Wednesday 27 December 2017

योजना

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना


नागरिकांचा जीवनस्तर उंचावण्याबरोबरच राज्याचा आर्थिक कणा असलेला बळीराजा अधिक सक्षम होण्यासाठी राज्यशासन विविध योजना राबवत असते.

राज्य शासनाच्या अशा योजनांपैकीच शेतकऱ्यांना स्वावलंबी घडविण्यासाठी अस्तित्वात आलेली एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना होय.

पार्श्वभुमी 


  • राज्यातील अनुसूचित जाती तसेच नवबौद्ध शेतकऱ्यांचा विकास होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबविण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. 
  • राज्याच्या (२०१७ - १८) अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा करण्यात आली होती.


डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनांनुसार पुढील घटकांचा लाभ देण्यात येणार आहे.

  • नवीन विहीर प्रती लाभार्थी देय उच्चतम अनुदान मर्यादा रु. ०२ लाख ५० हजार, 
  • जुनी विहीर दुरुस्ती उच्चतम अनुदान मर्यादा रु. ५० हजार, 
  • शेततळ्याचे प्लॅस्टीक अस्तरीकरण उच्चतम अनुदान मर्यादा रु. ०१ लाख, 
  • वीज जोडणी आकार उच्चतम अनुदान मर्यादा रु. १० हजार, 
  • पंपसंच उच्चतम अनुदान मर्यादा रु. २५ हजार, 
  • इनवेल बोअरिंग उच्चतम अनुदान मर्यादा रु. २० हजार, 
  • सूक्ष्म सिंचन संच 

अ.
ठिबक संच उच्चतम अनुदान मर्यादा रु. ५० हजार
ब.
तुषार संच उच्चतम अनुदान मर्यादा रु. २५ हजार.



  • या योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचनासाठी देण्यात येणारे अनुदान, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानास पूरक अनुदान देण्यासही मान्यता देण्यात आली आहे. 
  • सूक्ष्म सिंचन या घटकाची अंमलबजावणी योग्य रितीने व्हावी, यासाठी अनुदानाचे सूत्र व कार्यप्रणाली ठरविण्यासाठी मंत्रिमंडळाची उप समिती स्थापन करण्यात येत असून उपसमितीच्या निर्णयाप्रमाणे अनुदानाची रक्कम निश्चित करण्यात आलेली आहे.

अधिक माहितीसाठी :-

Tuesday 19 December 2017

कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार


पुरस्काराचे स्वरूप :- 

एक लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र.

  • यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनाच्या वतीने कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार नावाचा पुरस्कार गैरमराठी भाषेत लिहिणाऱ्या साहित्यिकांना देण्यात येतो.


कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्काराचे मानकरी



  • २०१० :- कन्नड भाषेतील कवी जयंत कैकिणी.
  • २०११ :- हिंदी भाषेतील लेखक चंद्रकांत देवताले.
  • २०१२ :- मल्याळी साहित्यिक डॉ. के. सच्चिदानंदन.
  • २०१३ :- गुजराती लेखक सीतांशू यशश्चंद्र.
  • २०१४ :- पंजाबी साहित्यिक डॉ. सुरजित पातर.
  • २०१५ :- इंग्रजीतून लेखन करणारे नागा साहित्यिक तेमसुला आओ.
  • इ.स. २०१६ :- छिंदवाड्याचे हिंदी लेखक डॉ. विष्णू खरे.

अधिक माहितीसाठी :-

१९ डिसेंबर गोवा मुक्ति दिन

गोवा मुक्तिसंग्राम


१९ डिसेंबर १९६१ रोजी भारतीय सेनेने गोवा राज्याला पोर्तुगीजांच्या तावडीतून सोडवण्यासाठीचे आंदोलन केले गेले त्यास गोवा मुक्तिसंग्राम असे संबोधतात.


  • दादरा व नगर हवेली हा पोर्तुगीज हिंदुस्थानातील प्रदेश त्यापूर्वीच मुक्त करण्यात आला होता. गोव्याच्या मुक्तीबरोबर पोर्तुगीजांचे हिंदुस्थानातील सुमारे ४५० वर्षांचे राज्य समाप्त झाले.


