Monday 1 January 2018

लोकसंख्या

भारतातील लोकसंख्येनुसार दर्जा 



भारतामध्ये विशिष्ट लोकसंख्येवरून त्या वस्तीला खेडेगाव, गाव किंवा शहर संबोधले जाते.

ज्या गावाची लोकसंख्या ५,००० पेक्षा कमी असेल तर त्याला ‘खेडेगाव’ म्हणतात.

ज्या गावाची लोकसंख्या ५,००० ते १,००,००० दरम्यान असेल त्याला ‘गाव’ (Town) म्हणतात.

ज्या गावाची वस्ती १,००,००० (एक लाख) किंवा त्याहून अधिक असेत तर त्याला ‘शहर’ म्हणतात.

खेडेगाव

  • ५,००० पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावातील लोकवस्तीला खेडे किंवा खेडेगाव असे म्हणतात.

खेडयांचे प्रकार


  • भारतात खेडयांचे दोन प्रकार आहेत.

संयुक्त खेडे व पृथक खेडे.


  • संयुक्त खेडयात सर्व जमीन सुसंघटित अशा मंडळाच्या मालकीची असते, यात पतिदारी संयुक्त खेडे आणि जमीनदारी संयुक्त खेडयांचा प्रकारही आहे.
  • रयतवारी खेडे महाराष्ट्रात मोठया प्रमाणात दिसून येते. यात जमीनमालकी सर्व खेडयाची नसून त्या त्या व्यक्तीची असते.
  • जमीनमालकच शेतसाऱ्याला जवाबदार असतो.
  • याशिवाय स्थानांतर करणारी खेडी, अंशत: खेडी, स्थायी खेडी, मध्यवर्ती खेडी, विखुरलेली खेडी, रेखात्मक वसाहतीची खेडी आहेत. 
  • वर्तुळाकार वसाहतीची खेडी इस्त्रायलमध्ये आढळून येतात.


गाव

  • ज्या गावाची लोकसंख्या ५,००० ते १,००,००० दरम्यान असेल त्याला ‘गाव’ (Town) म्हणतात.
  • गाव हे साधारणपणे नदी  काठी अथवा पाण्याचे स्रोत असतील अशा ठिकाणी वसलेले आढळते.

विस्तार

  1. गावाचे लोकवस्ती नुसार विभाग आढळतात. 
  2. लोकवस्ती वाढल्यावर गावांची उपगावे तयार होत. अशी मूळ गावापेक्षा लहान वस्ती असल्यास त्यास बुद्रुक व मुख्य गावास खुर्द असे पूर्वी संबोधले जाते. 
  3. तसेच काहीवेळा शेतकरी गावापासून दूर शेतात वस्ती करीत, अशा मोजक्या घरांच्या वस्तीला वाडी असे म्हणतात.


शहर

  1. ज्या ठिकाणची वस्ती १,००,००० (एक लाख) किंवा त्याहून अधिक असेत तर त्याला ‘शहर’ म्हणतात.
  2. शहर हा शब्द मुळचा अरबी भाषेतला आहे. शहरे महणजे नागरी वसाहह्त होय.

सेन्सस टाऊन

ज्या गावाची लोकसंख्या किमान ५,००० असून त्यातील ७५ टक्के पुरुष शेतीवर अवलंबून नाहीत आणि ज्या गावाच्या लोकसंख्येची घनता दर चौरस किलोमीटरला ४०० हून अधिक आहे, अशा गावाला ‘सेन्सस टाऊन’ (CT) म्हणतात.


स्टॅट्युटरी टाऊन

ज्या गावात नगरपालिका, महापालिका, कॅन्टॉन्मेन्ट बोर्ड किंवा अशीच एखादी स्थानिक स्वराज्य संस्था असेल त्या गावाला स्टॅट्युटरी टाऊन म्हणतात.


गावांचे वर्गीकरण


  1. वर्ग I : लोकवस्ती एक लाख किंवा त्याहून अधिक.
  2. वर्ग II : लोकवस्ती ५०,००० ते ९९,९९९.
  3. वर्ग III : लोकवस्ती २०,००० ते ४९,९९९.
  4. वर्ग IV : लोकवस्ती १०,००० ते १९,९९९.
  5. वर्ग V : लोकवस्ती ५,००० ते ९,९९९.

अधिक माहितीसाठी :-