अंमलबजावणी संचालनालय (E.D - Enforcement directorate)
- ही भारतामध्येआर्थिक कायद्यांची अंमलबजावणी करणारी तसेच आर्थिक गुन्ह्यांचा मुकाबला करणारी यंत्रणा आहे.
- ही अर्थ मंत्रालयातील राजस्व विभागाचा एक भाग आहे. यात भारतीय महसूल सेवेतील अधिकारी काम करतात.
- परकीय विनिमय व्यवस्थापन कायद्यातील तरतुदींचा तपास करण्यासाठी भारत सरकारने याची स्थापना केली.
स्थापना :- १ जून २०००.
- मुख्यालय :- नवी दिल्ली.
उद्देश :-
- भारत सरकारच्या दोन प्रमुख कायद्यांची अंमलबजावणी करणे हा अंमलबजावणी संचालनालयाचा प्रमुख उद्देश आहे.
- हे दोन कायदे आहेत.- "परकीय विनिमय व्यवस्थापन अधिनियम १९९९" व "अवैध मुद्रा रूपांतरण प्रतिबंध, २००२".
संघटना :-
- अंमलबजावणी संचालनालयाच काम नवी दिल्ली येथील मुख्यालयातून चालते.
- परंतु त्यांची क्षेत्रीय कार्यालये पुढीलप्रमाणे - मुंबई, कोलकाता, दिल्ली, चंडीगढ, चेन्नई, अहमदाबाद, बंगळूर, लखनौ, कोचीन, हैदराबाद.
- उप क्षेत्रीय कार्यालये - इंदूर, आग्रा, श्रीनगर, जयपूर, वाराणसी, कालिकत, हैदराबाद, गुवाहाटी, पणजी.
अधिक माहितीसाठी :- www.reliableacademy.com