Friday 13 April 2018

आधुनिक भारताचे जनक, भारतीय संविधानाचे शिल्पकार, मानवी हक्कांचे कैवारी - डॉ. भीमराव रामजी आंबेडकर

जन्म :- इ.स. १४ एप्रिल १८९१. महू - इंदूर जिल्हा - मध्य प्रदेश.


मृत्यू :- ६ डिसेंबर १९५६ (वय ६५) दिल्ली.

टोपणनाव :- बाबासाहेब, बोधिसत्त्व, भीमा, भिवा, भीम. 
मूळ गाव :- रत्‍नागिरी जिल्हात मंडणगडाजवळ असलेले आंबडवे. 
वडील :- रामजी सकपाळ (लष्करात सुभेदार मेजर होते). 
आई :- भीमाबाई रामजी सकपाळ. 

शिक्षण :- 

मुंबई विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स ग्रेज इन्, लंडन
बॉन विद्यापीठ, जर्मनी.

पदव्या :- 

बी.ए., एम.ए., पी.एचडी., एम.एससी., डी.एससी., बार-ॲट-लॉ, एल.एल.डी., डी.लिट. (एकूण ३२ पदव्या).
परदेशात अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट (पीएचडी) मिळवणारे पहिले भारतीय.
दक्षिण आशियातून दोन वेळा डॉक्टरेट (पीएचडी व डी.एससी.) मिळवणारे पहिले दक्षिण आशियाई होय.

पुरस्कार :- 

भारतरत्न (१९९०),
पहिले कोलंबियन अहेड ऑफ देअर टाइम (२००४),
द ग्रेटेस्ट इंडियन (२०१२).

संघटना :-

  • बहिष्कृत हितकारिणी सभा. 
  • समता सैनिक दल. 
  • स्वतंत्र मजूर पक्ष. 
  • डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी. 
  • शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन. 
  • पीपल्स एज्युकेशन सोसायटी. 
  • द बाँबे शेड्युल्ड कास्ट्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट. 
  • भारतीय बौद्ध महासभा. 
  • रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया.
भारताचे पहिले कायदा व न्याय मंत्री :- कार्यकाळ - १५ ऑगस्ट १९४७ - सप्टेंबर १९५०.


भारतीय संविधानाच्या मसूदा समितीचे अध्यक्ष :- कार्यकाळ - २९ ऑगस्ट १९४७ - २४ जानेवारी १९५०.


  • डॉ. भीमराव रामजी आंबेडकर  म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर नावाने प्रसिद्ध असलेले जागतिक दर्जाचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ, कायदेपंडीत, राजनीतिज्ञ, लेखक, समाज सुधारक, तत्त्वज्ञ, भारतीय संविधानाचे शिल्पकार, मानवी हक्कांचे कैवारी, भारताचे पहिले कायदा व न्यायमंत्री, बौद्ध धर्म पुनरुत्थानक आणि स्वातंत्र भारताचे जनक होय. 
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे समाजशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, बॅरिस्टर, जलतज्ज्ञ, कृषितज्ज्ञ, संपादक, स्वातंत्र्य सेनानी, अस्पृश्य, कामगार व स्त्रियांच्या अधिकारांचे पुरस्कर्ते होते.
  • तरुण आंबेडकरांनी आपल्या शोध पुस्तिकेत जातिसंस्था विषयक खालिल सिद्धान्त मांडले.-
वर्ग आणि जात तसे मानायचे झाले, तर निकटवर्ती होत. कालांतराने ते अलग होतात. बंदिस्त केलेली, गोठवलेला वर्ग म्हणजे ‘जात’.

