Wednesday, 14 February 2018

समाजसुधारक - रघुनाथ धोंडो कर्वे • जन्म :- इ.स. १४ जानेवारी, १८८२. (मुरूड)
 • मृत्यू :- इ.स. १४ ऑक्टोबर, १९५३. (मुंबई)
 • वडील :- महर्षी धोंडो केशव कर्वे.
 • आई :- राधाबाई धोंडो कर्वे.
 • पत्नी :- मालती रघुनाथ कर्वे.
 • रघुनाथ धोंडो कर्वे हे गणिताचे प्राध्यापक आणि महाराष्ट्रातील अग्रणी समाजसुधारक होते.
 • समाजस्वास्थ्यासाठी संततिनियमन आणि लैंगिक शिक्षण यांसंबंधी बुद्धिवादी विचारप्रवर्तन व प्रत्यक्ष कार्य करणारे भारतातील एक आद्य विचारवंत म्हणुन देखील त्यांची ओळख आहे.

शिक्षण 

 • पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूल मधे ते शिकले. इ.स. १८९९ साली त्यांनी मॅट्रिकची (दहावी) परीक्षा दिली. मॅट्रिक परीक्षेत मुंबई राज्यात सर्वप्रथम आले.
 • इ.स. १९०४ मधे ते फर्ग्युसन कॉलेजमधून बी. ए.झाले.
 • इ.स. १९१९ साली ते गणितातील पी.एच.डी. पदवी घेण्याकरिता ते पॅरिसला गेले, परंतु ती न मिळवता एका पदविकेवर (‘दिप्लोम्‌ दे सुदस्युपेरिअर’ पदवी) समाधान मानून त्यांना परत यावे लागले.
 • त्यामागील घडलेल्या घटना त्यांनी मुलाखतींमध्ये नोंदविल्या. (आशा व पौर्णिमा नावाची साप्ताहिके इ.स. १९४०च्या सुमारास प्रसिद्ध होत असत, त्यांमध्ये ह.वि. देसाई या पत्रकाराने रघुनाथरावांच्या घेतलेल्या दोन मुलाखती प्रसिद्ध करण्यात आल्या.)
 • एल्फिन्स्टन कॉलेज - मुंबई (१९०८-१७), कर्नाटक कॉलेज - धारवाड (१९१७ - १९), डेक्कन कॉलेज - पुणे (१९२१), गुजरात कॉलेज - अहमदाबाद (१९२१ - २२) व विल्सन कॉलेज - मुंबई (१९२२) या महाविद्यालयांत गणिताचे प्राध्यापक होते. त्यांचे क्रांतीकारक विचार व बाणेदार स्वभाव यांमुळे त्यांच्या नोकरीत सतत अस्थिरता राहिली. 
 • इ.स. १९०६ साली रघुनाथराव मुंबईला ट्रेनिंग कॉलेजात शिक्षण घेण्याकरिता आले, तेव्हा तिथे त्यांना भेटलेले प्रो. नेल्सन फ्रेझर या गुरूंविषयी आणि फ्रेंच भाषा शिकायचे निश्चित झाले, तेव्हापासून दीर्घकालपर्यंत ज्यांच्या सानिध्याचा व साहाय्याचा लाभ रघुनाथरावांना मिळाला ते प्रो. पेल्तिए यांच्या संबंधातील त्यांनी जागवलेल्या आठवणी ‘एक विक्षिप्त इंग्रज- प्रो. नेल्सन पेल्तिए‘ या लेखात आहेत.
 • फ्रेंच भाषेचे कर्व्यांना विशेष ज्ञान होते. त्या भाषेतील अनेक नाटके व गोष्टी त्यांनी रूपांतरित केली आहेत.


सामाजिक कारकीर्द

 • रघुनाथ कर्वे यांनी गणिताचे प्राध्यापक म्हणून मुंबईच्या विल्सन महाविद्यालयात नोकरी केली, त्यातच त्यांनी कुटुंब नियोजन, लोकसंखेला आळा, आणि लैंगिक सुखाचे स्त्रियांचे अधिकार याचे महत्त्व ते लोकांना सांगत राहिले. 
 • तेव्हा महाविद्यालयाच्या रूढीवादी प्राचार्यांनी त्यांना पदाचा राजीनामा देण्यास सांगितले. त्यांनी तो दिला परंतु वरील प्रश्नांसाठी आपले आयुष्य समर्पित केले.
 • संततिनियमनाचे केंद्र (राइट एजन्सी) ते १९२१ पासून आपली पत्नी मालतीबाई यांच्या सहकार्याने चालवत होते. 
 • त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांच्या मातोश्रींचा बाळंतपणातच देहान्त झाल्यामुळे गरोदरपणासंदर्भात स्त्रियांना व्यवस्थित शिक्षण आणि माहिती व्हावी असा त्यांचा आग्रह होता.
 • त्यांनी १९२३ मध्ये संततिनियमन, विचार व आचार आणि १९२७ मध्ये गुप्त रोगांपासून बचाव (विचार व आचार) ही पुस्तके लिहिली. 
 • संततिनियमनाचे उद्दिष्ट समोर ठेऊन कर्वे यांनी १५ जुलै इ.स. १९२७ ला ‘समाजस्वास्थ्य’ या मासिकाची सुरुवात केली.
 • कर्वे यांनी स्वतःच्या प्रयत्नातून पहिले कुटुंब नियोजन केंद्र इ.स. १९२१ साली लंडनमधे सुरू केले,त्याच वर्षी ते भारतात सुरू झाले. ‘राईट एजन्सी’ हे भारतातील पहिले कुटुंब कल्याण केंद्र होय.
 • त्याचप्रमाणे वेश्याव्यवसाय (१९४०), आधुनिक आहारशास्त्र (१९३८), आधुनिक कामशास्त्र (आवृ. २, १९३४) अशी इतरही काही शास्त्रीय विषयांचे विवरण करणारी पुस्तके लिहिली.
 • पॅरिसच्या परी (१९४६) व तेरा गोष्टी (१९४०) हे त्यांचे ललित साहित्यही उपलब्ध आहे. त्यांना रंगभूमीचेही अत्यंत आकर्षण होते. गुरुबाजी (१९३७), तार्त्युफ नाटकाचे रूपांतर) व न्यायाचा शोध (१९४६) हे चार अंकी संगीत नाटक त्याचे निदर्शक होय.


अधिक माहितीसाठी :-
www.reliableacademy.com

No comments:

Post a comment