Showing posts with label विज्ञान. Show all posts
Showing posts with label विज्ञान. Show all posts

Wednesday 10 January 2018

ऊती (जीवशास्त्र)


  • ऊती हे पेशी पासून तयार झालेल्या संस्था असतात.
  •  ऊतिनिर्मिती प्रक्रिया ही पेशीविभेदनाच्या प्रक्रियेची पुढची पायरी आहे. 
  • एकपेशीय फलित अंड्याचे विभाजन होऊन पेशींचा एकच थर असलेले कोरक गोल (ब्लास्ट्युला) तयार होतात, या अवस्थेत ऊती अजून बनलेल्या नसतात. 
  • कोरक गोलापासून आद्यभ्रूणन प्रक्रियेत बाह्यस्तर, मध्यस्तर आणि अंत:स्तर असे तीन जननस्तर तयार होतात. या प्रक्रियेतील पेशीविभेदनातून ऊतिनिर्मिती सुरू होते आणि इंद्रिये वा अंगे पूर्ण तयार होईपर्यंत चालू राहते. 
  • एकाच प्रकारच्या ऊतीतील पेशी या कमीजास्त प्रमाणात एकसारख्याच असतात आणि एकाच प्रकारचे कार्य करतात.
  • अनेक ऊती मिळून एक अवयव बनवतात, अवयव मधील सर्व ऊती  एकत्र काम करतात. 
  • सर्व साजीवांमध्ये निरनिराळ्या प्रकारांच्या ऊती एकत्र येउन अवयव बनवतात, हे अवयव एकत्र येउन अवयव संस्था तयार होते.  उदा. श्वासंसंस्त्था, पचनसंस्था इ.

पेशी -> ऊती -> अवयव -> अवयव संस्था -> सजीव.

प्राण्यांचे ऊती

प्राणी ऊतींचे चार प्रकार आहेत. त्यांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे करतात :
अभिस्तर ऊती, स्नायू ऊती, चेता ऊती, संयोजी ऊती.

  • अभिस्तर उती :-
  1. अभिस्तर उतींमधील पेशांची रचना दाटीवाटीची असून त्या एक मेकीस चिटकून असतात. त्यामुळे त्यांचा एक सलग स्थळ तयार होतो. 
  2. अभिस्तर हे अन्तर्प्रेशिय पोकळीतील तंतूमय पटलाने खालच्या उतींपासून वेगळे झालेले असते. 
  3. त्वचा, तोंडाच्या आतील स्थर, रक्तवाहिन्यांचे स्थर इ. हे अभिस्थर उतीपासून बनलेले असतात. 
  • अभिस्तर उतीचे विविध प्रकार पुढील प्रमाणे आहेत -
  1. सरल पटट्की अभिस्तर.
  2. स्तरीत पटट्की अभिस्तर.
  3. स्तम्भीय अभिस्तर.
  4. रोमक स्तम्भीय अभिस्तर.
  5. घनाभरूप अभिस्तर.
  6. ग्रंथिल अभिस्तर.
  • संयोजी उती :-
संयोजी उतीमध्ये अधारक असते आणि त्या आधारराकांमध्ये पेशी रुतलेल्या असतात.
या आधारकाचे स्वरूप, घनता आणि प्रमाण हे त्यातील संयोजी उटीच्या कार्यानुसार ठरते. हे अधारक जेलीस्दृश द्रवरूप व दाट किंवा दृढ अस्ते.

संयोजी उतीचे बरेच विविध प्रकार असतात :
  1. अस्थी.
  2. रक्त.
  3. अस्थिबंध.
  4. स्नायुरज्जू.
  5. कास्थी.
  6. विरल उती.
  7. चरबीयुक्त उती.
  • स्नायू उती :-
स्नायू उती या स्नायूतंतूच्या लांब पेशीपासून बनलेल्या असतात. स्नायुंमध्ये विशिष्ट प्रकारचे प्रथिन असते. त्यास 'संकोची प्रथिन' असे म्हणतात या प्रथिनानच्या आकुंचन व प्रसारणामुळे स्नायूंची हालचाल होते.
  • चेता उती :-
सर्व पेशींमध्ये चेतना क्षमता आढळते. या उती चेतना ग्रहण करतात व या अत्यंत जलद गतीने शरीरातील एका भागाकडून दुसर्या भागाकडे वहन करतात.

मेन्दू , चेतरज्जू व चेतान्तू हे सर्व चेताउतीनी बनलेले असतात.

वनस्पती ऊती

वनस्पती ऊतींचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत.
साध्या ऊती व संयुक्त ऊती.


  • साध्या ऊती :-
या ऊतींचे मूलोती, स्थूलकोनोती आणि दृढोती असे तीन प्रकार आहेत :- मूलोती (मूलभूत ऊती) यांमधील पेशी जिवंत, पेशीभित्तिका पातळ.

