Tuesday 19 September 2017

भारतरत्‍न...


-- भारतरत्‍न हा *भारतातील सर्वोच्च नागरी* सन्मान आहे..

-- देशासाठी सर्वोच्च प्रतीचे काम करणाऱ्या भारताची कीर्ती जगभरात वृद्धीगंत करणाऱ्या व्यक्तीस हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरविले जाते..

-- अशा व्यक्तींनी उभी हयात यासाठी घालविलेली असते..
अनेकांना तर हा सन्मान मरणोत्तर दिला गेला आहे..

-- सेवा, कला, साहित्य, विज्ञान व विश्वशांती, मानव विकास, कारखानदारी इत्यादी क्षेत्रांतील लोकांना, सनदी सेवा बजावलेल्या व्यक्तींना व अन्य अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्यांना, हा अमूल्य पुरस्कार देऊन गौरवायचे, असा निर्णय *इ.स. १९५४* मध्ये तत्कालिन भारत सरकारतर्फे घेण्यात आला *२ जानेवारी १९५४* रोजी भारताच्या राष्ट्रपतींनी त्यावर मान्यतेची मोहर उठवली..

-- *१९५५ साली* कायद्यात काही बदल करून *मरणोपरान्त ‘भारतरत्‍न’* देण्याची सोय करण्यात आली..

-- त्यानंतर १२ हून अधिक जणांना मरणोपरान्त भारतरत्‍न दिले गेले आहे..

-- २०१४ मध्ये वरील क्षेत्रांबरोबरच क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्कारात स्थान देण्यात आले..

-- २०१५ सालापर्यंत ४१ जणांना ‘भारतरत्‍न’ हा पुरस्कार लाभलेला आहे..
त्यात तीन नावे परदेशी व्यक्तींची आहेत..

-- या पुरस्काराचे वैशिष्ट्ये व तो देण्यासंबंधीचे नियम भारत सरकारच्या *राजपत्रात मनूद केले* आहेत..

-- भारतरत्न हा शब्द नावाआधी लिहिण्याचा एक किताब म्हणून वापरता येत नाही..

*.. वैशिष्ट्ये..--*

-- हे पदक पिंपळाच्या पानाच्या आकाराचे असेल..
हे पदक ५.८ सें.मी. लांबीचे, ४.७ सें.मी. रूंदीचे आणि ३.१ मि.मी. जाडीचे पिंपळाच्या पानाच्या आकाराचे बनविलेले असते..

-- हे पदक काशाचे बनवले जाईल..
याच्या दर्शनी बाजूवर ०.६२५ इंच व्यासाच्या सूर्याची प्रतिकृती कोरलेली असेल..

-- पदकच्या मागील भागावर भारताचे राष्ट्रीय चिन्ह चार सिंहांची राजमुद्रा व आदर्श घोषवाक्य कोरलेले असते..

-- सूर्य, राजचिन्ह व कडा प्लॅटिनमच्या आणि शब्द चमकदार पितळेचे बनवले जातात..

-- हे पदक पांढऱ्या रंगाच्या रिबीनीमध्ये ओवले जाते.. कोलकत्याला असलेल्या टांकसाळीत हे पदक बनवले जाते..

*..पुरस्काराचे स्वरूप..--*

-- रोख पुरस्कार..-- शून्य..

-- हा पुरस्कार मिळवणाऱ्यांना इतर कुठलीही विशेष पदवी किंवा मानधन वगैरे मिळत नाही..

-- पण त्यांना Indian order of precedence मध्ये ७वे स्थान स्थान मिळते..

-- (Bharat Ratna recipients rank seventh in the Indian order of precedence, but are constitutionally prohibited from using the award name as a title.)

-- *हा पुरस्कार ज्या व्यक्तींना मिळाला आहे, त्यांच्या नावाआधी भारतरत्‍न हा शब्द उपाधीसारखा वापरायची मुभा नाही..*

*..भारतरत्न’ विजेत्याला खालील सुविधा मिळतात..--*

-- ‘व्हीव्हीआयपी’च्या समकक्ष श्रेणी
संसदेच्या बैठका व सत्रांमध्ये सहभागी होण्याची सवलत..

