच्या परसात विहिरी आढळल्या आहेत..

-- घरांच्या मध्यभागी, जसे आजही वाड्यांच्या व इतर भारतातील पारंपरिक घरांमध्ये असते, तसे.अंगण असे..
घरे एक किंवा दोन मजली
असत..

-- फारच क्वचित याहून अधिक मजले असत...

-- हडप्पाकालीन नगरांना संरक्षक तटबंदी असे..
तटबंदी रुंद असून तिचे बांधकाम पक्क्या विटांचे असे..
तटबंदीला बुरूज होते..
यावरून हडप्पा संस्कृतीने नगराच्या संरक्षणाकडे लक्ष दिल्याचे दिसते..

👉🏻 ..रस्ते..--

-- शहराच्या प्रभागाकडून जाणारे रस्ते मुख्य रस्त्यांना जोडलेले असत..

-- रस्ते पुरेसे रुंद असून ते एकमेकांना काटकोनांत छेदणारे होते..

-- रस्त्यांच्या कडेला सापडलेल्या लाकडांच्या अवशेषांवरून रस्त्यांवर दिवाबत्तीची सोय असावी असे दिसते..

👉🏻 ..स्नानगृह व सांडपाण्याची व्यवस्था..--

-- हडप्पा संस्कृतीत सार्वजनिक स्नानगृहे होती..
मोहनजोदडो येथे एका भव्य स्नानगृहाचे अवशेष सापडले..

-- या स्नानगृहाची लांबी १२ मीटर, रुंदी ७ मीटर आणि खोली २.५ मीटर आहे..

-- याच्या बाहेरच्या भिंती ७ ते ८ फूट रुंदीच्या असून कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र खोल्यांची व्यवस्था होती..

-- स्नानगृहाचे वापरलेले पाणी बाहेर सोडण्याची व शुद्ध पाणी आत आणण्याची व्यवस्था केलेली होती..

-- लोथल येथील उत्खननामध्ये एका प्रचंड गोदीचे अवशेष सापडले..

-- या गोदीची लांबी २७० मीटर तर रुंदी ३७ मीटर आहे..
या गोदीवरून जहाजबांधणी, व्यापार, व्यापारीमार्ग यांची माहिती या संस्कृतीमधील लोकांना होती असे दिसून येते..

-- येथे सापडलेल्या एका मुद्रेवर जहाजाचे चित्र कोरले आहे.. तसेच लोथल येथे पक्क्या विटांनी बांधलेली धान्य कोठारे सापडली आहेत..

-- हडप्पा संस्कृतीत सांडपाणी व पावसाचे पाणी गावाबाहेर वाहून नेण्यासाठी एक मीटर खोल भुयारी गटारांची व्यवस्था होती..

-- ही गटारे दगड व पक्क्या विटांनी बांधलेली होती..

👉🏻 ..समाजरचना..

-- हडप्पा संस्कृतीत कुटुंबसंस्था महत्त्वाची होती..

-- नगररचनेच्या अवशेषांवरून समाजात राज्यकर्त्यांचा वर्ग, व्यापारी वर्ग व सर्वसामान्यांचा वर्ग असल्याचे दिसते..

-- नद्यांच्या काठी सुपीक प्रदेशात ही संस्कृती विकसित झालेली असल्याने शेती हा समाज जीवनाचा कणा होता..

👉🏻 ..इतर माहीती..

-- हडप्पाकालीन संस्कृतीच्या उत्खननात एक शृंगारपेटी मिळाली..
यामध्ये ब्राॅन्झचे आरसे, हस्तिदंती कंगवे, केसासाठी आकडे, पिना, ओठ व भुवया रंगवण्यासाठी लागणाऱ्या विविध रंगाच्या कांड्या मिळाल्या..

-- हडप्पाकालीन लोकांना सौंदर्यप्रसाधनांप्रमाणेच अलंकाराची आवड होती.. उत्खननामध्ये मण्यांचे व सोन्याचे हार, बांगड्या, अंगठ्या, वाक्या, कमरपट्टा इत्यादी अलंकार मिळाले तसेच नर्तकीचा ब्राँझचा पुतळा मिळाला..
तिच्याही हातात बांगड्या व गळ्यात हार आहे..

-- हडप्पा संस्कृतीधील मातीच्या भांड्यांवर मिळालेले कापडाचे ठसे, मृण्मयमूर्तीवर दाखवलेले वस्त्र, उत्खननात मिळालेल्या विविध आकारांच्या सुया यावरून लोकांना वेशभूषेचे चांगले ज्ञान असल्याचे दिसते..

-- तसेच तत्कालीन मूर्तींवरून केशभूषेची माहिती मिळते..