मूलोती (मूलभूत ऊती) -
पेशी एकमेकांना चिकटून असल्या तरी पेशींच्या दरम्यान जागा असते.
पाणी, अन्न साठविणे, तसेच आधार देणे असे यांचे कार्य आहे.

स्थूलकोनोति -
या ऊती मूलोतीप्रमाणेच जिवंत पेशींच्या बनलेल्या असतात, मात्र पेशींच्या दरम्यान पेशीभित्तिका जाड झाल्यामुळे जागा नसते.
त्यामुळे जिथे या ऊती असतात त्या भागाला आधार देणे हे यांचे कार्य आहे.
त्या पाणी, अन्नसुद्धा साठवितात.

दृढोती -
या ऊतींमधील पेशी मृत असतात. त्यांच्या पेशीभित्तिकावर आतील बाजूस लिग्नेनचा थर असल्यामुळे भिंती जाड असतात.
यांचे मुख्य कार्य आधार देणे आहे


  • संयुक्त ऊती 

एकापेक्षा जास्त प्रकारच्या जास्त प्रकारच्या साध्या ऊती एकत्र येऊन संयुक्त ऊती बनतात. त्यांचे कार्य अन्नरस, पाणी यांचे वहन करणे.
संयुक्त ऊतीचे काष्ठ व रसवाहिनी असे दोन प्रकार आहेत.

काष्ठ -
या संयुक्त ऊतीमध्ये काष्ठमूलोती, काष्ठदृढोती, वाहिका, वाहिनी अशा पेशी असतात मुळांनी शोषिलेले पाणी खोडातून इतर अवयवांकडे वाहून नेणे हे कार्य काष्ठ करते.

रसवाहिनी -
ही संयुक्त ऊती रसमूलोती, रसदृढोती, चाळणी नलिका, चाळणी पेशी यांपासून बनलेली असते. पानांनी तयार केलेले अन्न वनस्पतीच्या इतर भागांकडे वाहून नेणे हे यांचे कार्य आहे.


अधिक माहितीसाठी
www.reliableacademy.com

Thursday 9 November 2017

विषय - विज्ञान​..- .हिमोग्लोबिन..

✍ ..हिमोग्लोबिन..:-


-- हिमोग्लोबिन हे लाल रक्तपेशींमध्ये द्रव्य असते..

-- हिमोग्लोबिन हे प्राणवायू वाहुन नेण्याचे कार्य करते..

-- फुप्फुसातील किंवा कल्ल्यांमधील हवेतील प्राणवायु रक्तात वहनयोग्य करण्याचे काम हिमोग्लोबिन करते..

-- हा प्राणवायू अवयवांपर्यंत पोहचवते व अवयवांपासुन कार्बनडायऑक्साईड हिमोग्लोबिनद्वारे फुप्फुस किंवा कल्ल्यांपर्यंत पोहचवले जाते..


👉 रचना..-

-- फुप्फुसातील वायुकोशापासून ते शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत ऑक्सिजन वाहून नेणे तसेच चयापचयाच्या दरम्यान तयार होणारा कार्बनडायऑक्साईड पुन्हा फुप्फुसापर्यंत नेण्याचे कार्य अविरतपणे ‘हिमोग्लोबिन’ हे प्रथिन करत असते..

-- रक्तातील तांबड्या रक्तकणिकांमध्ये असणारे हे प्रथिन चार ग्लोब्युलीन प्रथिन-शृंखलाचे बनलेले असते..

-- प्रत्येक शृंखलेत हिम नावाचे पोरफायरीन हे लोह-युक्त संयुग असते..
या संयुगामुळेच रक्त लाल दिसते..

-- हिम संयुगामुळे शरीरामध्ये ऑक्सिजन आणि कार्बनडायऑक्साईड वहन शक्य होते..

-- हिमोग्लोबिनमुळेच तांबड्या रक्तकणिका त्यांचा आकार टिकवून ठेवतात..


👉  हिमोग्लोबिनचे मापनाची पध्दत..-

-- हिमोग्लोबिनचे प्रमाण ग्रॅम/डेसिलीटर मध्ये मापले जाते..

-- एक डेसिलीटर म्हणजे १०० मिलीलीटर. प्रत्येक १०० मिलीलीटर मध्ये किती ग्रॅम हिमोग्लोबिन आहे यावरून त्या व्यक्तीच्या आरोग्याची कल्पना करण्यात येते..

-- हिमोग्लोबिन मापनासाठी हिमोग्लोबिनोमीटर या उपकरणाचा वापर केला जातो..

-- आधुनिक प्रकारची उपकरणे डीजीटल स्वरूपातील असतात..
सहज कोठेही घेऊन जाण्यासारखी असल्याने ती सोयीस्कर ठरतात.पूर्वी ‘साहिली’चे उपकरण वापरले जात असे..
यात हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर तपासणीचा रक्त नमुना मिसळला जाई..

-- रक्तातील हिमोग्लोबिन आम्लाच्या सान्निध्यात आम्लधर्मीय हिमॅटीन या संयुगात परावर्तीत होते..
या मिश्रणात पाणी घालून त्याच्या किरमिजी रंगाची तुलना हिमॅमीटर च्या रंगीत काचांबरोबर जुळवली जाई..