-- भारतीय प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन समारंभात सन्माननीय अतिथी..

-- भारतामध्ये कुठेही जाण्यासाठी प्रथम श्रेणीचे मोफत विमान व रेल्वे प्रवास तिकिट..

-- पंतप्रधानांच्या वेतनाएवढे किंवा त्याच्या ५०% एवढे निवृत्ती
वेतन..

-- आवश्यकेनुसार ‘झेड’ श्रेणीची सुविधा..

-- माजी पंतप्रधान, केंद्र सरकारमधील कॅबिनेट स्तराचे मंत्री, लोकसभा व राज्यसभेतील प्रमुख विरोधी पक्षनेता, भारतीय योजना आयोगाचे डेप्युटी चेअरमन आणि राज्यांचे मुख्यमंत्री यांच्या नंतरच्या सातव्या स्थानाच्या दर्जाचा सन्मान ‘भारतरत्न’ विजेत्या व्यक्तीला दिलेला आहे..

*..भारतरत्न पुरस्कार विजेत्यांची यादी..--*

१.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
(१८८८-१९७५)
-- १९५४
भारताचे माजी राष्ट्रपती व नामांकीत शिक्षणतञ..

२.
चक्रवर्ती राजगोपालचारी
(१८७८-१९७२)
-- १९५४
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व शेवटचे गव्हर्नर जनरल..

३.
डॉ. चंद्रशेखर वेंकट रमण
(१८८८-१९७०)
-- १९५४
प्रसिद्ध भारतीय भौतिकशास्त्रजञ..

४.
डॉ. भगवान दास
(१८६९-१९५८)
-- १९५५
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते..

५.
डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या
(१८६१-१९६२)
-- १९५५
पहिले अभियंता ‘बँक ऑफ म्हैसूर’ ची स्थापना..

६.
जवाहरलाल नेहरू
(१८८९ -१९६४)
-- १९५५
भारताचे पहिले पंतप्रधान व भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेले काँग्रेसचे लोकप्रिय नेते..

७.
गोविंद वल्लभ पंत
(१८८७-१९६१)
-- १९५७
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व उत्तर प्रदेशाचे प्रथम मुख्यमंत्री
व भारताचे दुसरे गृहमंत्री..

८.
डॉ. धोंडो केशव कर्वे
(१८५८-१९६२)
-- १९५८
समाजसुधारक, शिक्षणप्रसारक..

९.
डॉ. बिधान चंद्र रॉय
(१८८२-१९६२)
-- १९६१
पश्चिम बंगालचे पहिले मुख्यमंत्री व वैद्यक..

१०.
पुरूषोत्तम दास टंडन
(१८८२-१९६२)
--१९६१
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व शिक्षणप्रसारक..

११.
डॉ. राजेंद्र प्रसाद
(१८८४-१९६३)
-- १९६२
भारत



१२.
डॉ. झाकिर हुसेन
(१८९७-१९६९)
-- १९६३
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे राष्ट्रपती..

१३.
डॉ. पांडुरंग वामन काणे
(१८८०-१९७२)
-- १९६३
शिक्षणप्रसारक..

१४.
लाल बहादूर शास्त्री (मरणोत्तर)
(१९०४-१९६६)
-- १९६६
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे दुसरे पंतप्रधान..

१५.
इंदिरा गांधी
(१९१७-१९८४)
--- १९७१
भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान..

१६.
वराहगिरी वेंकट गिरी
(१८९४-१९८०)
-- १९७५
कामगार युनियन व भारताचे चौथे राष्ट्रपती..

१७.
के. कामराज (मरणोत्तर)
(१९०३-१९७५)
-- १९७६
भारतीय स्वतंत्रता चळवळीत भाग, मद्रास जाज्याचे मुख्यमंत्री..

१८.
मदर तेरेसा
(१९१०-१९९७)
-- १९८०
ख्रिश्चन मिशनरी समाजसुधारक, मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या संस्थापक..