  • १९६१च्या युद्धानंतर भारतभूमीवरील उरलेसुरले पोर्तुगीज अधिपत्य समाप्त झाले, तसेच गोवा, दमण व दीव हा प्रदेश संपूर्णपणे मुक्त झाला. 


  • पुढच्याच वर्षी गोवा भारतीय संघराज्यात सामील झाले. सुरुवातीला लष्करी प्रशासकाकडे कारभार होता. 
  • नंतर निवडणुका होऊन २0 डिसेंबर १९६३ रोजी लोकनियुक्त मंत्रिमंडळ अस्तित्वात आले. 
  • २२ जानेवारी १९६५ रोजी गोवा विधिमंडळाने हे राज्य महाराष्ट्रात विलीन करावे, असा ठराव केला होता; परंतु १६ जानेवारी १९६७ रोजी यासंदर्भात घेतलेल्या सार्वमतानुसार गोवा केंद्रशासित राज्य असावे, असे ठरले. 
  • गोव्यात निवडणूक होऊन दयानंद बांदोडकर यांच्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची सत्ता आली. 

    बांदोडकर यांच्या मृत्यूनंतर १९७३ मध्ये शशिकला काकोडकर त्याच पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री झाल्या.

  • या अर्थाने, १९६१चे युद्ध हा गोवा मुक्ती आंदोलनाचा (किंवा खरे तर गोवा मुक्ती प्रक्रियेचा) शेवटचा व अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा होता.
  • हे मुक्तियुद्ध म्हणजे गोवा मुक्ती आंदोलनाचा फक्त एक लहानसा (परंतु निर्णायक) भाग होता. 
  • या युद्धाव्यतिरिक्त गोवा मुक्ती आंदोलनाचा खूप मोठा इतिहास आहे, ज्यामध्ये स्थानिक गोवेकर स्वातंत्र्यसैनिकांचा खूप मोठा वाटा आहे.
  • गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी डॉ. टी. बी. कुन्हा यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांना गोव्याच्या ‘राष्ट्रवादी चळवळीचे जनक’ म्हटले जाते. 
  • डॉ. कुन्हा पॅरिसहून शिक्षण घेऊन परतल्यानंतर त्यांनी गोव्याच्या स्वातंत्र्यलढय़ात सहभाग घेतला. 
  • सन १९२८ मध्ये गोवा कॉँग्रेस समितीची स्थापना केली. त्यांना पोर्तुगीजांनी अनेकदा अटक करून कारागृहात डांबले. डॉ. कुन्हा यांनी काही काळ ‘फ्री गोवा’ हे वृत्तपत्रही चालवले. 
  • ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ. राम मनोहर लोहिया यांनी गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी प्रदीर्घ काळ लढा दिला. १८ जून १९४६ रोजी गोव्यातील मडगाव येथे त्यांनी मोठी सार्वजनिक सभा घेऊन जनक्रांतीची ज्योत पेटविली.