-- पुरुष दाढी कोरत, मधोमध भांग पाडत तर स्त्रिया विविध प्रकारची केशरचना करत असत..

-- हडप्पाकालीन लोकांची सोंगट्या, फासे ही करमणुकीची साधने होती..

-- नृत्य, गायन, शिकार व प्राण्यांच्या झुंजी इत्यादींमधून करमणूक केली जाई..

-- तेथील लोकांचा प्रमुख आहार गहू होता. त्याचबरोबर जव, तीळ, वाटाणा, यासारखी दुय्यम धान्ये सुद्धा पिकवीत असत..

-- खजुराचा उपयोगही ते अन्न म्हणून करीत असत..
येथील लोक पशू बाळगीत त्यामुळे दूधदुभत्यांचा पुरवठा त्यांच्याकडे होत असावा..
तसेच मांसाहारही केला जात असे..

-- येथील लोक अनेक प्रकारच्या वजनांचा उपयोग करीत..
त्यांत दोराने उचलण्याच्या वजनापासून ते सोनाराने उपयोगात आणलेल्या लहानशा वजनापर्यंतचा समावेश होता..

-- वजन माप हे 16 च्या पटितील होते..

-- 0.8565 हे वजन कमीत कमी होते व 274.938 हे जास्तीत जास्त होते..

👉🏻 ..धर्मकल्पना..--

-- हडप्पा संस्कृतीत उत्खननात सापडलेल्या विविध मुद्रा, मूर्ती, अग्निकुंड, मृतांना पुरण्याची पद्धत यावरून त्यांच्या धार्मिक कल्पनेची माहिती मिळते..

-- लोकांची प्रामुख्याने शेतीवरती उपजीविका असल्याने लोक भूमातेस मातृदेवता मानत..

-- त्यांच्या धार्मिक जीवनात निसर्गशक्तीस महत्त्वाचे स्थान होते. सूर्य, जल, अग्नी, वृक्ष यांची ते पूजा करत..

-- कालिबंगन येथे सापडलेल्या अग्निकुंडावरून ते अग्निपूजा करत असल्याचे दिसते..

-- निसर्गदेवतेप्रमाणेच पशुपती, नाग, वृषभ म्हणजे बैल यांचीही ते पूजा करत होते..
लोक मूर्तिपूजक होते, मात्र हडप्पा संस्कृतीत मंदिरे आढळली नाहीत..

-- तेथील लोक मृतदेहाचे विधिपूर्वक दफन करत..
दफन करते वेळी त्यांचे सोबत अलंकार व भांडी ठेवली जात..

-- अंतविधी संस्कार:पूर्णसमाधी,आंशिकसमाधी,दाहकर्म..

👉🏻 ..या संस्कृतीच्या विनाशाची अनेक कारणे सांगितली जातात त्यातील काही प्रमुख कारणे..:--

१) नैसर्गिक संकटामुळे..-

- नदीला आलेला पूर/अतिवृष्टी
भूकंप..
- हवामानात होणारा बदल..
- जमिनीची सुपिकता घटली..
- थर वाळवंट विस्तारल्याने सरस्वती नदी लुप्त होणे..

२) बाह्य आक्रमणे..-
आर्यांचे आक्रमण
युयुत्सु लोकांचे आक्रमण..

३) तंत्रज्ञानावरील मक्तेदारी संपली..

४) राजकीय विघटनामुळे नाश..

५) आर्थिक विघटनामुळे नाश..

६) कायदा व सुव्यवस्था नसावी...

👉🏻 पुणे डेक्कन कॉलेज, खरगपूर येथील इंडियन इन्स्टिटय़ुट ऑफ टेक्नॉलॉजी व इतर संस्थांनी २०१६ साली केलेल्या एका नव्या संशोधनातून प्राचीन सिंधू संस्कृती ही ५५०० वर्षांपूर्वीची नसून ८००० वर्षांपूर्वीची असल्याचे निष्कर्ष काढले गेले आहेत..

👉🏻 ‘नेचर’ या विज्ञानसंशोधनविषयक नियतकालिकाच्या एप्रिल २०१६ च्या अंकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे..

👉🏻 २०१४ मध्ये तामिळनाडुतील शिवगंगा जिल्‍ह्यातील पल्‍लीसंथाई थिडल या गावात जमिनीखाली गाडले गेलेले हडप्‍पा संस्‍कृतीसारखे अवशेष आढळून आले आहेत..

👉🏻 बंगळूरू येथील पुरात्‍तव विभागाच्‍या संशोधकांनी याचा शोध लावला आहे..

No comments:

Post a Comment