१९.
आचार्य विनोबा भावे (मरणोत्तर)
(१८९५-१९८२)
-- १९८३
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व समाजसुधारक..

२०.
खान अब्दुल गफार खान
(१८९०-१९८८)
-- १९८७
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील पहिले बिगर भारतीय नेते..

२१.
एम. जी. रामचंद्रन (मरणोत्तर)
(१९१७-१९८७)
-- १९८८
चित्रपट अभिनेते व तमिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री..

२२.
भीमराव रामजी आंबेडकर (मरणोत्तर)
(१८९१-१९५६)
-- १९९०
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, अर्थतज्ञ, राजकीय नेते..

२३.
नेल्सन मंडेला
(जन्म १९१८-२०१३)
-- १९९०
वर्णभेद विरोधी चळवळीचे
प्रणेते..

२४.
राजीव गांधी (मरणोत्तर)
(१९४४-१९९१)
-- १९९१
भारताचे सातवे पंतप्रधान..

२५.
सरदार वल्लभभाई पटेल ( मरणोत्तर)
(१८७५-१९५०)
-- १९९१
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पहिले गृहमंत्री..

२६.
मोरारजी देसाई
(१८९६-१९९५)
-- १९९१
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पाचवे पंतप्रधान..

२७.
मौलाना अबुल कलाम आझाद (मरणोत्तर)
(१८८८-१९५८)
-- १९९२
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पहिले शिक्षणमंत्री..

२८.
जे. आर. डी. टाटा
(१९०४-१९९३)
-- १९९२
उद्योजक..

२९.
सत्यजित रे
(१९२२-१९९२)
-- १९९२
बंगाली चित्रपट निर्माते..

३०.
ए. पी. जे. अब्दुल कलाम
(जन्म १९३१)
-- १९९७
भारताचे ११वे राष्ट्रपती..

३१.
गुलझारीलाल नंदा
(१८९८-१९९८)
-- १९९७
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पंतप्रधान..

३२.
अरुणा आसफ अली‎ (मरणोत्तर)
(१९०६-१९९५)
-- १९९७
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेत्या..

३३.
एम.एस. सुब्बुलक्ष्मी
(१९१६-२००४)
-- १९९८
कर्नाटक शैलीतील गायिका..

३४.
चिदंबरम्‌ सुब्रमण्यम्
(१९१०-२०००)
-- १९९८
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे माजी कृषीमंत्री..

३५.
जयप्रकाश नारायण (मरणोत्तर)
(१९०२-१९७९)
-- १९९९
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते..

३६.
रवी शंकर
(१९२०-२०१२)
-- १९९९
प्रसिद्ध सितारवादक..

३७.
अमर्त्य सेन
(जन्म १९३३)
-- १९९९
प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ..

३८.
गोपीनाथ बोरदोलोई‎ (मरणोत्तर)
(१८९०-१९५०)
-- १९९९
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व आसामचे मुख्यमंत्री..

३९.
लता मंगेशकर
(जन्म १९२९)
-- २००१
पार्श्वगायिका..

४०.
बिसमिल्ला खान
(१९१६-२००६)
-- २००१
शहनाईवादक..

४१.
भीमसेन जोशी
(१९२२-२०११)
-- २००८
हिंदुस्थानी शास्त्रीय गायक..

४२.
सी.एन.आर.राव
(जन्म-१९३४)
-- २०१४
शास्त्रञ..

४३.
सचिन तेंडूलकर
जन्म-इ.स.१९७३
-- २०१३
क्रिकेटपटू..

४४.
मदनमोहन मालवीय (मरणोत्तर)
(१८६१-१९४६)
-- २०१४
स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाचे योगदान देणारे, बनारस हिंदू विश्वविद्यापीठ व हिंदू महासभेचे संस्थापक, प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ..

४५.
अटलबिहारी वाजपेयी
(जन्म १९२४)
-- २०१४
कविमनाचे, अजातशत्रू, मुत्सद्दी, वक्ता
माजी पंतप्रधान..





No comments:

Post a Comment