गोवा मुक्तीसाठी खरी सुरुवात :-


  • गोवा मुक्तीसाठी १९५0 पासून संघर्ष जोर धरू लागला. 
  • १९५४ मध्ये आंदोलकांनी गोव्याच्या स्वातंत्र्यसैनिकांच्या साथीने दादरा-नगरहवेली मुक्त केले. 
  • १५ ऑगस्ट ११५५ रोजी गोव्याला मुक्त करण्यासाठी तीन हजार सत्याग्रहींनी आंदोलन सुरू केले. 
  • या निशस्त्र सत्याग्रहींवर पोर्तुगालच्या सैन्याने अमानुष गोळीबार केला. त्यात तीन सत्याग्रही मृत्युमुखी पडले. 
  • या घटनेने संपूर्ण देशभरातील वातावरण तापले. देशातील वाढत्या दबावामुळे भारताने पोर्तुगालशी राजकीय संबंध पूर्णत: तोडले; मात्र या कालावधीत पाकिस्तान पोर्तुगीजांच्या मदतीला धावला. 
  • त्यामुळे भारताच्या बहिष्काराचा पोर्तुगालवर फारसा परिणाम होऊ शकला नाही. 
  • १९५६-५७ मध्ये जनमत चाचणी घेण्याचा पर्याय पुढे आला; मात्र तो पोर्तुगालने धुडकावून लावला. पुढील पाच वर्षे आंदोलने होत राहिली; परंतु पोर्तुगीजांनी गोव्यावरील ताबा सोडला नाही. 
  • भारत कधी ना कधी गोव्याच्या मुक्तीसाठी लष्करी कारवाई करीलच, ही बाब पोर्तुगालचे तत्कालीन पंतप्रधान अँँटोनियो द ओलिवेरा यांच्या लक्षात आली होती. 
  • त्यामुळे त्यांनी सावध होत ब्राझील, इंग्लंड, अमेरिका व मॅक्सिको या देशांना मध्यस्थी करण्याची विनंती केली. 
  • त्यातून काही निष्पन्न होत नसल्याचे पाहून पोतरुगाल संयुक्त राष्ट्रसंघाकडे गेला. तेथेही त्यांची डाळ शिजली नाही. 
  • आझाद गोमंतक दल, गोवा लीग, गोवा मुक्ती फौज, विमोचन समिती अशा अनेक संघटनांनी गोव्याचे स्वातंत्र्य जवळ आणले. अखेर १८ डिसेंबर १९६१ रोजी भारताने लष्करी कारवाई केली.
  • १९ डिसेंबर १९६१ रोजी भारतीय सेनेने गोवा राज्याला पोर्तुगीजांच्या तावडीतून सोडविले.

अधिक माहितीसाठी :-

Monday 18 December 2017

अ‍ॅन्झूस करार



  • अॅरन्झूस करार म्हणजे १ सप्टेंबर १९५१ ला .ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व अमेरिकेची संयुक्त संस्थाने ह्या पॅसिफिक महासागराशी संबंधित तीन देशांनी आपल्या रक्षणासाठी केलेला लष्करी करार म्हणजेच अ‍ॅन्झूस करार होय.
यांस 'पॅसिफिकमधील त्रिपक्षीय संरक्षण तह' असेही म्हणण्यात येते.
  • ह्या देशांच्या इंग्रजी नावांच्या आद्याक्षरांवरून हे नाव अ‍ॅन्झूस (ANZUS) प्रचलित झाले.
  • दुसऱ्या महायुद्धानंतर जपानशी झालेल्या तहावर ह्या तीन राष्ट्रांनी स्वाक्षऱ्या केल्या; त्याच सुमारास हा लष्करी करार केलेला आहे.
  • जपानच्या पुनरुत्थानामुळे ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड ह्या राष्ट्रांना भीती वाटू लागली.
  • त्याचप्रमाणे १९४७ नंतर भारतासारखे आशिया खंडातील मोठे देशही स्वतंत्र झाले. चीनमध्ये कम्युनिस्ट राजवट प्रस्थापित झाली.
  • पूर्वेकडील ब्रिटिश साम्राज्याचा लोप होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत होती व त्यामुळे ब्रिटन ह्या राष्ट्रांचे संरक्षण करण्यास असमर्थ आहे, हेही दिसत होतेच.
  • अशा राजकीय परिस्थितीच्या जाणिवेने ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड ह्या दोन गोऱ्या राष्ट्रांनी आपले अस्तित्व व ह्या प्रदेशांतील महत्त्व अबाधित राहावे, ह्यासाठी हा लष्करी करार केला.
  • ब्रिटिश राष्ट्रकुलातील राष्ट्रांनी स्वतंत्रपणे अमेरिकेशी लष्करी करार केल्याचे हे पहिले उदाहरण आहे.
  • ब्रिटनला प्रतिनिधित्व दिल्यास पूर्वेकडील ब्रिटिश साम्राज्यातील देश स्वायत्त झाल्यावर त्यांस प्रतिनिधित्व द्यावे लागले असते.
  • त्याचप्रमाणे ह्याच प्रदेशात हितसंबंध असलेल्या फ्रान्ससारख्या देशांना वगळणेही कठीण झाले असते.
  • ब्रिटनला ह्या करारातून वगळण्यात आले, एवढेच नव्हे, तर ह्या करारात आणखी कोणासही समाविष्ट करू नये, असेही ह्या तीन राष्ट्रांनी ठरविले होते.
  • पॅसिफिक महासागरात वसलेल्या ह्या देशांना आशियाई देशापासून संरक्षण मिळावे, हा ह्या करारामागील हेतू स्पष्ट दिसतो.
  • सीटोच्या लष्करी करारामुळे आग्नेय आशियातील कम्युनिस्ट-प्रसारात प्रतिबंध घातला गेला व त्या करारात हे तीनही देश सहभागी आहेत.