  • ४ जानेवारी १९२८ च्या टाईम्स ऑफ इंडियात इंदूर संस्थानात अनुसूचित जातींना मिळणार्‍या वाईट वागणुकीबद्दल वृत्तान्त आला होता. त्याची तुलना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १८ व्या शतकातील पेशवाईतील  स्थितीशी केली.- 
आपल्या सावलीमुळे हिंदू भ्रष्ट होऊ नयेत म्हणून पेशवाईत अस्पृश्याला सार्वजनिक रस्ते वापरण्याची बंदी होती. अस्पृश्याने चुकूनही आपला विटाळ होऊ नये म्हणून गळ्यात किंवा हाताला काळा दोरा बांधावा असा दंडक होता. त्यामुळे त्याची अस्पृश्य म्हणून ओळख पटत असे. पुणे ही पेशव्यांची राजधानी. पुण्यात ज्या जमिनीवर अस्पृश्य चालेल ती जमीनसुद्धा शुद्ध व्हावी यासाठी अस्पृश्यांना कमरेत एक केरसुणी झाडू लटकवावी लागत असे. असेच अस्पृश्यांची थुंकी रस्त्यात पडली आणि त्यावर चुकून एखादा सवर्ण हिंदूचा पाय पडला तर, तो अपवित्र होऊ नये म्हणून थुंकी गोळा करण्यासाठी अस्पृश्याला गळ्यात एक मडके लटकवावे लागत असे.


अस्पृश्यतेचा विरोध

महाडचा सत्याग्रह

  • इ.स. १९२६ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुंबई प्रांतिक विधानपरिषदेचे नेमलेले सदस्य बनले. 
  • इ.स. १९२७ च्या सुमारास त्यांनी अस्पृश्यतेविरुद्ध जागृत चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेतला. 
  • बहुसंख्य ठिकाणी अस्पृश्यांना सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरण्याचा किंवा पिण्याचा अधिकार नव्हता. 
  • २० मार्च १९२७ रोजी परिषदेत  आपला मोर्चा चवदार तळ्याकडे वळवला. बाबासाहेब सर्वप्रथम तळ्यातील पाणी ओंजळीने प्यायले, त्यानंतर आंबेडकरानुयायांनी त्यांचे अनुसरण केले. 

काळाराम मंदिर सत्याग्रह

  • काळाराम मंदिर सत्याग्रह हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांच्या नेतृत्वाखाली २० मार्च इ.स. १९३१ रोजी महाराष्ट्राच्या नाशिक शहरातील अस्पृश्यांचा काळा राम मंदिरामध्ये  प्रवेशासाठीचा सत्याग्रह होता. 
  • २ मार्च १९३० ला बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह सुरू केला, अन तिकडे १२ मार्च १९३० ला महात्मा गांधी यानी दांडीयात्रा सुरू केली. गांधीचा लढा राजकीय होता, तर बाबासाहेबांचा सामाजिक होता.

पुणे करार

  • पुणे करार हा २४ सप्टेंबर १९३२ रोजी महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन प्रमुख भारतीय राजकीय नेत्यांमध्ये झाला. 
  • दलितांना स्वतंत्र मतदारसंघाऐवजी सर्व प्रांतांमध्ये सर्वसाधारण मतदारसंघात लोकसंख्येच्या प्रमाणात जागा द्याव्यात हा त्याचा मुख्य मुद्दा होता. 
  • त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित मदनमोहन मालवीय, सी.राजगोपालाचारी आदींच्या सह्या आहेत. हा करार पुणे करार या नावाने ओळखला जातो.

बहिष्कृत हितकारिणी सभा

  • बाबासाहेब आंबेडकरांनी २० जुलै १९२४ रोजी मुंबई येथे ‘बहिष्कृत हितकारिणी सभे’ची स्थापना केली. 
  • सामाजिक व राजकीयदृष्ट्या तळागाळात फेकल्या गेलेल्यांना भारतीय समाजातील इतरांच्या बरोबर आणणे, हे ह्या सभेचे ध्येय होते. 
  • अस्पृश्यांना समाजाबाहेर ठेऊन, त्यांना नागरी, धार्मिक वा राजकीय हक्क देण्यात आले नव्हते. त्यांच्या अधिकारांप्रती त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करणे हा उद्देश होता. 
  • आंबेडकरांनी सायमन कमिशनकडे एक पत्र सादर केले व त्यात त्यांनी मागासवर्गीयांसाठी नामनिर्देशन तत्त्वावर जागा आरक्षित ठेवण्यासंबंधी मागणी केली. 
  • तसेच भूदल, नौदल व पोलीस खात्यात मागासवर्गीयांची भरती करण्यासंबंधीचीही मागणी केली होती. सभेमार्फत अस्पृश्यांच्या कल्याणासाठी शाळा,वसतिगृहे व ग्रंथालये सुरू करण्यात आली.

