Friday 29 September 2017

समाजसुधारक -- काशीबाई कानिटकर..--


..समाजसुधारक -- काशीबाई कानिटकर..--समाजसुधारक काशीबाई कानिटकर..


👉 जन्म..-
इ.स. १८६१..
अष्टे, सांगली, महाराष्ट्र..

👉 मृत्यू..-
इ.स. १९४८..

👉 कार्यक्षेत्र..-
साहित्य..

👉 पती..-
गोविद वासुदेव कानिटकर..


-- काशीबाईंचा जन्म वर्तमान महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यातील अष्टे गावी झाला..

-- न्यायालयीन पेशात असलेल्या व स्वतः व्यासंगी लेखक असलेल्या गोविंद वासुदेव कानिटकरांसोबत वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह झाला..

-- गोविंदरावांनी काशीबाईंना घरीच मराठी, संस्कृत, इंग्रजी भाषा शिकवल्या..

-- काशीबाई बनारस हिंदू विश्वविद्यालयात मराठी भाषाविषय शिकवीत असत..

-- पहिल्या भारतीय स्त्री डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी यांच्या मृत्यूनंतर त्यांचे चरित्र काशीबाई कानिटकर यांनी लिहिले..

-- काशीबाई इ.स. १९१० च्या भारतीय राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनास हजर होत्या..


👉 प्रमुख कादंबरी..-

-- रंगराव..

-- पालखीचा गोंडा..


👉 कथा संग्रह..-

-- शेवट तर गोड झाला..

-- चांदण्यातील गप्पा..