अधिक माहीतीसाठी :-

Friday 15 December 2017

जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजना

{Jawaharlal Nehru National Urban Renewal Mission (JNNURM)} 


जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजना ही योजना .भारतीय केंद्रशासनाची नगरसुधारणेची राष्ट्रीय योजना आहे.

उद्दिष्ट 

  • देशातील दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमधील पायाभूत नागरी सुविधांचा विकास करणे.
  • जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण प्रकल्पांतर्गत येणाऱ्या बीएसयूपी, आयएचएसडीपी, भागीदारीतून राबविण्यात येणारी परवडणार्‍या घरांची योजना, आयएसएचयूपी या सर्व योजना राजीव आवास योजनेत विसर्जित करून घेण्यात येणार आहेत.
  • बीएसयूपी (बेसिक सर्व्हिसेस फॉर अर्बन पुअर) योजना असलेल्या शहरांसाठी भारतीय केंद्र सरकारकडून ५० टक्‍के, तर आयएचएसडीपीकरिता ८० टक्‍के निधी देण्यात येईल. 
  • तीन लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांसाठीही केंद्र ८० टक्‍के अर्थसाह्य पुरविणार आहे.
  • आयएचएसयूपीअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरांचा ५३ टक्‍के खर्च हा केंद्रशासन उचलणार आहे. 
  • यासाठी घेण्यात येणाऱ्या कर्जावरही पाच टक्‍के व्याजाची सवलत देण्यात येणार आहे.

या योजनेचा निधी उभारणी :-

जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण योजनेमध्ये काही प्रकल्पांसाठी भारतीय केंद्रशासनाकडून ५० टक्के अनुदान देण्यात येते, राज्य शासनाकडून ३० टक्के, ८ टक्के महापालिकेकडून आणि १२ टक्के लाभार्थींनी भरणे अपेक्षित असते.
अशा प्रकारे प्रकल्पाचा निधी उभा राहतो.

 अधिक माहितीसाठी :-

Monday 11 December 2017

लोकसंख्या धोरण इ.स. २०००

 ११ मे २००० रोजी भारताची लोकसंख्या १०० कोटी झाली.

जगातील क्षेत्रफळाच्या २.४ % क्षेत्रफळ असलेल्या या देशात जगातील १६ % लोकसंख्या राहत होती.

लोकसंख्या वाढीचा दर आटोक्यात आणण्यासाठी दुसरे लोकसंख्याविषयक धोरण जाहीर करण्यात आले.

पार्श्वभूमी

इ.स.१९९३ साली एम. एस. स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली.

या समितीने आपला अहवाल १९९४ मध्ये सादर केला व त्यानुसार पुढे २००० सालचे लोकसंख्या धोरण ठरविण्यात आले.

महत्त्वाची उद्दिष्टे

०१. अल्पकालीन उद्दिष्ट -
संततीनियमनासाठी आवश्यक साधनांचा पुरवठा करणे.
आरोग्याच्या पायाभूत सुविधा एकात्मिक सेवा पुरविणे.

०२. मध्यकालीन उद्दिष्ट -
प्रत्येक जोडप्याला दोन मुले यासाठी प्रोत्साहन देणे.

०३. दीर्घकालीन उद्दिष्ट -
लोकसंख्येचे २०४५ पर्यंत स्थिरीकरण करणे.