-- या रंगीत काचांच्या बाजूलाच हिमोग्लोबिनचे प्रमाण दर्शवणारी पट्टिका असे..
त्यातून हिमोग्लोबिनचे नेमके प्रमाण समजले जात असे..


👉 प्रमाण व त्याचे परिणाम..-

-- हिमोग्लोबिनचे प्रमाण वयाप्रमाणे, लिंगाप्रमाणे आणि आहाराच्या सवयीनुसार बदलते..

-- नुकत्या जन्मलेल्या बाळाच्या शरीरात १७ ते २२,
बालकांच्या शरीरात ११ ते १३,
प्रौढ पुरुषांत १४ ते १८
तर
प्रौढ स्त्रियांत १२ ते १६ ग्रॅम/डेसिलीटर
इतके हिमोग्लोबिनचे प्रमाण असते..

-- मध्यमवयीन आणि वृद्धावस्थेत हे प्रमाण थोडे फार उतरते..

-- विशेषतः भारतीय स्त्रियांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण नेहमीच कमी आढळते..

-- कुपोषण, गरोदरपण, प्रसूती आणि पाळी येण्याच्या प्रक्रियेने हे प्रमाण घटलेले असते..

-- अति रक्तस्त्राव, शस्त्रक्रिया, अपघात, जठर-व्रण (अल्सर) किंवा मोठ्या आतड्याचा कर्करोग या कारणाने देखील हिमोग्लोबिनचे प्रमाण घटते..

-- आहारात पुरेसे लोह, फॉलिक आम्ल आणि जीवनसत्व B12 नसेल तर अभावजन्य पंडूरोग होऊ शकतो..

-- सिकल सेल पंडूरोग, थॅलासेमिया, हाडांचा कर्करोग, वृक्काचे काम बंद पडणे (kidney failure) अशा कारणाने देखील हिमोग्लोबिनचे प्रमाण उतरते..

-- गरोदर मातांनी हिमोग्लोबिनच्या प्रमाणाची विशेष काळजी घेतली पाहिजे..

-- जर हे प्रमाण कमी असेल तर भावी अर्भकाचे वजन कमी
भरते..

-- जर हे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त असेल तर मृत अर्भक निपजायची शक्यता असते..

-- हिमोग्लोबिनचे सरासरी प्रमाण कमी झाल्यावर पंडूरोगाचे निदान केले जाते..
अशा व्यक्तीच्या तांबड्या रक्तपेशीदेखील कमी असतात..

-- अति रक्तस्त्राव, शस्त्रक्रिया, अपघात, जठर-व्रण (अल्सर) किंवा मोठ्या आतड्याचा कर्करोग या कारणाने देखील हिमोग्लोबिनचे प्रमाण घटते..

-- आहारात पुरेसे लोह, फॉलिक आम्ल आणि जीवनसत्व B12 नसेल तर अभावजन्य पंडूरोग होऊ शकतो..

-- सिकल सेल पंडूरोग, थॅलासेमिया, हाडांचा कर्करोग, वृक्काचे काम बंद पडणे (kidney failure) अशा कारणाने देखील हिमोग्लोबिनचे प्रमाण उतरते..

-- पर्वतीय प्रदेशात राहणाऱ्या लोकांच्यात हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढलेले दिसून येते..

-- उंचावरती हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण विरळ असल्याने शरीराला आवश्यक तितका ऑक्सिजनचा पुरवठा होण्यासाठी या मंडळीत नैसर्गिकरित्याच हिमोग्लोबिनचे प्रमाण जास्त असते..

-- सतत धुम्रपान करणाऱ्या व्यक्तींमध्येदेखील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढलेले दिसून येते..

-- ज्यावेळी रोग्याला काही कारणाने निर्जलीकरण होते, तेव्हाही शरीरातील द्रवांचे संतुलन बिघडून हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते..

-- अर्थातच असे वाढीव प्रमाण फसवे असते; कारण धुम्रपान किंवा निर्जलीकरण या दोन्ही बाबी आरोग्यास केव्हाही हानीकारकच आहेत..

-- फुप्फुसांच्या काही रोगात तसेच काही प्रकारच्या अर्बुदांमुळे हिमोग्लोबिन वाढलेले दिसते..

-- खेळाडूंनी जर उत्तेजक द्रव्ये प्राशन केली, तर त्यामुळेही अशा प्रकारचे बदल हिमिग्लोबिनच्या प्रमाणात होतांना दिसतात..

-- हिमोग्लोबिनच्या कमतरतेने होणारे रोग टाळण्यासाठी योग्य आहार आणि फॉलिक आम्ल, लोह आणि प्रथिने यांचा आहारात योग्य आणि पुरेसा समावेश असणे आवश्यक आहे..हिमोग्लोबिन विषयी माहीती...-