कृषी व शेतकऱ्यांसाठी कार्य

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा पहिला संप घडवून आला होता. 
  • हा संप इ.स. १९२८-१९३४ या दरम्यान रायगड जिल्ह्यातल्या 'चरी' या गावात झाला. हा संप तब्बल सात वर्ष चालला. 
  • १४ एप्रिल १९२९ रोजी रत्नागिरी जिल्हा शेतकरी परिषद चिपळूण येथे आयोजित करण्यात आली होती. या शेतकरी परिषदेचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. त्यांनी कोकणातील  खोतीदारीविरूद्ध शेतकऱ्यांचे आंदोलन उभारले. 
  • १७ सप्टेंबर  १९३७ रोजी खोती पद्धत नष्ट करणाऱ्या कायद्याचे विधेयक बाबासाहेबांनी मुंबई विधिमंडळात मांडले होते 
  • १० जानेवारी १९३८ रोजी २५,००० शेतकऱ्यांचा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली विधिमंडळावर नेण्यात आला. 
  • शेतकऱ्यांच्या यशस्वी मोर्च्यानंतर, शेतकऱ्यांची चळवळ अधिक तीव्र करण्याच्या उद्देशाने; त्यांनी शेतकऱ्यांच्या परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी कोकणचा दौरा केला. 
  • शेतकऱ्यांच्या अनेक सभांमध्ये त्यांनी मार्गदर्शन करून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. विशेष म्हणजे हे शेतकरी कुणबी, मराठा आणि मुसलमान होते. 
  • बाबासाहेबांनी शेतकऱ्यांच्या जातींचा विचार न करता सर्व जातिधर्माच्या शेतकऱ्यांसाठी चळवळ उभारली होती.

गोलमेज परिषद

  • गोलमेज परिषद ही अनेक पक्षांमध्ये चर्चा करण्यासाठीचा मंच होय. 
  • पूर्वी गोल आकाराच्या मेजाभोवती बसून पक्षकार वाटाघाटी करीत असल्यामुळे यास असे नाव आहे. यात कोणालाही मेजाच्या मध्यात किंवा कोपऱ्यात बसल्याने आपले महत्व कमीअधिक आहे असे वाटू नये यासाठी गोल आकाराचे मेज वापरले जायचे. 
  • भारतीय स्वातंत्र्यलढ्यादरम्यान सायमन कमिशन वर चर्चा करण्यासाठी लंडन येथे तीन गोलमेज परिषदा भरवल्या गेल्या. 
  • पहिली गोलमेज परिषद - १२ नोव्हेंबर १९३०. 
  • दुसरी गोलमेज परिषद - ७ सप्टेंबर १९३१. 
  • तिसरी गोलमेज परिषद - १७ नोव्हेंबर १९३२. 
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर समग्र पीडित, शोषित व दलितांचे प्रतिनिधी म्हणून लंडनच्या तिन्हींही गोलमेज परिषदांचा हजर राहिले.