शिफारशी


  • १४ वर्षांपर्यंतच्या मुला-मुलींना प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे करावे.
  • शाळेतील गळतीचे प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील प्रमाण २० टक्क्य़ांपेक्षा कमी आणावे.
  • जननदर नियंत्रणासाठी व संतती नियमनासाठी याबाबत सामान्य लोकांना माहिती देण्यासाठी विशेष व्यवस्था निर्माण करावी
  • फक्त दोन मुले असलेल्या व निर्बजिीकरण करून घेतलेल्या दारिद्य्ररेषेखालील दाम्पत्यांच्या नावे ५००० रुपयांची विमा पॉलिसी उघडावी.
  • १८ वर्षांपेक्षा उशिरा विवाह करणाऱ्या मुलींना बक्षीस देणे तसेच २१ वर्षांनंतर मातृत्व स्वीकारणाऱ्या मुलींना बक्षीस देणे.
  • माता मृत्युदराचे प्रमाण दर एक लाख जिवंत जन्मामागे १०० पेक्षा कमी आणावा.
  • ८०% प्रसूती संस्थात्मक पद्धतीने व १०० टक्के प्रसूती या प्रशिक्षित व्यक्तींच्या उपस्थितीत व्हाव्यात.
  • जन्म, मृत्यू, विवाह, गर्भधारणा यांचे १०० टक्के नोंदणीचे लक्ष साध्य करावे.
  • ग्रामीण भागात रुग्णवाहिका सेवा पुरविण्यासाठी विशेष फंड व कमी व्याजदराचे कर्ज उपलब्ध करून द्यावे.
  • पंचायत समिती व जिल्हा परिषदांना लहान कुटुंब धोरण राबविण्यासाठी बक्षिसे द्यावीत.

अधिक माहीतीसाठी :-

Saturday 9 December 2017

राष्ट्रीय लोकसंख्या धोरण इ.स. १९७६

घोषणा :- १६ एप्रिल १९७६.


केंद्रीय स्वास्थ्य व कुटुंबराज्य मंत्री डॉ. करणसिंग यांनी राष्ट्रीय लोकसंख्या धोरण मांडले.


उद्दिष्टे :-


०१. योग्य कायदा करून विवाहाचे किमान वय मुलींसाठी १८ वष्रे व मुलांसाठी २१ वर्षांपर्यंत वाढवणे.

०२. निर्बीजीकरण प्रोत्साहनासाठी दिल्या जाणाऱ्या राशीत वाढ करणे.

०३. दोन मुलांनंतर कुटुंब नियोजन केल्यास १५० रुपये, तीन मुलांनंतर केल्यास १०० रुपये चार मुलांनंतर केल्यास ७० रुपये.

०४. राज्य शासनांना अनिवार्य निर्बीजीकरणासाठी कायदे करण्याची अनुमती द्यावी.

०५. २००१ वर्षांपर्यंत लोकसभा व राज्य विधानसभा यामधील प्रतिनिधित्व १९७१ च्या जनगणनेनुसार निश्चित करावे.

०६. केंद्रीय व राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना लहान कुटुंब संकल्पना स्वीकारण्यासाठी प्रोत्साहनपर लाभ द्यावेत.

०७. राज्यांना त्यांच्या कुटुंबनियोजन कार्यक्रमासाठी केंद्राकडून निधी मिळावा.

काही प्रमुख मुद्दे :-


१९७६ चे लोकसंख्या धोरण हे जास्त काळ टिकले नाही.

१९७७ साली निवडणुका झाल्या व सत्तेत आलेल्या सरकारने २९ जून १९७७ रोजी वरील धोरणातील, कुटुंबनियोजन कार्यक्रमात जी सक्ती करण्यात आली होती, ती रद्द केली.

१९७५ मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सरकारने आणीबाणी जाहीर केली व या काळात १९७६ च्या लोकसंख्या धोरणाला संसदेत मान्यता देण्यात आली.

संजय गांधी यांच्यामुळे या धोरणात सक्तीच्या कुटुंबनियोजनाचा समावेश करण्यात आला.

या काळात मोठय़ा प्रमाणावर निर्बजिीकरण शस्त्रक्रिया करण्यात आल्यात.

