Sunday, 4 March 2018

रशियन क्रांती - इ.स. १९१७

स्थान :- रशिया.

परिणती :-

 1. दुसरा निकोलाय ची सत्ता संपुष्टात.
 2. रशियन साम्राज्य लयाला गेले.
 3. बोल्शेव्हिकांच्या हातात सत्ता गेली.
 4. रशियन यादवी युद्ध सुरू झाले.

युद्धमान पक्ष :-


 1. रशियन साम्राज्य.
 2. रशियन हंगामी सरकार.
 3. बोल्शेव्हिक.
 4. पेत्रोग्राद सोव्हियेत.


 • रशियाप्रमाणेच जगाच्या राजकीय, आर्थिक व वैचारिक क्षेत्रांत फार मोठा प्रभाव पाडणारी ही क्रांती ७ नोव्हेंबर १९१७ रोजी घडून आली. 
 • या क्रांतीमुळे रशियात सु. १४८० सालापासून चालत आलेल्या झारच्या राजेशाहीचा शेवट झाला आणि तेथे बोल्शेव्हिक कम्युनिस्टांची सत्ता स्थापन झाली.
 • इ.स. १९१७ रशियात झालेल्या राजकीय उलथापालथीस रशियन क्रांती म्हटले जाते. यामुळे झारची निरंकुश सत्ता लयाला गेली. 
 • मार्च, इ.स. १९१७ मध्ये झारशाही लयाला गेली व त्या ठिकाणी हंगामी सरकार आले. हे हंगामी सरकार मेन्शॅव्हिक गटाचा नेता (समाजवादी क्रांतिकारी पक्ष तृदोविक गट) केरेन्स्की याच्या नेतृत्वखालचे होते. 
 • बोल्शॅव्हिक नेता व्लादिमीर लेनिन याने केरेन्स्कीचे हंगामी सरकार बरखास्त केले. ऑक्टोबरमधील दुसऱ्या क्रांतीत हंगामी सरकारची सत्ता बोल्शेव्हिक (साम्यवादी) सरकारच्या हाती गेली. बोल्शॅव्हिक नेता व्लादिमीर लेनिन याने केरेन्स्कीचे हंगामी सरकार बरखास्त केले.
 • रशियन राज्यक्रांती ही पहिली साम्यवादी क्रांती होती. 
 • जगभरातील कामगारांच्या परिस्थितीत सुधारणा घडवून आणण्यास ती कारणीभूत ठरली. 
 • आर्थिक नियोजनाच्या मार्गाने विकास साधण्याची संकल्पना ही या क्रांतीने जगाला दिलेली देणगी आहे. 
 • इ.स. १९१७ च्या फेब्रुवारी महिन्यात पेट्रोग्राड येथे कामगारांनी संप पुकारला. ही रशियन राज्यक्रांतीची नांदी ठरली. 
 • त्यानंतर राजधानीतील सैनिकांनीही कामगारांना पाठिंबा दिला. हे या राज्यक्रांतीचे पहिले पर्व होते. 
 • स्वित्झर्लंडमध्ये अज्ञातवासात असलेला बोल्शेव्हिक नेता लेनिन इ.स. १९१७ च्या एप्रिलमध्ये रशियात परतला, तेंव्हा या राज्यक्रांतीचे दुसरे पर्व सुरु झाले.

रशियन राज्यक्रांतीचा काही प्रमुख घटनांचा कालानुक्रम 

 • ‘ब्लडी सन्डे’ – विंटर पॅलेसवरील कामगार-मोर्चावर गोळिबार व शंभर लोकांची हत्या. :- २२ जानेवारी १९०५.
 • पोटेमकिन युध्दनौकेवरील बंडाळी. :- १४ जून १९०५.
 • रेल्वे कर्मचाऱ्यांचा संप :- २० ऑक्टोबर १९०५.
 • सेंट पीटर्झबर्ग येथे कामगार प्रतिनिधींच्या पहिल्या सोव्हिएटची स्थापना. :- २६ ऑक्टोबर १९०५.
 • ऑल रशियन सोशल डेमॉक्रॅटिक लेबर पक्षाचे लंडन येथील अधिवेशन :- एप्रिल १९०७.
 • पेट्रग्राड शहरातील २५,००० कामगारांचा संप. :- २८ फेब्रुवारी १९१७.
 • पेट्रग्राडमधील झारसत्तेचे उच्चाटन. :- १२ मार्च १९१७.
 • सैनिक आणि कामगार यांची हंगामी सरकारविरुध्द निदर्शने :- ३ ते ५ मे १९१७.
 • पेट्रग्राडमध्ये पहिल्या सोव्हिएट काँग्रेसची सुरुवात. :- १६ जून १९१७.
 • हंगामी सरकारविरुध्द खलाशी, कामगार व सैनिक यांचा अयशस्वी उठाव. :- १६ ते १८ जुलै १९१७.
 • बोल्शेव्हिकांव्यतिरिक्त सर्व राजकीय गटांची मॉस्कोमध्ये परिषद. तिच्या प्रतिक्रांतिवादी धोरणाविरुध्द मॉस्को कामगारांचा संप. :- २५ ते २७ ऑगस्ट १९१७.
 • पेट्रग्राडमधील सोव्हिएटे नष्ट करण्यासाठी लष्करी उपाययोजना. :- ६ सप्टेंबर १९१७.
 • मॉस्कोच्या सोव्हिएटमध्ये प्रथमच बोल्हेव्हिकांचे मताधिक्य. :- १९ सप्टेंबर १९१७.
अधिक माहितीसाठी :-


झार दुसरा निकोलस व शाही घराण्यातील इतर व्यक्तींना येकटेरिंबर्ग (स्व्हेर्डलॉव्हूस्क) येथे देहान्त शासन :- १६ जुलै १९१८.