 हिंदू कोड बिल

  • हा मसुदा २४ फेब्रुवारी १९४९ संसदेत मांडला गेला. 
  • स्वतंत्र भारताचे पहिले कायदे मंत्री बाबासाहेब आंबेडकरांनी यात भारतातीस सर्व जाती-धर्मातील स्त्रियांना जाचक रुढी आणि परंपरांपासून सुटका मिळावी यासाठी हा मसुदा लिहिला. 
  • आंबेडकरांनी ४ वर्षे, १ महिना आणि २६ दिवस यावर काम करून हे हिंदू कोड बिल तयार केले. 
  • हे बिल इ.स. १९४७ पासून ते फेब्रुवारी १९४९ रोजी संसदेत मांडले. 
  • हा मसुदा सात वेगवेगळ्या घटकांशी निगडित कायद्याचे कलमात रूपांतर करू पाहत होता. 
  • हे सात घटक खालीलप्रमाणे :- 
- जी व्यक्ती मृत्युपत्र न करता मृत पावली असेल अशा मृत हिंदू व्यक्तीच्या (स्त्री आणि पुरुष दोघांच्याही) मालमत्तेच्या हक्कांबाबत. 
- मृताचा वारसदार ठरवण्याचा अधिकार. 
- पोटगी. 
- विवाह. 
- घटस्फोट. 
- दत्तकविधान. 
- अज्ञानत्व व पालकत्व.