अधिक माहितीसाठी :-
www.reliableacademy.com

Wednesday 6 December 2017

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण)




या योजनेचा प्रारंभ :- २० नोव्हेंबर २०१६.

ठिकाण :- आग्रा , उत्तरप्रदेश.

शुभारंभ :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेद्वारे करण्यात आला.

ही योजना म्हणजे सर्वांसाठी घरे या योजनेचाच एक भाग आहे.

सर्वांसाठी घरे ही योजना प्रमुखत: दोन विभागांमध्ये विभाजित केल्या गेली आहे.
प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) आणि
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण).

उद्दीष्ट्ये :-


या योजने-अंतर्गत २०१६-२०१७ या आर्थिक वर्षांपासून सुरु करुन २०१८-२०१९ या तीन वर्षात, भारताच्या ग्रामीण भागात, सुमारे १ कोटी घरकुलांचे बांधकाम करण्यात येणार आहे.

घरकुलात एक स्वयंपाकघर असेल.
तसेच घरात शौचालयाची व्यवस्था करण्यात येईल.

या घरकुलांच्या बांधकामांकरीता पूर्वीची आर्थिक मदत वाढविण्यात आलेली आहे. समतल मैदानी क्षेत्रात पूर्वीची मदत  ७०,००० रु. ने वाढवून ती आता  १.२० लाख रु. इतकी करण्यात आलेली आहे.

तसेच, टेकड्या/दुर्गम भागात, यासाठी असलेली पूर्वीची रक्कम वाढवून ती आता  १.३० लाख रुु. इतकी करण्यात आलेली आहे.

लाभार्थी निवड व प्रदानाचे स्वरुप :-


एसईसीसी च्या २०११ च्या डाटामधून ग्रामसभेद्वारे यातील लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.

या योजनेमार्फत देण्यात येणारी रक्कम ही आवाससॉफ्ट व पीएफएमएस या संचेतनांचे माध्यमातून या योजनेच्या लाभार्थींचे बँक खात्यात सरळ देय होईल.

निवड न झालेल्या पण घरकुल बांधकामासाठी इच्छुक लाभार्थ्यांना  ७०,००० रु. संस्थागत कर्ज प्राप्त करण्याची सुविधाही या योजनेत आहे.

या योजनेतील लाभार्थ्याला स्थानिकरित्या योग्य आणि त्याचेदृष्टीने उपयोगी असे डिझाईन निवडण्याचा पर्याय देण्यात येणार आहे.


अधिक माहितीसाठी :-

Monday 4 December 2017

भारतातील ज्योतिर्लिंगे


भारतात एकूण  .१२ ज्योतिर्लिंगे आहेत.

त्यातील  १२ ज्योतिर्लिंगांपैकी पाच महाराष्ट्रात आहेत.

ज्‍योर्तिलिंगांचे नाव -- राज्य -- ज्‍योर्तिलिंगाचे ठिकाण.


सोमनाथ -- गुजरात -- वेरावळ.

मल्लिकार्जुन -- आंध्रप्रदेश -- श्रीशैल्य.

महांकालेश्वर -- मध्यप्रदेश -- उज्जैन.

ओंकारेश्वर -- मध्यप्रदेश -- ओंकारेश्वर.

रामेश्वर -- तामिळनाडु -- रामेश्वर.

विश्वेश्वर -- उत्तर प्रदेश -- वाराणसी.

केदारनाथ -- उत्तराखंड -- केदारनाथ.

महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगे :-


वैजनाथ -- महाराष्ट्र -- परळी.

भीमाशंकर -- महाराष्ट्र -- भीमाशंकर.

नागेश्वर -- महाराष्ट्र -- औंढा नागनाथ.

त्र्यंबकेश्वर -- महाराष्ट्र -- त्र्यंबकेश्वर.

घृष्णेश्वर -- महाराष्ट्र -- औरंगाबाद.


अधिक माहितीसाठी :-
www.reliableacademy.com

Saturday 2 December 2017

प्रमुख समित्या...


प्राचार्य पी. बी. पाटील समिती :-

राज्य सरकारने '‘पंचायत राज’ संस्थेचे मूल्यमापन करण्यासाठी १८ जून १९८४ रोजी ही समिती नियुक्त केली होती.