भारतीय संविधानाची निर्मिती

  • भारताचे संविधान तयार करण्यासाठी सर्वप्रथम घटना समिती (संविधान सभा) स्थापन करण्यात आली. 
  • संविधान सभेत सुरुवातीला २९६ सदस्य होते, भारताच्या स्वातंत्र्यानंतर त्यात फेरबदल होऊन ही संख्या २९९ झाली. 
  • ९ डिसेंबर १९४६ रोजी संविधान सभेची पहिली बैठक झाली. ११ डिसेंबरला डॉ.राजेंद्रप्रसाद यांची घटनासमितीचे अध्यक्ष म्हणुन निवड करण्यात आली. 
  • घटना समितीने घटना निर्मितीच्या कामांसाठी ८ मुख्य समित्या व १३ उपसमित्यांची रचना केली. २९९ सदस्यांना वेगवेगळ्या समित्यांमध्ये कामे वाटुन देण्यात आली. 
  • घटना समितीने राज्यघटना तयार करणे, देशासाठी कायदे तयार करणे, भारताच्या राष्ट्रकुल सदस्यत्वाला अनुमोदन देणे, भारताचा राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, राष्ट्रगान स्विकृत करणे, पहिल्या राष्ट्रपतींची निवड करणे आणि निवडणुका होईपर्यंत तात्पुरती संसद म्हणुन कार्यभार पाहणे ही कामे केली. 
  • मसुदा समिती ही घटना निर्मितीतील मुख्य समिती होती. त्यामध्ये ७ सदस्य होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष होते. इतर समित्यांनी केलेल्या तरतुदींचा विचार करुन घटनेचा मसुदा तयार करण्याचे काम मसुदा समितीने केले. 
  • त्यांनी घटनेचा पहिला मसुदा फेब्रुवारी १९४८ मध्ये सादर केला. 
  • भारतीय जनतेला त्या मसुद्यात सुधारणा सुचविण्यासाठी ८ महिने वेळ दिला. 
  • जनतेची मते, सुचना, टीका विचारात घेऊन ऑक्टोबर १९४८ मध्ये दुसरा मसुदा सादर करण्यात आला. त्यावर चर्चा होऊन नोव्हेंबर १९४८ मध्ये तिसरा अंतीम मसुदा घटना समितीत मांडण्यात आला. 
  • त्या मसुद्यातील प्रत्येक कलम विचारात घेऊन वर्षभरात एकुण तीनदा वाचन झाले. 
  • या टप्प्यात एकुण ७५६३ सुधारणा सुचविल्या गेल्या, त्यापैकी २४७३ सुधारणांवर घटना समितीत प्रत्यक्ष चर्चा घडुन आली. 
  • डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी युक्तिवाद केला. मसुदा बनविण्याचे प्रमुख (Chief Draftsman) म्हणुन एस.एन.मुखर्जी यांनी काम पाहिले. 
  • २६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेच्या मसुद्याचा ठराव संमत करण्यात आला. 
  • २९९ पैकी उपस्थित असणाऱ्या २८४ सदस्यांनी राज्यघटनेवर सह्या केल्या. 
  • घटनेचा अंमल २६ नोव्हेंबर १९५० पासुन सुरु झाला. हा दिवस निवडण्यामागचे कारण म्हणजे काँग्रेसच्या १९२९ च्या लाहोर अधिवेशनातील ठरावानुसार २६ जानेवारी १९३० हा दिवस भारताचा “पुर्ण स्वराज्य दिन” म्हणुन साजरा करण्यात आला होता. 
  • २६ जानेवारी १९५० हा दिवस घटनेच्या प्रारंभाचा दिन म्हणुन ओळखला जातो. तो दिवस प्रजासत्ताक/गणराज्य दिन म्हणुन साजरा केला जातो. २६ जानेवारी १९५० पासुन घटना समिती संपुष्टात आली. 
  • भारतीय संविधान अंमलात आल्यापासुन भारतीय स्वातंत्र्याचा कायदा १९४७, भारत सरकार कायदा १९३५ व त्याचे सर्व पुरक कायदे रद्द करण्यात आले. 
  • भारताची घटना निर्माण करण्यासाठी घटनाकर्त्यांनी जगातील जवळपास ६० देशांच्या घटनांचा विचार केला. 
  • घटननिर्मितीसाठी २ वर्षे,११ महिने व १८ दिवसांचा कालावधी लागला. (अमेरिकेची घटना चार महिन्यात तयार झाली होती.) 
  • या कालावधीत घटना समितीने ११ सत्रात १६६ दिवस काम केले. मसुदा समितीने १४१ दिवस काम केले. 
  • घटनानिर्मितीसाठी एकुण ६३ लाख ९६ हजार ७२९ रुपये खर्च आला. 
  • भारतीय राज्यघटनेचे मुळ इंग्रजी हस्तलिखित सुंदर आणि वळणदार अक्षरात दिल्लीच्या प्रेमबिहारी नारायण रायजादा (सक्सेना) यांनी लिहले. त्याच्या प्रत्येक पानावर चित्रकार नंदलाल बोस यांच्या नेतृत्वाखाली शांतिनिकेतनमधील इतर कलाकारांनी आकर्षक नक्षीकाम केले आहे. 
  • प्रास्ताविकाचे नक्षीकाम बिओहर राममनोहर सिन्हा यांनी केले. हिंदी मुळ हस्तलिखित वसंत वैद्य यांनी लिहले. त्याला नंदलाल बोस यांनी आकर्षक असे नक्षीकाम केले. 
  • भारतीय संविधानाची इंग्रजी व हिंदी मुळ प्रत भारतीय संसदेच्या लायब्ररीत हेलियम पेटीमध्ये सुरक्षित ठेवण्यात आली आहे. 
  • भारतीय संविधानाची हिंदी व इंग्रजी प्रत देहारादुन येथे छापण्यात आली. 
  • घटना समितीची निशाणी म्हणुन हत्ती स्विकृत करण्यात आला होता. 
  • मुळ घटनेत १ प्रास्ताविका, ८ अनुसुची, २२ भाग आणि ३९५ कलमे होती. सध्या (जुलै २०१७) मध्ये भारताच्या घटनेत १ प्रास्ताविका, १२ अनुसुची, २५ भाग, ४४८ कलमे, ५ परिशिष्टे आहेत. आतापर्यंत १०१ घटनादुरुस्त्या झाल्या आहेत. 
  • प्रजासत्ताक दिनाला राष्ट्रपती देशाला संबोधित करतात. भारतरत्न, पद्मभुषण, किर्तीचक्र पुरस्कार प्रजासत्ताकदिनी दिले जातात. 
  • प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये “Abide with me” हे गीत गायले जाते.


FOR MORE INFORMATION VISIT OUR WEBSITE :- www.reliableacademy.com