या समितीने जून १९८६ मध्ये सरकारला आपला अहवाल सादर केला.

या समितीने पंचायत राज संस्थांना आíथकदृष्टय़ा स्वयंपूर्ण करण्यासाठी आणि सत्तेचे विक्रेंद्रीकरण करण्याबाबत सूचना केल्या.

अशोक मेहता समिती :- 

ही समिती केंद्र सरकारने स्थापन केली होती.

१९७७ मध्ये केंद्रात सत्तांतर झाले आणि जनता पक्षाचे सरकार आले.

या पाश्र्वभूमीवर पंचायत राज व्यवस्थेचे मूल्यमापन करण्यासाठी नवीन सरकारने १९७७ च्या अखेरीस ही समिती नियुक्त केली.

या समितीने १९७८ मध्ये आपला अहवाल सरकारला सादर केला.

आपल्या अहवालात .अशोक मेहता समितीने १३२ शिफारसी केल्या होत्या.

शिफारसी :-

अशोक मेहता समितीने पंचायत राजव्यवस्था द्विस्तरीय असावी ही महत्त्वाची शिफारस केली.
यात जिल्हा स्तरावर जिल्हा परिषद असावी.
तसेच जिल्हा स्तरानंतर पंचायत समिती व ग्रामपंचायत या दोन संस्थाऐवजी मंडळ पंचायतीची स्थापना करावी.
मंडळ पंचायत ही ग्रामपंचायतीपेक्षा मोठी असावी.

अशोक मेहता समितीची दुसरी महत्त्वाची शिफारस म्हणजे पंचायत राज संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रीय पक्षांचा सहभाग असावा.
थोडक्यात, या निवडणुका पक्षीय स्तरावरून लढवल्या जाव्या.

जी. व्ही. के. राव समिती :-

ही समिती १९८५ मध्ये स्थापन करण्यात आली.

या समितीने नियोजन आणि विकासासाठी जिल्हा हा योग्य घटक मानून विकास कार्यक्रमाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी जिल्हा परिषदेवर सोपवावी.

एल. एम. सिंघवी समिती :-

१९८६ मध्ये या समितीची नियुक्ती करण्यात आली.

.महत्त्वाचे वैशिष्टय़ :-
पंचायत राज संस्थांना (स्थानिक स्वराज्य संस्थांना) घटनात्मक मान्यता व संरक्षण द्यावे यासाठी भारतीय राज्यघटनेत एक नवीन प्रकरण समाविष्टित करण्यात यावे.

महत्त्वाचे मुद्दे :-
६४ वी घटनादुरुस्ती :-
केंद्र सरकारने पंचायत राज्य संस्थांना घटनात्मक दर्जा बहाल करण्यासाठी एल. एम. सिंघवी समितीच्या अहवालानंतर पुढाकार घेतला.
सरकारने लोकसभेत ६४ वे घटनादुरुस्ती विधेयक इ.स. १९८९ मध्ये मांडले.
लोकसभेने ते संमत केले; परंतु त्यावेळी सत्ताधारी पक्षाचे राज्यसभेत बहुमत नसल्याने राज्यसभेत हे विधेयक पारित होऊ शकले नाही.

७३ वी घटनादुरुस्ती :-
पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा मिळावा यासाठी १९९१ मध्ये सरकारने लोकसभेत एक विधेयक मांडले.
राष्ट्रपतींनी २० एप्रिल, १९९३ रोजी याला मान्यता दिली आणि त्याचे रूपांतर कायद्यात झाले यालाच १९९३ चा कायदा म्हणून ओळखले जाते.
या घटनादुरुस्ती अन्वये भाग ९ ए हा नवा भाग ‘पंचायती’ या शीर्षकाखाली समाविष्ट करण्यात आले.
यात कलम २४३ ते २४३ ओ यांचा समावेश होतो.
तसेच या घटनादुरुस्तीने परिशिष्ट ११ वे हे नवे परिशिष्ट जोडले असून त्यात महत्त्वाच्या विषयांचा तपशील दिलेला आहे.


अधिक माहितीसाठी :-
www.reliaeacademy.com